kalu bewafa chai wala chai funny menu pic goes viral on social media
प्रेमभंग झाला असल्यास 'हा' चहा एकदा नक्की पिऊन तर पाहा; तुमच्या प्रेमाचाही विसर पडेल

काही लोकं प्रसिद्धीसाठी आपला स्टॉल आणि डिशेसला असं काही नाव देतात की, लोकं याविषयी इतरांनाही सांगतात. पण या चहावाल्याने तर फारच दूरदर्शी विचार करून आपल्या चहाची नावं ठेवली आहेत.

व्हायरल होतोय हा चहाचा मेनू

सोशल मीडियावर ‘कालू बेवफा चाय वाला’च्या मेनूने सगळ्यांनाच भुरळ घातलीये. हे वाचल्यानंतर विचार करून करून तुमच्या डोक्याचं खोबरं होईल की, हा माणूस चहात नेमकं वापरतो काय? कारण येथे मिळणाऱ्या चहाच्या नावाने लोकांचं म्हणणं आलयं की, मित्र THE FRIEND चहा विकतोयस का गळ्यातला ताईत. एक गोष्ट तर यावरून स्पष्ट होतेय की काही लोकं प्रसिद्धीसाठी आपला स्टॉल आणि डिशेसला असं काही नाव देतात की, लोकं याविषयी इतरांनाही सांगतात. पण या चहावाल्याने तर फारच दूरदर्शी विचार करून आपल्या चहाची नावं ठेवली आहेत.

तुमच्या प्रत्येक मूडसाठी इथे मिळतो चहा

 

या पोस्टरवर लिहिलं आहे- कालू बेवफा चाय वाला. सोबतच असंही लिहिलं आहे की, पत्नीने छळलेल्या पतींना या ठिकाणी मोफत चहा मिळतो. याशिवाय प्रेमात दगा दिलेल्यांना ५ रुपयांत, प्रेमी युगुलांसाठी स्पेशल चहा १५ रुपये. नव्याने प्रेमात पडलेल्यांसाठी १० रुपयांत चहा. मनकवड्या प्रेमासाठीचा चहा ४९ रुपये. एकाकी पडलेल्यांसाठीचा चहा २० रुपये, आणि हो, फ्री मध्ये चहा प्यायचा असेल तर यासाठी अफलातून कल्पना आहे की, तुमची पत्नी सोबत हवी, डेमो द्यायचा आणि फ्री चहा प्यायचा.

वाह कालू- क्या बात है!