Just a pill that will never let you grow old; Anti aging pill

म्हातारपण टाळणारी गोळी येणार येणार अशी चर्चा खूप होत आहे. पण ती गोळी नेमकी कधी येणार आणि कशी येणार, याबाबत ठोस असे काही सांगितले जात नाही. मात्र आता लंडन युनिव्हर्सिटीतील जनुकशास्त्राचे संशोधक डेम लिंडा पॅट्रीज यांनी येत्या काही वर्षात अशी गोळी बाजारात येईल, असे खात्रीशीररित्या सांगितलेले आहे. ही गोळी म्हणजे नेमके काय, या संबंधात त्यांनी काही खुलासे केले आहेत. कारण अशा प्रकारची जादुई गोळी बाजारात येणार म्हटल्यानंतर अनेकांच्या उत्सुकता ताणल्या गेल्या आहेत आणि ही गोळी म्हणजे चिरतारुण्य प्राप्त करून देणारा रामबाण इलाज आहे, असा गैरसमज निर्माण झाला आहे.

    दिल्ली : म्हातारपण टाळणारी गोळी येणार येणार अशी चर्चा खूप होत आहे. पण ती गोळी नेमकी कधी येणार आणि कशी येणार, याबाबत ठोस असे काही सांगितले जात नाही. मात्र आता लंडन युनिव्हर्सिटीतील जनुकशास्त्राचे संशोधक डेम लिंडा पॅट्रीज यांनी येत्या काही वर्षात अशी गोळी बाजारात येईल, असे खात्रीशीररित्या सांगितलेले आहे. ही गोळी म्हणजे नेमके काय, या संबंधात त्यांनी काही खुलासे केले आहेत. कारण अशा प्रकारची जादुई गोळी बाजारात येणार म्हटल्यानंतर अनेकांच्या उत्सुकता ताणल्या गेल्या आहेत आणि ही गोळी म्हणजे चिरतारुण्य प्राप्त करून देणारा रामबाण इलाज आहे, असा गैरसमज निर्माण झाला आहे.

    ही गोळी अमरत्व प्राप्त करून देणारी नाही, असे डॉ. पॅट्रीज यांनी आवर्जून सांगितलेले आहे. नेमकेपणाने सांगायचे झाले तर शरीरातले काही अवयव क्षीण होण्याची प्रक्रिया या गोळीने मंद होऊ शकते. त्याचबरोबर लोक वृद्ध झाले की, कर्करोग, अल्झायमर, मूत्रपिंडाचे विकार, हृदय विकार असे आजार त्यांना होण्याची शक्यता असते. त्यातले काही झाले नाही तरी लोक वृद्धावस्थेमध्ये अशक्त होतात, त्यांची पचन संस्था मंदावते आणि वृद्धापकाळाने अंथरुणाला बरीच वर्षे खिळून राहून हे वृद्ध लोक शेवटी मृत्युमुखी पडतात.

    वृद्धापकाळ टाळणाऱ्या गोळीने हा अंथरुणाला खिळून राहण्याचा त्रास कमी होईल, असे डॉ. पॅट्रीज यांनी नेमकेपणाने सांगितले. अशा प्रकारची गोळी उपलब्ध झाली की, लोकांचे आयुर्मान वाढेल. स्टेम सेल्स, एजिंग बायालॉजी, मॉल्युक्युलार बायो-डायनामिक्स, जेनेटिकल इंजिनियरिंग यांच्या साह्याने तसेच नवीन तंत्रज्ञाने आणि औषधे यांच्या वापराने माणसाचे जीवन अधिक सुसह्य, निरामय करण्याचे प्रयत्न होत आहेत. ते निरामय होणे म्हणजेच आयुर्मान वाढणे.

    अमेरिकेत नॅशनल इन्स्टिटयूट ऑन एजिंग या संस्थेने वृद्धत्वातल्या समस्यांवरच संशोधन सुरू केले आहे. या अवस्थेतले आरोग्याचे प्रश्‍न सुटावेत हा त्यांचा हेतू आहे. आयुर्मान वाढावे हा काही संशोधनाचा हेतू नाही पण या संशोधनाचा फायदा होऊन किंवा त्याचा बाय प्रॉडक्ट म्हणून आयुर्मान वाढणारच आहे.