karela man drags dog by car video goes viral police arrested him cancel his driving licence
त्याने कुत्र्यासोबत असा केला प्रताप आणि त्यानंतर पुढे काय घडलं हे तुम्हीच वाचा

स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, ज्याने हे कृत्य केलं त्या नराधमाचं नाव युसुफ आहे. आपल्या कुत्र्यामुळे तो वैतागला होता त्यानंतर त्याने हे कृत्य केलं आहे.

एखादी व्यक्ती एवढी कशी काय निर्दयी असू शकते हे त्याने केलेल्या प्रतापांवरूनच सिद्ध होते. घटना केरळची आहे. येथील एक व्हिडिओ समोर आला आहे. यात एक कुत्रा गाडीच्या मागे बांधला आहे आणि त्याला अक्षरश: फरपटत नेण्यात येत होतं. ही घटना एर्नाकुलमच्या Paravoor-Nedymbassery रस्त्यावर घडल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुक्या प्राण्यावर केलाय अत्याचार

व्हिडिओत एका कारच्या मागे कुत्र्याला बांधलं आहे. पहिल्यांदा या मुक्या प्राण्याला काय चाललं आहे याची कल्पनाही नव्हती. त्याने पळण्याचा प्रयत्न केला पण गाडीच्या वेगाने त्याला अक्षरश: फरपटत नेले. स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, ज्याने हे कृत्य केलं त्या नराधमाचं नाव युसुफ आहे. आपल्या कुत्र्यामुळे तो वैतागला होता त्यानंतर त्याने हे कृत्य केलं आहे.

तुझं काय गेलं

अखिल नावाच्या व्यक्तीने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तयार केला आहे. तो दुचाकीवर चालवत होता. त्याने या निर्दयी कृत्याबाबत युसुफला प्रश्नही विचारले पण हा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे असं उलट उत्तर मिळालं. युसूफ त्याच्यावर ओरडला. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने अखिलला असंही विचारलं की, हा कुत्रा मेला तर तुझं काय गेलं?

झाली अटक

हा अक्षरश: अंगावर काटा आणणारा प्रसंग होता. मुक्या कुत्र्याच्या गळ्यात रश्शी बांधली होती आणि त्याला वाईट पद्धतीने फरपटत नेण्यात येत होतं. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर युसुफला अटक करण्यात आली आहे. कोच्ची स्थित एका प्राण्यांच्या NGO ‘दया’ ने हा कुत्रा ताब्यात घेतला आहे. त्याची स्थिती अतिशय गंभीर होती.

कुत्रा झाला होता रक्तबंबाळ

कुत्र्याला अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या, त्याची चामडी जागोजागी सोलून निघाली होती आणि त्यातून रक्त येत होतं. त्याची हाडं बाहेर आली होती. एक दुसरा कुत्रा या कुत्र्याला वाचविण्यासाठी गाडीच्या मागे धावला, त्यालाही पकडण्यात आलं असून दोघांवरही उपचार करण्यात येत आहेत. असल्याची माहिती NGO च्या सदस्यांनी दिली. युसुफवर आणखी काय कारवाई होणार याबाबत विचारलं असता त्याचा वाहनचालक परवाना रद्द करणार असल्याचं सांगण्यात आलं.