चिकनच्‍या सेवनासह रोगप्रतिकारशक्‍ती वाढवा, पोटाचे आजार कमी करणे करण्‍यातही ठरते आहे उपयुक्‍त : सुगुणा फूड्स

चिकन सूप सर्दी व ताप बरा करण्‍यामध्‍ये मुख्‍य आहार राहिला आहे. चिकन सूपमध्‍ये दाह कमी करणारे गुण आहे आणि ते अपर रेस्‍पीरेटरी ट्रॅकमधील दाह कमी करते. चिकनची हाडे उकळवून केलेल्‍या चिकनच्‍या रस्स्यामध्‍ये जेलाटिन, कोंड्रोइटिन आणि इतर पौष्टिक घटक असतात, ते पोटाचे आजार कमी करण्‍यामध्‍ये आणि रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍यामध्‍ये उपयुक्‍त आहेत.

    मुंबई : कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट खूपच भयंकर ठरत आहे. अधिकाधिक लोकांना विषाणूचा संसर्ग होत आहे. आपल्‍या शरीराचे आरोग्‍य उत्तम राहण्‍यासोबत प्रबळ रोगप्रतिकारशक्‍तीसाठी आरोग्‍यदायी आहार महत्त्वाचा आहे. आपल्‍या शरीराच्‍या रोगप्रतिकारशक्‍तीचे कार्य पौष्टिक घटकांच्‍या सेवनावर अवलंबून असते. लसीकरणामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी आपल्‍या आरोग्‍याकडे बारकाईने लक्ष देणे आणि आपली रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्यासाठी रोगप्रतिकारशक्‍ती वाढवणा-या पदार्थांचे सेवन करणे महत्त्वाचे आहे.

    चिकन सूप सर्दी व ताप बरा करण्‍यामध्‍ये मुख्‍य आहार राहिला आहे. चिकन सूपमध्‍ये दाह कमी करणारे गुण आहे आणि ते अपर रेस्‍पीरेटरी ट्रॅकमधील दाह कमी करते. चिकनची हाडे उकळवून केलेल्‍या चिकनच्‍या रस्स्यामध्‍ये जेलाटिन, कोंड्रोइटिन आणि इतर पौष्टिक घटक असतात, ते पोटाचे आजार कमी
    करण्‍यामध्‍ये आणि रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍यामध्‍ये उपयुक्‍त आहेत.

    आठवड्यातून तीनदा चिकनचे सेवन करणे महत्त्वाचे

    रोगप्रतिकारशक्‍ती ही आपल्‍या शरीरासाठी मोठी संरक्षक आहे. रोगप्रतिकारशक्‍ती सर्दीपासून संरक्षण करण्‍यामध्‍ये, विषाणू व जीवाणू, तसेच अशा सूक्ष्‍मजीवांसोबत लढण्‍यामध्‍ये मदत करते. चिकन सेवनाचे काही फायदे पुढीलप्रमाणे:

    १) चिकन हे प्रथिनांचे संपन्‍न स्रोत आहेत, ते शरीरातील हाडे मजबूत करण्‍यामध्‍ये आणि रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍यामध्‍ये मदत करतात. जीवनसत्त्व ब, ब३, ब६, ब९ आणि रेटिनॉल सारखे इतर पौष्टिक घटक शरीराच्‍या रोगप्रतिकारशक्‍ती कार्यामध्‍ये प्रमुख भूमिका बजावतात. विशेषत: चिकनमधील जीवनसत्त्व ब६ नवीन व आरोग्यदायी लाल रक्‍तपेशी निर्माण होण्‍यामध्‍ये महत्त्वाचे आहे.

    २) चिकन शरीराची रोगप्रतिकारशक्‍ती कमी झाल्‍यास रक्‍तपेशी वाढवण्‍यामध्‍ये मदत करते.

    ३) चिकनमध्‍ये आढळून येणारी जीवनसत्त्वे शरीरातील मेद व शर्करांच्‍या चयापचयासाठी आवश्‍यक आहेत आणि पेशींच्‍या कार्यक्षम कार्यसंचालनांमध्‍ये मदत करतात.

    ४) चिकनमध्‍ये असलेले कोंड्रोइटिन आतड्यांसंबंधित रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍यामध्‍ये मदत करते.

    न्‍यूट्रिझोनच्‍या संस्‍थापक न्‍यूट्रिशनिस्‍ट मुथूलक्ष्‍मी म्‍हणाल्‍या, ”चिकनमधून मिळणारे प्रथिन स्‍नायू बळकट करण्‍यामध्‍ये मदत करते. आहारावर लक्ष ठेवणे आणि विषाणूला दूर ठेवण्‍यासाठी रोगप्रतिकारशक्‍ती वाढवणा-या पदार्थांचे सेवन करण्‍यामध्‍ये वाढ करणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे. लशीचे दुष्परिणाम टाळण्‍यासाठी आठवड्यातून किमान तीनदा चिकन सूप सेवन करता येऊ शकते. चिकन सेवन करण्‍यापूर्वी ते उच्‍च तापमानामध्‍ये शिजवणे महत्त्वाचे आहे.”