hungary member of parliament was attending a sex party and gave resign after police busted it vb

जाजेरने या पार्टीत कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज सेवन केल्याचा इन्कार केला आहे असून आपण कोणत्याही लैंगिक कृत्यात सहभागी झालो नाही. मी फक्त एका घरगुती पार्टीत सहभागी झालो होतो असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तथापि, त्यांनी कोरोनाच्या गाइडलाइन्सचा भंग केल्याप्रकरणी आपल्या कुटुंबियांची माफी मागितली आहे.

हंगेरीतील युरोपियन खासदार जोसेफ जाजेर बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स मध्ये सेक्स पार्टी करताना रंगेहाथ पकडले गेले आहेत. द टाइम्स युके च्या अहवालानुसार, पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. कोराना गाइडलाइन्सच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणामुळे पोलिसांनी या पार्टीत छापा टाकला होता. जोसेफ यांनी या घटनेनंतर व्यक्तिगत कारणामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे म्हटले आहे.

५९ वर्षाचे जोसेफ हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ओर्बन दक्षिणपंथी Fidesz पार्टीचे संस्थापक सदस्य आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा पोलिसांनी या पार्टीत छापा टाकला तेव्हा पहिल्या मजल्यावर असलेल्या खिडकीतून त्यांनी खाली उडी घेतली आणि ते जखमी झाले. बेल्जियमटी राजधानी ब्रुसेल्समध्ये उपस्थित अभिवक्त्याने एएफपी सोबत झालेल्या चर्चेत सांगितले की, सिटी सेंटरमध्ये सुरू असलेल्या या पार्टीत २० हून अधिक जणांना अटक करण्यात आली असून यात काही युरोपियन प्रतिनिधींचाही समावेश होता आणि या सर्वांना जवळपास २३ हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

जाजेरने या पार्टीत कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज सेवन केल्याचा इन्कार केला आहे असून आपण कोणत्याही लैंगिक कृत्यात सहभागी झालो नाही. मी फक्त एका घरगुती पार्टीत सहभागी झालो होतो असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तथापि, त्यांनी कोरोनाच्या गाइडलाइन्सचा भंग केल्याप्रकरणी आपल्या कुटुंबियांची माफी मागितली आहे.

पोलिसांनी माझ्याकडे ओळखपत्राची मागणी केली पण त्यावेळी नेमकं माझ्याकडे ते नव्हतं. मी त्यांना संसद सदस्य असल्याचे सांगितले. पोलिसांनी मला त्यांच्या भाषेत दटावले आणि त्यानंतर माझी सुटका झाली. मी कोरोनाच्या गाइडलाइन्स पाळल्या नाहीत त्यासाठी मी खेद व्यक्त करतो. हा माझा निष्काळजीपणा होता आणि त्याची शिक्षा भोगायला मी तयार आहे.

जाजेर १९९० पासून २००२ या काळात हंगेरीच्या संसदेवर चार वेळा निवडून गेले असून २००४पासून ते युरोपचे संसद सदस्य म्हणूनही निवडून आले आहेत. ३१ डिसेंबरला त्यांनी संसदेचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.