गार्नियरकडून परिवर्तनीय ग्रीन ब्‍युटी उपक्रम सादर ; ब्रॅण्‍डचे जागतिक पर्यावरणीय परिणाम पूर्णपणे कमी करण्‍यास सज्‍ज

स्थिरतेच्‍या संदर्भात गार्नियर वर्षानुवर्षे स्थिर व फेअर-ट्रेड घटकांचा वापर करत अधिक नैसर्गिक सुत्रीकरण निर्माण करण्‍याशी कटिबद्ध राहिली आहे. तसेच स्किनकेअर बाजारपेठेमध्‍ये प्रमाणित सेंद्रिय उत्‍पादने असणारी ही पहिली कंपनी आहे. स्थिरता उपक्रम गार्नियर ग्रीन ब्‍युटीच्‍या लाँचसह गार्नियरची अधिक पुढे जात कार्यरत असलेल्‍या सौंदर्य उद्योगक्षेत्रामध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणण्‍याची आणि आपल्‍या सर्वांसाठी परिवर्तनाच्‍या अग्रस्‍थानी राहण्‍याची इच्‍छा आहे.

  • सर्व गार्नियर उत्‍पादने आता अधिकृतरित्‍या क्रूएल्‍टी फ्री इंटरनॅशनलद्वारे प्रमाणित क्रूएल्‍टी मुक्‍त

मुंबई : आज, पर्यावरण, आरोग्‍य व सामाजिक समस्‍यांना पूर्वीपेक्षा अधिक महत्त्व दिले जात आहे. गेल्‍या वर्षी घडलेल्‍या घटना अनपेक्षित राहिल्‍या आहेत, ज्‍यामुळे ग्राहकांच्‍या अपेक्षांमध्‍ये बदल झाला आहे आणि समाजामध्‍ये ब्रॅण्‍ड्सच्‍या भूमिकेवर अधिक लक्ष केंद्रित करण्‍याची गरज निर्माण झाली आहे. तसेच, लोकांची असे ब्रॅण्‍ड्स असण्‍याची इच्‍छा आहे, ज्‍यावर ते विश्‍वास ठेवू शकतात, ते पारदर्शक असतील आणि उत्तमतेप्रती कटिबद्ध असतील.

स्थिरतेच्‍या संदर्भात गार्नियर वर्षानुवर्षे स्थिर व फेअर-ट्रेड घटकांचा वापर करत अधिक नैसर्गिक सुत्रीकरण निर्माण करण्‍याशी कटिबद्ध राहिली आहे. तसेच स्किनकेअर बाजारपेठेमध्‍ये प्रमाणित सेंद्रिय उत्‍पादने असणारी ही पहिली कंपनी आहे. स्थिरता उपक्रम गार्नियर ग्रीन ब्‍युटीच्‍या लाँचसह गार्नियरची अधिक पुढे जात कार्यरत असलेल्‍या सौंदर्य उद्योगक्षेत्रामध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणण्‍याची आणि आपल्‍या सर्वांसाठी परिवर्तनाच्‍या अग्रस्‍थानी राहण्‍याची इच्‍छा आहे.

गार्नियर १९८९ पासून पशुचाचणी विरोधातील विश्‍वाशी देखील कटिबद्ध राहिली आहे आणि आता क्रूएल्‍टी फ्री इंटरनॅशनलने ब्रॅण्‍डला त्‍यांच्‍या लीपिंग बन्‍नी उपक्रमांतर्गत मान्‍यता दिली आहे. गार्नियर हा क्रूएल्‍टी फ्री इंटरनॅशनलने लीपिंग बन्‍नी उपक्रमांतर्गत मान्‍यता दिलेला सर्वात मोठा जागतिक ब्रॅण्‍ड आहे. ही फक्‍त गार्नियरसाठीच नव्‍हे तर संपूर्ण सौंदर्य उद्योगक्षेत्रासाठी मोठी झेप आहे. लीपिंग बन्‍नी मान्‍यतेसाठी ब्रॅण्‍ड्सच्या संपूर्ण पुरवठा साखळीसह सर्व कच्‍चा माल व वैयक्तिक घटकांचे कोणत्‍याही पशु चाचणीच्‍या केसेससंदर्भात फॉरेन्सिकली चौकशी केली जाते. ब्रॅण्‍डच्‍या सर्व फिनिशिंग केलेल्‍या उत्‍पादनांना मान्‍यता दिली जाते. वैयक्तिक उत्‍पादने किंवा वस्‍तूंना स्‍वतंत्रपणे मान्‍यता देता येऊ शकत नाही.

