काजूचे मोदक

सर्वांच्या घरी बाप्पा विराजमान झालेले आहेत. मोदक हे गणपती बाप्पांचे आवडते आहेत. तसेच प्रसाद म्हणून खायला मोदक हे सर्वांना आवडतात. मोदक आपण बऱ्याच प्रकारचे बनवू शकतो. त्यात काजूचे मोदक हे अप्रतीम लागतात. हे मोदक बनवायला अगदी सोपे आहेत. जाणून घेऊया याची सोपी रेसिपी.

साहित्य:
२ कप खवा
१ कप काजू
१ १/२ कप साखर (पिठीसाखर करून)
१ टी स्पून वेलचीपूड
१/४ कप दूध

 

कृती:
काजू दुधामध्ये एक तास भिजत ठेवा मग मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
कढईमधे खवा मंद विस्तवावर थोडासा भाजून घ्या
मग त्यामध्ये काजू पेस्ट व पिठीसाखर घालून थोडे घट्ट होई पर्यंत परतून घ्या.
घट्ट झाल्यावर विस्तव बंद करून खव्याचे मिश्रण थंड करायला ठेवा.
खव्याचे मिश्रण थंड झाल्यावर त्यामध्ये वेलचीपूड घालून मिक्स करून मळून घ्या.
मग मिश्रणाचे एक सारखे २१ गोळे बनवून मोदकाचा आकार द्या किंवा मोदकाच्या साचात घालून मोदकाचा आकार द्या.