तरुणीने १८ वर्षांनी पहिल्यांदाच कापले केस ; त्याचं झालं असं की…

केइतोचे केस ५.१ फूट लांबीचे झाले होते. 'सर्वात लांब केस असलेली तरुणी' म्हणून तिच्या नावाची नोंद गिनीज बुकमध्ये झाली होती. अर्थातच, हे सन्मानजनक असले तरी इतके लांब केस वागवणे ही काही सोपी गोष्ट नव्हती.

    १८ वर्षाच्या एका जपानी तरुणीने जन्मल्यानंतर आता पहिल्यांदाच केस कापले आहेत. काजोशिमा शहरात राहणाऱ्या तरुणीचे नाव केइतो कवहारा असे आहे. जन्मल्यानंतर तिचे केस एखादी जन्मखूण असावी अशा पद्धतीने सांभाळण्यात आले होते. तिच्या कुटुंबीयांनी तिला केस कापण्याची कधीही परवानगी दिली नव्हती. त्यामुळे ते इतके वाढले की, त्याची गिनीज बुकमध्येही नोंद झाली. आता मात्र केस कापून लहान केल्याने ती खूश आहे.

    केइतोचे केस ५.१ फूट लांबीचे झाले होते. ‘सर्वात लांब केस असलेली तरुणी’ म्हणून तिच्या नावाची नोंद गिनीज बुकमध्ये झाली होती. अर्थातच, हे सन्मानजनक असले तरी इतके लांब केस वागवणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. त्यांची देखभाल वगैरे करण्यात तिचा बराचसा वेळ जात होता आणि त्याचा तिला त्रासही होत होता.

    आता तिचे हे केस कुटुंबीयांच्या परवानगीनंतर तिने कापले आहेत. तिचे केस कापण्याची ही योग्य वेळ असल्याचे तिच्या पालकांनी म्हटले होते. कॉलेजला जाण्यापूर्वीच माझे केस लहान झाल्यामुळे मी खूश आहे, असे तिने म्हटले आहे. आपल्याकडे गुजरातमधील नीलांसी पटेल या मुलीचेही केस लांब असून याबाबत तिच्याही नावावर विक्रमाची नोंद आहे. तिचे केस ५ फूट १ इंच लांबीचे आहेत.