रात्री झोपण्याआधी पिस्ता खाणं योग्य की अयोग्य ? जाणून घ्या काय आहेत फायदे

पिस्ता हा पचनासाठी फार उत्तम मानला जातो. जो आपल्या सर्वांगीण आरोग्यासाठी खूप योगदान देतो. म्हणूनच आपल्या नियमित आहारात पिस्ता समाविष्ट करणे उत्तम असल्याचे म्हणाले जाते. रात्री चांगली झोप येण्यासाठी पिस्ता खाण्याची शिफारस केली जाते. त्यामुळे पिस्ता रात्री झोपण्याआधी नक्की खावा.

  पिस्ता खायला बऱ्याच जणांना आवडतात. कारण हे पौष्टीक आणि चवीलाही छान असतात. पिस्ता खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहे. आज आपण याचबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. पिस्ता हा पचनासाठी फार उत्तम मानला जातो. जो आपल्या सर्वांगीण आरोग्यासाठी खूप योगदान देतो.  म्हणूनच आपल्या नियमित आहारात पिस्ता समाविष्ट करणे उत्तम असल्याचे म्हणाले जाते.

  रात्री चांगली झोप येण्यासाठी पिस्ता खाण्याची शिफारस केली जाते. त्यामुळे पिस्ता रात्री झोपण्याआधी नक्की खावा. याचा उष्मांक जास्त प्रमाणात नाही. तसंच यात मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी 6 आणि प्रथिने समृद्ध आहेत. मात्र पिस्ता आरोग्यदायी आहे म्हणून त्याचं अतिसेवनही करू नका.

  काय आहेत आरोग्यदायी फायदे ?

  हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते: हिमोग्लोबिनमुळे फुफ्फुसांकडून शरीराच्या इतर भागांना ऑक्सिजनचा पुरवठा होण्यास मदत होते. व्हिटॅमिन बी ६ युक्त पिस्ता हिमोग्लोबिनच्या वाढीसाठी महत्त्वाचा ठरतो.

  २.  त्वचेसाठी उपयुक्त: पिस्ता खाणे तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरेल. कारण त्यात व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असल्याने एजिंग, यूव्ही किरणं यापासून संरक्षण होतं.

  ३. डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर: पिस्तामुळे फ्री रॅडिकल्स डॅमेज होण्यास आळा बसतो आणि त्यामुळे डोळ्यांच्या विविध आजारांपासून संरक्षण होते.

  ४. रोगप्रतिकारकशक्ती वाढते: पिस्तामध्ये असलेल्या व्हिटॅमिन बी ६ मुळे फक्त हिमोग्लोबिनची निर्मिती होण्यास मदत होत नाही तर रोगप्रतिकारकशक्ती देखील वाढते.