Health Tips | मधुमेहावर गुणकारी जांभळाच्या बिया, वाचा आहेत अनेक फायदे…

मधुमेहासोबतच रक्तदाबाचा त्रास कमी करण्यास जांभूळ फायदेशीर आहे. एका अभ्यासानुसार जांभळाच्या बियांचा रस किंवा अर्क नियमित घेतल्यास रक्तदाब ३४.६टक्के नी कमी होतो. त्यात असलेले अँटिऑक्सिडंट्समध्ये रक्तदाब विरोधी गुणधर्म असतात.

  जांभूळ खाण्याचे अनेक फायदे आहेत.  जांभूळ हे औषधीय एक फळ आहे. जांभूळ हे फळ मधुमेहींसाठी उत्तम आहे. जांभळाच्या बियांमध्ये दोन प्रमुख बायोयॅक्टिव्ह कंपाउंड्स जम्बोलिन आणि जम्बोसिन असतात. त्यामुळे डायबेटिझ रुग्णांना याचा फायदा होतो. जांभूळ आणि बियांमध्ये फायबर असतं, जे वजन वजन कमी करण्यासाठी उपयोगी ठरतं. शिवाय पचनक्रियाही सुरळीत करतं.

  जांभूळ त्वचेसाठी फारच उपयोगी आहे. जांभळाची बी चेहऱ्यावरील पिम्पल्स कमी करण्यास मदत करतात. जांभूळ फळाइतकंच त्याच्या पानांमध्येही फार चांगली तत्त्वे आढळतात. दातांना मजबुती देण्यासाठी त्यांचा फायदा होतो.

  जांभळात व्हिटॅमिन सी आणि आयर्न असतं. त्यामुळे ब्‍लड हिमोग्लोबिनचा स्तर वाढतो.

  मधुमेहावर नियंत्रण :

  जांभळामध्ये अँटी डायबेटीक गुणधर्म असतात. त्यात असलेल्या अल्कोलीड्स केमिकलमुळे स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्यास आळा बसतो आणि म्हणूनच रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित राखले जाते. जांभळाच्या बिया सुकवून त्याची पावडर करा आणि दिवसातून तीनदा खा. मधुमेहावर हा अत्यंत चांगला उपाय आहे. दूध किंवा पाण्यासोबत ही पावडर सकाळी रिकाम्या पोटी घ्या. त्यामुळे देखील मधुमेह नियंत्रित राहील. हा उपाय पारंपरिक असून अतिशय परिणामकारक आहे. त्यामुळे मधुमेहाचा शरीरावर होणारा दुष्परिणाम कमी होतो.

  रक्तदाबाचा त्रास कमी होतो

  मधुमेहासोबतच रक्तदाबाचा त्रास कमी करण्यास जांभूळ फायदेशीर आहे. एका अभ्यासानुसार जांभळाच्या बियांचा रस किंवा अर्क नियमित घेतल्यास रक्तदाब ३४.६टक्के नी कमी होतो. त्यात असलेले अँटिऑक्सिडंट्समध्ये रक्तदाब विरोधी गुणधर्म असतात.

  पोटाच्या विकारांवर उपयुक्त

  पचन संस्था स्वच्छ करण्यासाठी आणि पोटाचे विकार दूर करण्यासाठी जांभूळ उपयुक्त ठरतं. बियांचा अर्क जखम किंवा आतड्यातील अल्सर  आणि गॅस्ट्रो इन्फेकशन दूर करण्यास फायदेशीर आहे. जुलाब झाल्यास जांभळाच्या बियांची पावडर साखरेत मिसळून दिवसातून २-३ वेळा घ्या.