Increase in childrens obesity due to junk food advertisements
खाद्य जाहिरातींमुळे मुलांच्या लठ्ठपणात वाढ

जाहिरातींसंबंधी एक अतिशय धक्कादायक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार युट्यूबवर मुलांना खाद्यपदार्थ संबंधातील ४०० हून अधिक व्हिडिओ असे आहेत ज्यात साखर, जंकफूडच्या जाहिराती आहेत. या जाहिराती पाहून लहान मुलांमध्ये हेपदार्थ खाण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे आणि त्यामुळे लहान मुले वेगाने लठ्ठपणाच्या दिशेने वाटचाल करीत आहेत.

  • जाहिराती पाहून मुले करतात हट्ट

वृत्तसंस्था, दिल्ली.

जाहिरातींसंबंधी एक अतिशय धक्कादायक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार युट्यूबवर मुलांना खाद्यपदार्थ संबंधातील ४०० हून अधिक व्हिडिओ असे आहेत ज्यात साखर, जंकफूडच्या जाहिराती आहेत. या जाहिराती पाहून लहान मुलांमध्ये हे पदार्थ खाण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे आणि त्यामुळे लहान मुले वेगाने लठ्ठपणाच्या दिशेने वाटचाल करीत आहेत.

जाहिराती पाहून मुले करतात हट्ट Childrens Obesity

विशेष म्हणजे ही परिस्थिती अमेरिकेप्रमाणेच भारतातही आहे. दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटल मधील डॉ.आरती यांच्या म्हणण्यानुसार स्क्रीनवर जंक फूड जाहिराती पाहून मुले याच पदार्थांचा हट्ट करतात. वय वाढत जाते तशी ही सवय वाढत जाते. जाहिरातीमध्ये ९० टक्के जाहिराती आरोग्याला अपायकारक मानल्या गेल्या आहेत. त्यात नामवंत कंपन्या आणि अनेक बडे ब्राण्डची उत्पादने सामील आहेत.

स्क्रीन टाईमध्ये झाली आहे वाढ Junk Food Advertisements

मिल्कशेक, फ्रेंच फ्राईज, सॉफ्टड्रिंक्स, चीजबर्गर आज लाखो मुलांचे आवडते खाणे आहे. सध्या शाळा बंद असल्याने मुलांचा स्क्रीन टाईम वाढला आहे. त्याचा वापर करून या कंपन्या आणि ब्राण्ड मुलांना निशाना बनवत आहेत. परिणामी मुलांमध्ये लठ्ठपणा वाढतो आहे. ८० टक्के पालकांनी त्यांची मुले युट्यूब पाहतात असे सांगितले आहे. अमेरिकेत २ ते १९ वयोगटातील मुलांमधील २० टक्के मुले लठ्ठ असून त्याच्याशी या जंकफूडचा थेट संबंध आहे असेही निरीक्षण नोंदविले गेले आहे.