जाणून घ्या अंबानी कुटुंबियांचा दिनक्रम; असा असतो अंबानींच्या घरी जेवणाचा मेनू

बहुदा अनेक अतिश्रीमंत लोकं परदेशी जाताना आपले शेफ सोबत घेऊन जातात. तुमच्यापैकी बर्‍याच जणांच्या मनात असा विचार आला असेल की अंबानी कुटुंब देखील जिथे जिथे प्रवास करत असतील तिथे आपला शेफ किंवा महाराज यांना सोबत घेत असतील.

    मुकेश अंबानींचे (Mukesh Ambani) कुटुंब देशातले सर्वात श्रीमंत कुटुंब आहे. अनेकांना त्यांच्या जीवनशैलीबद्दल आकर्षण आहे तर अनेकांना त्यांच्याबद्दल कुतूहलही आहे. माध्यमांमधून त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक अनेक गोष्टी बाहेर येत असतात.

    सर्वसामान्य व्यक्ती पैसे कामवितो ते दोनवेळच्या पोटाची खळगी भरण्यासाठी, अशावेळी अंबानी कुटुंबियांच्या घरी रोज काय शिजत असेल (menu at Ambani’s house) हा प्रश्न सर्वसामान्यांना निश्चितच पडला असेल. तसेच सर्वसामांप्रमाणे त्यांना भाजीचा भाव इत्यादी माहिती असेल का? असाही प्रश्न पडल्यावाचून राहणार नाही. जाणून घेऊया अंबानी कुटुंबियांच्या जीवनशैलीबद्दल.

    नीता अंबानी सकाळी उठल्यावर ३ लाख रुपयांचा फक्त चहाच पितात अशी बातमी झळकली होती. त्यावरून अनेकांनी सुतावरून स्वर्ग गाठला होता, परंतू सत्य हे त्यापेक्षा थोडे निराळे आहे.

    मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांची वर्तमानपत्रात स्तंभलेखन करणाऱ्या एका पत्रकाराने  मुलाखत घेतली होती, एका मासिकाच्या अंकासाठी त्यांनी नीता अंबानी यांच्याशी गप्पा मारल्या आणि नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्या दैनंदिन जीवनाबद्दल काही खरोखर मनोरंजक गोष्टी समोर आल्या.

    आपल्याला वाटत असेल की एवढ्या श्रीमंत असलेल्या नीता अंबानी किचन मध्ये पाऊल देखील ठेवत नसतील. जर तुम्ही असा विचार करत असाल तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात.

    नीता अंबानी स्वत: जातीने किचनमध्ये लक्ष देतात

    नीता अंबानी म्हणातात, “मी स्वत: चे घर स्वतः चालविते. मला माहित आहे की रसिकभाऊ भाजीवाला प्रत्येक भाजीसाठी किती शुल्क आकारतात ते.”

    रसिकभाई कफ परेडमध्ये भाजी विक्रेते आहेत.अंबानी कुटुंब ताज्या, सेंद्रिय आणि विषारी नसलेल्या भाजीपाला घेण्यावर भर देतात. रसिकभाईंचे दरमहा बिल सुमारे ३५००० रुपये एवढे असते.

    अंबानी कुटुंब रात्रीचे जेवण नेहमी एकत्रित करते

    मुकेश अंबानी घरी कितीही उशीरा आले तरी सगळे जण रात्रीचे जेवण एकत्रच करतात. कधी कधी तर मुकेश अंबानी यांना घरी यायला मध्यरात्र होते तरी त्यांचा हा नियम ते मोडत नाहीत

    त्यांच्या डिनर मेनूबद्दल बोलताना नीता अंबानी यांनी सांगितले की मुकेश अंबानी बाजरीची भाकरी, लसूण चटणी, डाळ आणि कांद्याची भाजी खाणे पसंत करतात. स्वतःबद्दल बोलताना नीता अंबानी यांनी सांगितले की त्या रात्री घी नसलेला ठेपला खाणे जास्त पसंत करतात.रविवारी सकाळी नाश्त्याला शक्यतो डोसा आणि इडली हे दक्षिण भारतीय पदार्थ असतात.

    बहुदा अनेक अतिश्रीमंत लोकं परदेशी जाताना आपले शेफ सोबत घेऊन जातात. तुमच्यापैकी बर्‍याच जणांच्या मनात असा विचार आला असेल की अंबानी कुटुंब देखील जिथे जिथे प्रवास करत असतील तिथे आपला शेफ किंवा महाराज यांना सोबत घेत असतील. पण असं काही नाही. नीता अंबानी यांनी स्पष्ट केले की ते त्यांचा वैयक्तिक शेफ कुठेही सोबत घेत नाहीत.

    लॉंग ड्राइव्ह, आवडती गाणी आणि आईसक्रिम

    थोडासा छान वेळ एकत्र घालविण्याविषयी बोलताना नीता अंबानी सांगतात की त्या रात्री उशिरा वरळी सी फेसला मुकेश अंबानी सोबत जातात. रात्री उशिरा वरळी सी फेसचा तो सुंदर नजारा कोरस मध्ये चालू असलेल्या आवडत्या गाण्यांमुळे अजून खास बनतो आणि त्यावर आईस्क्रीमचा आस्वाद