ताटात तीन पोळ्या वाढणे अशुभ; ‘हे’ आहे वैज्ञानिक कारण, जाणून घ्या

हिंदू धर्मात तीन पोळ्या असलेली थाळी मृतकाच्या भोजनाप्रमाणे मानली जाते. कारण, कुणाच्या मृत्यूनंतर त्यांच्या त्रयोदशी संस्कारापूर्वी पहिले भोजनाचे जे ताट वाढले जाते त्यामध्ये तीन पोळ्या एकत्र ठेवल्या जातात. हे ताट मृतकासाठी समर्पित असते आणि या ताटाला वाढणाऱ्या व्यतिरिक्त आणखी कुणीही पाहात नाही.

  नवराष्ट्र न्यूज नेटवर्क, मुंबई.

  हिंदू धर्मात ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तीन प्रमुख देवता म्हणून मानले जातात. यांना त्रिदेव म्हटले जाते. यांना सृष्टीचे निर्माणकर्ता, पालनहार आणि संहारक मानले जाते. त्यामुळे ३ हा अंक अतिशय शुभ असायला हवा. पण, पूजा-अर्चनेत, अनेक विधींमध्ये तीन या अंकाला अशुभ मानले जाते. त्याचप्रमाणे जेवणाच्या ताटात एकावेळी तीन पोळ्या वाढल्या जात नाहीत. जर कोणी असे केले तर घरातील वडिलधारी व्यक्ती त्यास मनाई करतात. कुठल्या रेस्टॉरंटमध्येही तुम्हाला कधीही एकाचवेळी तीन पोळ्या दिल्या जात नाहीत. यांची संख्या एक, दोन, चार किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते. त्यामुळे आपल्या मनात हा प्रश्न नक्की येत असेल की तीनला इतके अशुभ का मानले जाते?

  तीन पोळ्या म्हणजे मृतकाचे भोजन

  हिंदू धर्मात तीन पोळ्या असलेली थाळी मृतकाच्या भोजनाप्रमाणे मानली जाते. कारण, कुणाच्या मृत्यूनंतर त्यांच्या त्रयोदशी संस्कारापूर्वी पहिले भोजनाचे जे ताट वाढले जाते त्यामध्ये तीन पोळ्या एकत्र ठेवल्या जातात. हे ताट मृतकासाठी समर्पित असते आणि या ताटाला वाढणाऱ्या व्यतिरिक्त आणखी कुणीही पाहात नाही. त्यामुळे घरातील वृद्ध व्यक्ती ताटात तीन पोळ्या एकत्र ठेवण्यापासून रोखतात. त्याशिवाय, अशी देखील मान्यता आहे की एकत्र तीन पोळ्या ठेवून भोजन करणाऱ्या व्यक्तीच्या मनात दुसऱ्या व्यक्तीप्रती शत्रुतेचा भाव उत्पन्न होतो.

  वैज्ञानिक कारण

  जर वैज्ञानिक दृष्टीने पाहायचे झाले तर बहुतेक आरोग्य विशेषज्ज्ञांच्या मते, सामान्य व्यक्तीला दिवसभरात थोड-थोड करून खायला हवे. अशात एकावेळी भोजनाच्या ताटात एक वाटी वरण, एक वाटी भाजी, ५० ग्राम भात आणि दोन पोळ्या त्याच्या गरजेसाठी पर्याप्त आहेत. याला संतुलित डाएट मानले जाते. कारण दोन चपात्यांनी एका व्यक्तीला १२०० ते १४०० कॅलरी ऊर्जा मिळते. एकावेळी यापेक्षा जास्त भोजन करणाऱ्या व्यक्तीला आरोग्यासंबंधी अनेकप्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.