गार्नियरसाठी जगभरातून ३,००० हून अधिक वेगवेगळे घटक देणा-या ५०० हून अधिक पुरवठादारांकडून घोषणापत्र मिळणे महत्त्वाचे होते. ही कडक प्रक्रिया खात्री देते की, ग्राहक परिपूर्ण आत्‍मविश्‍वासासह गार्नियर उत्‍पादने खरेदी करू शकतात आणि ही उत्‍पादने लीपिंग बन्‍नीच्‍या कडक निकषांची पूर्तता करतात.

गार्नियरचा उपक्रम ग्रीन ब्‍युटी हा स्थिरतेप्रती परिपूर्ण एण्‍ड-टू-एण्‍ड दृष्टिकोन आहे. गार्नियरच्‍या मूल्‍य साखळीच्‍या प्रत्‍येक टप्‍प्‍यामध्‍ये परिवर्तन घडवून आणणे, खालील क्षेत्रांमध्‍ये पर्यावरणीय परिणाम कमी किंवा निर्मूलन करणे हा उद्देश आहे:

प्‍लास्टिक व पॅकेजिंग:

  • २०२५ पर्यंत गार्नियरचा सर्व पॅकेजिंगमध्‍ये झीरो व्‍हर्जिन प्‍लास्टिकचा उपयोग करण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यामुळे दरवर्षाला ३७,००० टन प्‍लास्टिकची बचत होईल.
  • २०२५ पर्यंत सर्व पॅकेजिंग पुन्हा वापरण्यायोग्य, पुनर्चक्रण करण्यायोग्य किंवा कंपोस्टेबल असतील.

उत्‍पादन व सुत्रीकरण:

  • २०२२ पर्यंत सर्व वनस्‍पती-आधारित व नवीकरणीय घटकांचा स्थिररित्‍या स्रोत प्राप्‍त होईल.
  • २०२५ पर्यंत १०० टक्‍के गार्नियरच्‍या नवीन उत्‍पादनांचा सुधारित पर्यावरणीय प्रोफाइल असेल.

कारखाने व उत्‍पादन:

  • २०२५ पर्यंत १०० टक्‍के कार्बन न्‍यूट्रल औद्योगिक क्षेत्रे नवीकरणीय ऊर्जेचा वापर करतील.
  • औद्योगिक क्षेत्रांमधून कार्बन डायऑक्‍साइडचे उत्‍सर्जन ७२ टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे.

सोलिडरिटी सोर्सिंग:

२०२५ पर्यंत सोलिडरिटी सोर्सिंग उपक्रमाचा भाग म्‍हणून गार्नियरचे जगभरात सक्षम ८०० समुदाय असतील.

तसेच ‘लॉरिअल फॉर दि फ्यूचर’चा भाग म्‍हणून गार्नियर प्रॉडक्‍ट एन्‍व्‍हायरोन्‍मेंटल ॲण्‍ड सोशल इम्‍पॅक्‍ट ले‍बलिंगची अंमलबजावणी करणारा पहिला ब्रॅण्‍ड असेल. ग्राहकांना त्‍यांच्‍या उत्‍पादनांच्या पर्यावरणीय व सामाजिक परिणामांची माहिती देणे, त्‍यांना अधिक स्थिर निवडी करण्‍यास सक्षम करणे हा त्‍यामागील मनसुबा आहे. फ्रान्‍समध्‍ये, तसेच हेअरकेअर उत्‍पादनांवर चाचणी करण्‍यात आलेले हे लेबलिंग प्रत्‍येक उत्‍पादनाला स्रोत, निर्माण, परिवहन, वापर व पुनर्चक्रणसंदर्भात ए पासून ई पर्यंत स्थिरता स्‍कोअर देते. स्‍वतंत्र ऑडिटर ब्‍युरो वेरिटास सर्टिफिकेशन माहितीचे सत्‍यापन करते. गार्नियर हेअरकेअर उत्‍पादनांचे एन्‍व्‍हायरोन्‍मेंटल ॲण्‍ड सोशल इम्‍पॅक्‍ट लेबलिंग आंतरराष्‍ट्रीय पातळीवर सादर करण्‍यापूर्वी फ्रेंच ब्रॅण्‍डच्‍या हेअरकेअर वेबपेजवर ग्राहकांसाठी उपलब्‍ध असेल.

