बटाट्याच्या सालींचा वापर करून पांढऱ्या केसांपासून मिळवा मुक्ती

तज्ज्ञांच्या मते, हा उपाय अनेक वर्षांपासून वापरात आहे. बटाट्याच्या सालीत स्टार्च एका नैसर्गिक स्वरुपात काम करतो. बटाट्याच्या सालींच्या हेअर मास्क मध्ये व्हिटामिन-ए, बी आणि सी केसांवर असलेला तेलाचा अंश काढून टाकून डोक्यात कोंडा (डँड्रफ) होऊ देत नाही.

  आजकाल अकाली केस पांढरे होणे, केस गळणे ही एक सर्वसामान्य समस्याच झाली आहे. अशातच यापासून मुक्ती मिळवायची असेल तर अनेकदा लोक केमिकलयुक्त रंगाचा वापर करतात. याचे दुष्परिणाम असे होतात की, केस गळती सुरू होते आणि ते कोरडे होवी लागतात. केस निस्तेज होऊ लागतात आणि त्यांची जुनी चमक आणि दमकही संपून जाते. जर आपल्या केसांसोबत असंच काहीसं होत असल्यास एकदा बटाट्याच्या सालींचा वापर करून पाहा. हा केस काळे करण्याचा नैसर्गिक उपाय आहे. तर जाणून घेऊया याविषयी…

  • हेअर मास्क तयार करण्यासाठी सर्वप्रथम बटाट्याच्या साली काढून घ्या. या साली थंड पाण्यात घालून १० मिनिटे उकळत ठेवा. उकळल्यानंतर हे पाणी पूर्ण थंड होऊ द्या. हे पाणी गाळून घेऊन एखाद्या बाटलीत ठेवा.
  • हे पाणी आपल्या केसांवर हळूहळू ५ मसाज केल्यानंतर काही काळासाठी ते केसांवर तसेच राहू द्या. हे बटाट्याच्या सालींचं काढलेलं पाणी ३० मिनिटे केसांवर तसेच ठेवा. यानंतर थंड पाण्याने केस धुवा.
  • तज्ज्ञांच्या मते, हा उपाय अनेक वर्षांपासून वापरात आहे. बटाट्याच्या सालीत स्टार्च एका नैसर्गिक स्वरुपात काम करतो. बटाट्याच्या सालींच्या हेअर मास्क मध्ये व्हिटामिन-ए, बी आणि सी केसांवर असलेला तेलाचा अंश काढून टाकून डोक्यात कोंडा (डँड्रफ) होऊ देत नाही.
  • एवढंच नाही बटाट्यात लोह, झिंक, पोटॅशियम आणि कॅल्शियम सारखी अनेक खनिजद्रव्ये असल्याने केसांची गळतीही यामुळे कमी होते.
  • ही पद्धत आठवड्यातून एकदा किंवा दोनदा अवलंबल्यास लवकरच फरक पडेल. बटाटे केसांसाठी एका नैसर्गिक कंडिशनरचेही काम करतात.
  • आठवड्यात ३-४ वेळा केसांना बटाट्याच्या सालीचा ज्यूस किंवा त्याची पेस्ट लावल्याने केसांना चमक येते आणि ते सिल्की होतात.

  आपण या सामान्य घरगुती उपायांचा अवलंब करून केस अकाली पांढरे होण्यापासून वाचवू शकता.