हे आहेत ‘ब्लॅक टी’ चे चकीत करणारे फायदे, एकदा पिऊन तर बघा!

अनेकांना सकाळी उठल्या उठल्या चहाचा कप हातात लागतो. चहा प्यायला शिवाय त्यांच्या दिवसाची सुरूवातच होत नाही. पण बरेचवेळा अति चहाच्या सेवानाने त्रासही सहन करावा लागतो. त्यामुळे बरेचजण ब्लॅक टी घेण्याला प्राधान्य देतात.

  हे आहेत ब्लॅक टीचे फायदे

  १. काळा चहा प्यायल्याने मुतखड्यापासून संरक्षण मिळते. ज्या स्त्रिया नियमित ब्लॅक टी घेतात त्यांच्यामध्ये किडनी स्टोन होण्याची शक्यताही कमी असते.

  २. फुफुस्साच्या कर्करोगावर काळा चहा वरदान ठरू शकतो. नियमित काळा चहा प्यायल्यामुळे हा कॅन्सर टाळता येऊ शकतो.

  ३. ब्लॅक टीमुळे कोलेस्टेरॉलची पातळी सामान्य राहण्यास मदत होते. जर ब्लॅक टीमुळे संतुलित आणि कमी चरबीयुक्त आहारासोबत घेत असल्यास, कोलेस्ट्रॉल संतुलित असण्याचे परिणाम दिसून येतात.

  ४. काळ्या चहामध्ये असणाऱ्या विशिष्ट घटकांमुळे उत्साह वाढण्यास मदत होते. त्यामुळे कार्यक्षमता देखील वाढविण्यास मदत होते.

  ५. काळा चहा मधुमेहासारख्या आजाराला लांब ठेवू शकतो. विशेष म्हणजे काळ्या चहाचे सेवन करणाऱ्यांमध्ये मधुमेह खूपच कमी प्रमाणात आढळतो.

  ६. तज्ज्ञांच्या मते ब्लॅक टीचे सेवन केल्यास वयानुसार हाडाच्या ज्या समस्या आहे, ते ब्लॅक टीच्या सेवनाने दूर होण्यास मदत होते.

  ७. ब्लॅक टीचा वापर दाहक आतड्यांसंबंधी आजारामुळे पोट संबंधित समस्या दूर करण्यास मदत होते.

  ८. ब्लॅक टी मध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याचे गुणधर्म असतात. या गुणधर्मामुळे, ब्लॅक टी आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर ठरतो.