तसेच गार्नियरने प्‍लास्टिक प्रदूषणाच्‍या सामाजिक परिणामांसंदर्भात मदत करण्‍यासाठी प्‍लास्टिक्‍स फॉर चेंजसोबत सहयोग केला आहे. जगभरातील ३ बिलियनहून अधिक लोक संघटित कचरा संग्रहण सेवा उपलब्‍ध नसण्‍याशिवाय जगत आहेत. ही आकडेवारी पृथ्‍वीवरील एकूण लोकसंख्‍येच्‍या जवळपास निम्‍मी आहे. जगातील गरीब लोक राहणीमानासाठी हा कचरा गोळा करतात. कचरा गोळा करणा-यांमध्‍ये बहुतांश महिला आहेत, ज्‍या दारिद्र्यरेषेखालील जीवन जगतात आणि आव्‍हानात्‍मक स्थितींमध्‍ये काम करतात. या सहयोगाच्‍या माध्‍यमातून गार्नियर भारतातील कचरा गोळा करणा-या समुदायांच्‍या सर्वांगीण विकासाला पाठिंबा देईल. प्‍लास्टिक्‍स फॉर चेंज मुलांचे शिक्षण, हेल्‍थकेअर, पोषण, आर्थिक साक्षरता आणि आरोग्‍यदायी व आनंदी समुदायाच्‍या मूलभूत पाया असलेल्‍या मुली व महिलांच्‍या सक्षमीकरणाला साह्य करते.

जागतिक उपक्रमाचा भाग म्‍हणून गार्नियरने ३० वर्षांहून अधिक काळापासून समुद्री प्‍लास्टिकविरोधात कार्य करणारी एनजीओ ओशियन कन्‍झर्वन्‍सीसोबत देखील सहयोग केला आहे. गार्नियरने ओशियन कन्‍झर्वन्‍सीच्‍या ट्रॅश फ्री सीज अलायन्‍ससोबत सहयोग केला आहे. २०१२ मध्‍ये करण्‍यात आलेला हा अलायन्‍स समुद्री प्‍लास्टिक संकटासाठी वास्‍तविक, प्रभावी उपाययोजना शोधून काढण्‍यासाठी वैज्ञानिक, संरक्षक व खाजगी विभागाला एकत्र आणतो. गार्नियर प्‍लास्टिक पॅकेजिंग कमी करण्‍यासाठी/रिडिझाइन करण्यासाठी आणि समुद्रांमधील प्‍लास्टिक प्रदूषण थांबवण्‍यासाठी नाविन्‍यपूर्ण पद्धतींचा शोध घेण्‍याकरिता अलायन्‍समधील सध्‍याच्‍या सदस्‍यांसोबत सहयोग करेल.

गार्नियर ग्‍लोबल ब्रॅण्‍डचे अध्‍यक्ष एड्रियन कोस्‍कास म्‍हणाले, ”ग्रीन ब्‍युटी आम्‍ही करत असलेल्‍या व्‍यवसायामध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणेल. आमचे भागीदार, संशोधक व ग्राहकांसोबत सहयोगाने विकसित करण्‍यात आलेला हा उपक्रम मूर्त लक्ष्‍यांद्वारे अधोरेखित केलेल्‍या महत्त्वाकांक्षी ध्‍येयांच्‍या श्रेणीला दाखवतो. आम्‍ही पृथ्‍वीवरील आमचे प्रतिकूल परिणाम कमी करण्‍याचे आणि स्थिर भविष्‍यासाठी नाविन्‍यता आणण्‍याचे वचन घेतो. हा बदल होण्‍यासाठी वेळ लागेल, पण ग्रीन ब्‍युटी गार्नियरमध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणेल. आम्‍ही आशा करतो की, यामुळे सौंदर्य उद्योगक्षेत्रामध्‍ये देखील बदल घडून येईल. लीपिंग बन्‍नी उपक्रमांतर्गत क्रूएल्‍टी फ्री इंटरनॅशनलकडून अधिकृतरित्‍या मान्‍यता मिळणे हा मैलाचा दगड आहे आणि नेहमीच आमच्‍या ग्रीन ब्‍युटी मिशनचा महत्त्वपूर्ण भाग होता. आज गार्नियरने आपणा सर्वांना ग्रीन ब्‍युटी देणारा कटिबद्ध, स्थिर, पारदर्शक ब्रॅण्‍ड बनण्‍याप्रती आणखी एक ग्रीन पाऊल उचलले आहे.”

