“स्तन बेंबीपर्यंत आले तरी चालतील पण ब्रा घालणार नाही” अभिनेत्रीने घेतली शपथ

गिलियन अँडरसनने सोशल मिडियावर खुलासा केला आहे की तिने ब्रा घालणे बंद केले आहे आणि आता इथून पुढेही ती कधी ब्रा घालणार नाही. सोमवारी इन्स्टाग्रामवर आपल्या 1.8 लाख फॉलोअर्ससोबत प्रश्न-उत्तराच्या कार्यक्रमामध्ये बोलताना ‘द क्राउन’ स्टारने सांगितले.

    सध्या सोशल मीडियावर सर्वत्र चर्चा आहे ती मराठी अभिनेत्री हेमांगी कवी हीने शेअर केलेल्या ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ या पोस्टची. हेमांगीच्या या पोस्टवर माध्यमांत उलटसुलट चर्चा सुरु आहेत. पण आता हॉलीवूडच्या एका अभिनेत्रीने तर ब्रा न घालण्याची शपथच घेतली आहे.

    गिलियन अँडरसन (Gillian Anderson) असं या अभिनेत्रीचं नाव असून तिने गिलियन अँडरसनने सोशल मिडियावर खुलासा केला आहे की तिने ब्रा घालणे बंद केले आहे आणि आता इथून पुढेही ती कधी ब्रा घालणार नाही. सोमवारी इन्स्टाग्रामवर आपल्या 1.8 लाख फॉलोअर्ससोबत प्रश्न-उत्तराच्या कार्यक्रमामध्ये बोलताना ‘द क्राउन’ स्टारने सांगितले की, ‘ब्रा’बाबत ती आळशी झाली आहे. यावेळी ती म्हणाली की, ‘मी आता ब्रा घालत नाही व इथून पुढेही घालू शकणार नाही. हे मी करू शकणार नाही, मला माफ करा… भले मग माझे स्तन बेंबीपर्यंत पोहोचले तरी चालतील पण मी ब्रा कधीच घालणार नाही. हे खूपच अनकम्फर्टेबल आहे.’

    गिलियन अँडरसन एक 52 वर्षीय ब्रिटीश-अमेरिकन अभिनेत्री आहे. ‘द हाउस ऑफ मिर्थ’, ‘द मायटी’, ‘द लास्ट किंग ऑफ स्कॉटलंड’, ‘द एक्स फाइल्स’ आणि ‘द एक्स फाइल्स: आय वॉण्ट टू बिलिव्ह’, ‘द क्राउन’, ‘सेक्स एज्युकेशन’ सारख्या हॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.