प्रत्येक आई-बाबांनी आपल्या मुलीला लग्नाआधी शिकवायलाच हव्यात या गोष्टी; जाणून घ्या सविस्तर

प्रत्येक आई-बाबांचं स्वप्नं असतं की, त्यांच्या मुलीचं लग्नानंतरचं आयुष्य आनंदात जगावं. अशातच आवश्यक आहे की, लग्नाआधीच काही गरजेची शिकवण आणि ज्ञान दिलं जावं. चला तर जाणून घेऊया लग्नाआधी आपल्या मुलींना आई-बाबांनी काय शिकवणं गरजेचं आहे.

  हिंदू धर्मात मुलीला लक्ष्मीचा दर्जा दिला आहे. असं म्हणतात की, ज्या घरात मुली असतात तेथे नेहमीच सुखशांती आणि भरभराट होत असते. मुली आपल्या वडिलांच्या अतिशय लाडक्या आणि प्रेमळ असतात. त्यांचं नातं अतिशय सुंदर आणि प्रेमाचे असते. आई-मुलीच्या नात्याप्रमाणेच वडील आणि मुलीचं नातंही मैत्रीचं होऊ शकतं. असं म्हणतात की, प्रत्येक वडील आपल्या मुलीचा आनंद आणि गरजा लक्षात घेत त्यांचे पालन-पोषण करतो. सोबतच एका आईप्रमाणेच तिच्या लग्नाचीही स्वप्नं पाहात असतो.

  प्रत्येक आई-बाबांचं स्वप्नं असतं की, त्यांच्या मुलीचं लग्नानंतरचं आयुष्य आनंदात जगावं. अशातच आवश्यक आहे की, लग्नाआधीच काही गरजेची शिकवण आणि ज्ञान दिलं जावं. चला तर जाणून घेऊया लग्नाआधी आपल्या मुलींना आई-बाबांनी काय शिकवणं गरजेचं आहे.

  • लग्नानंतर एका मुलीला वेगवेगळ्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. अशातच एका बाबांचं कर्तव्य आहे की, मुलीला चांगल्या-वाईटाची शिकवण द्यावी. याशिवाय तिला संकटात आणि अडचणीत घाबरण्याऐवजी स्वत:चा आत्मविश्वास वाढवायला शिकवायला हवं.
  • सासू-सासऱ्यांना आपल्या आईवडिलांप्रमाणेच वागवावं. त्यांचा आदर करावा त्यांच्या गरजांकडे लक्ष द्यावे. यामुळे लग्नानंतर सासरच्या मंडळींच्या मनात तिला मानाचं स्थान मिळतं.
  • भलेही लग्नाआधी मुलीला हवं तसं ती वागत असेलही, पण लग्नानंतर सासरी कोणासोबतही हट्ट आणि वाद टाळावेत. सोबतच आपली मतं इतरांवर लादू नयेत. यामुळे नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते.
  • प्रत्येक घराचे वेगवेगळे रिती-रिवाज असतात. अशातच तिने सासरच्या रुढी-परंपरा समजून घेत त्याच्याशी एकरुप होण्याचा प्रयत्न करावा. अशातच सासरच्या मंडळींच्या मनात तिच्याविषयी आदर निर्माण होईल.