लॉरिअल इंडियाच्‍या कन्‍झ्युमर प्रॉडक्‍ट्स डिव्‍हीजनचे संचालक पंकज शर्मा म्‍हणाले, ”गार्नियर घेत असलेल्‍या जागरूकता व प्रबळ इक्विटीच्‍या आनंदासोबत ब्रॅण्‍डने त्‍याचा उद्देश व सामाजिक कटिबद्धतेला पुढे घेऊन जाणे देखील महत्त्वाचे बनले आहे. गार्नियर ग्रीन ब्‍युटी उपक्रम उत्तम व अधिक स्थिर पृथ्‍वीप्रती योगदान देण्‍याचा, तसेच आमच्‍यासह या प्रवासाला पुढे घेऊ जाऊ शकणारे आमचे ग्राहक व समर्थकांचा समुदाय बनवण्‍याचा प्रवास आहे.”

गार्नियर इंडियाचे ब्रॅण्‍ड ॲम्‍बॅसडर जॉन अब्राहम म्‍हणाले, ”मी दीर्घकाळापासून गार्नियर इंडियाशी सहयोगी राहिलेलो आहे. मला या उपक्रमाचे प्रतिनिधित्‍व करण्‍याचा अभिमान वाटत आहे. वर्षानुवर्षे आमच्‍या पर्यावरणीय संसाधनांचे परिणाम सातत्‍याने कमी करण्‍यासह आमचा दृढ विश्‍वास आहे की मोठ्या संघटित प्रयत्‍नांसाठी वैयक्तिक योगदानांमुळे ध्‍येये संपादित करण्‍यामध्‍ये मदत होईल. गार्नियर ग्रीन ब्‍युटी उपक्रमाच्‍या माध्‍यमातून आम्‍ही सर्व तरूण महत्त्वाकांक्षी भारतीयांना पुढकार घेत जीवनामध्‍ये लहान-लहान बदल घडवून आणण्‍याची, स्थिर भवितव्‍य व हरित भविष्‍याप्रती योगदान देण्‍याची संधी देत आहोत.”

ग्रीन ब्युटी उपक्रम वार्षिक जागतिक सस्‍टेनेबिलिटी प्रोग्रेस रिपोर्ट देखील सादर करतो, ज्‍यामधून गार्नियरच्‍या कटिबद्धतांमधील परिपूर्ण पारदर्शकता दिसून येते. हा अहवाल गार्नियर वेबसाइट आणि गार्नियर आज कार्यरत असलेल्‍या राज्‍यांच्‍या माध्‍यमातून सार्वजनिक पातळीवर पाहता येऊ शकतो. या अहवालामध्ये ब्रॅण्‍ड त्‍याच्‍या महत्त्वाकांक्षी २०२५ लक्ष्‍यांपर्यंत कशाप्रकारे पोहोचेल याची माहिती आहे. हा प्रोग्रेस रिपोर्ट गार्नियरच्‍या कटिबद्धतांचा सुस्‍पष्‍ट व ट्रॅक करण्‍यायोग्‍य सारांश, तज्ञ व वैज्ञानिकांच्‍या मदतीसह पूर्ण करण्‍यात आलेल्‍या कामाच्‍या यादीची माहिती देतो.

वर्ष २०२५ पर्यंत:

  • गार्नियरची सर्व उत्‍पादने झीरो व्‍हर्जिन प्‍लास्टिकसह बनवण्‍यात येणार
  • सर्व पॅकेजिंग पुन्हा वापरण्यायोग्य, पुनर्चक्रण करण्यायोग्य किंवा कंपोस्टेबल असणार
  • प्रॉडक्‍ट एन्‍व्‍हायरोन्‍मेंटल ॲण्‍ड सोशल इम्‍पॅक्‍ट लेबलिंगची अंमलबजावणी करणारा पहिला ब्रॅण्‍ड, ग्राहकांचे अधिक स्थिर निवड करण्‍यासाठी सक्षमीकरण