व्हॅन ह्युसेनच्या वतीने नवीन सब-ब्रँड ‘डेनिम लॅब्ज’ लाँच; अगदी नवीन कोरी डेनिम ऑफर

युवा व्यावसायिकांना लक्षात घेऊन व्हॅन ह्युसेन डेनिम लॅब्जने खऱ्या अर्थाने मुक्त हालचाली सोबतच सध्याची स्टाईल आणि आरामाचा विचार करून नजरेत भरतील अशास्वरूपाच्या साजेशा डिझाईन तयार केल्या आहेत. या ब्रँडला वर्क-वेयर कॅटेगरीचा १२८ वर्षांहून अधिकचा समृद्ध अनुभव आहे. फॅशन आणि फंक्शनेबिलिटीकरिता नावाजलेल्या नवीन-कोऱ्या सब-ब्रँडची उत्पादने आराम, कामगिरी आणि इर्गोनॉमिक्सचा सुयोग्य मेळ उपलब्ध करून देतात.

  • आधुनिक काळातील व्यावसायिकांसाठी खास तयार केलेले
  • ब्रँड ॲम्बेसेडर ‘जॅकलीन फर्नांडिस’चा सहभाग असलेल्या‘मूव्ह इन द न्यू ब्ल्यू’कॅम्पेनचे प्रकाशन

मुंबई : आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड’चा व्हॅन ह्युसेन हा भारताचा अग्रगण्य पॉवर ड्रेसिंग ब्रँड असून त्यांच्या वतीने आज नवीन सब-ब्रँड ‘डेनिम लॅब्ज’ लाँचची घोषणा करण्यात आली. व्हॅन ह्युसेन डेनिम लॅब्ज नवीन युगाच्या डेनिममधील करिश्मा आहे. ज्यांना काम आणि खेळ त्यांच्यात सुलभ परिवर्तन लागते अशा आजच्या युगातील व्यावसायिकांकरिता खास हा ब्रँड तयार करण्यात आला आहे. या ब्रँडच्या वतीने ‘मूव्ह इन द न्यू ब्ल्यू’ या शीर्षकाचे कॅम्पेन सुरू केले. ज्यामध्ये ब्रँडला चेहरा समोर येणार आहे. त्याकरिता भारताची अग्रगण्य बॉलीवूड स्टार जॅकलीन फर्नांडिस’ची निवड करण्यात आली.

युवा व्यावसायिकांना लक्षात घेऊन व्हॅन ह्युसेन डेनिम लॅब्जने खऱ्या अर्थाने मुक्त हालचाली सोबतच सध्याची स्टाईल आणि आरामाचा विचार करून नजरेत भरतील अशास्वरूपाच्या साजेशा डिझाईन तयार केल्या आहेत. या ब्रँडला वर्क-वेयर कॅटेगरीचा १२८ वर्षांहून अधिकचा समृद्ध अनुभव आहे. फॅशन आणि फंक्शनेबिलिटीकरिता नावाजलेल्या नवीन-कोऱ्या सब-ब्रँडची उत्पादने आराम, कामगिरी आणि इर्गोनॉमिक्सचा सुयोग्य मेळ उपलब्ध करून देतात.

व्हॅन ह्युसेन डेनिम लॅब्ज शर्ट, ट्राऊजर्स, लेअरींग पीस जसे की, ट्रकर्स, जाकीट आणि ब्लेझर्सची संपूर्ण श्रेणी महिला आणि पुरुषांकरिता देऊ करते. या कलेक्शनमध्ये आकर्षक स्टाईल प्रकार जसे की, अधिकाधिक पकड आणि आकर्षक बांध्यासाठी समोच्च कंबर, याची शिलाई अधिक टिकाऊ आहे, हालचाल सोपी रहावी म्हणून पॉवर स्ट्रेच आणि सहज हात जातील अशी पाकिटे. या डेनिम स्किनी, सलीम आणि रेग्युलर अशा वेगवेगळ्या फिट्समध्ये उपलब्ध आहेत. सगळी उत्पादने निवडक वॉश आणि फिनिशमध्ये उपलब्ध आहेत.

व्हॅन ह्युसेनच्या वतीने डेनिम लॅब्ज ब्रँडचा प्रचार करण्यासाठी ‘मूव्ह इन द न्यू ब्ल्यू’ कॅम्पेनचे प्रकाशन करण्यात आले. यामध्ये जॅकलीन ही व्हॅन ह्युसेन डेनिम लॅब्जची निरनिराळी डेनिम घालून नाचते, स्ट्रेच करते, डोलते, गिरक्या घेते, या फिल्ममध्ये सर्वांकरिता सगळ्या प्रसंगी शोभून दिसतील अशा समृद्ध श्रेणीतील स्टाईलिश डेनिमची विस्तृत श्रेणी, आजच्या स्टाईलचा मूड आणि सजग ग्राहकांचा आराम चित्रित करण्यात आला आहे. हे कॅम्पेन टेलिव्हिजन, प्रिंट आणि डिजिटल अशा विविध माध्यमांत प्रसारित करण्यात येणार आहे.

या कॅम्पेनची संकल्पना फेमस इनोव्हेशनची असून हे नव्याने घोषणा करण्यात आलेला सब-ब्रँड डेनिम लॅब्जकरिता पहिलेच कॅम्पेन आहे. हा नवीन सब-ब्रँड महिला आणि पुरुषांसाठीची अभिनव स्टाईल व फॅशनची डेनिम वेअर श्रेणी घेऊन आला आहे. व्हॅन ह्युसेनने युवा भारतीय ग्राहकांच्या प्रत्येक मूडकरिता कलेक्शन तयार केले आहे, यामधील फॅशन श्रेणी सुटसुटीत हालचाल आणि आराम प्रदान करणारी आहे. डेनिम लॅब्जच्या लॉन्चसह, व्हॅन ह्युसेनने नवीन दमाची बोल्ड, स्टाईलबाज, आरामदायक आणि खेळकर डेनिम सादर केली.

नवीन ब्रँडच्या लॉन्चप्रसंगी बोलताना व्हॅन ह्युसेनचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर अभय बहुगुणे म्हणाले की, “आमच्या असे लक्षात आले की, युवा भारतीयांना आरामदायक आणि वापरायला सुटसुटीत डेनिम वेअर आवडतात. त्यांची ही नवीन पसंती ओळखून आम्ही सुधारणा करण्यास सुरुवात केली. आमचा नवीन डेनिम सब-ब्रँड लॉन्च करण्याची हीच योग्य वेळ आहे. डेनिम लॅब्जने व्हॅन ह्युसेनची अस्सलता आणि वारसा छान जपलेला दिसतो. त्यांची उत्पादने काळाला साजेशी असून आजच्या आश्वासक युवकांच्या व्यक्तिमत्वावर खुलून दिसणारी आहेत. आमचा नवीन ब्रँड स्वत:ला प्रोत्साहन देत राहणारा, जिद्दी, स्टाईलबाज, तंत्रज्ञान-स्नेही, महत्त्वाकांक्षी आणि सकारात्मक युवकांना नजरेसमोर ठेवून बाजारात आणलेला आहे. डेनिम लॅब्जच्या शुभारंभासह देशातील युवा व्यावसायिकांसाठी सर्वात पसंतीचा डेनिम ब्रँड उपलब्ध करून देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”

“या कॅम्पेनसह आम्हाला पाहणारे प्रेक्षक आमचे खेळकर आणि स्टाईलबाज डेनिम लॅब्जची उत्पादने स्वत:च्या वॉर्डरॉबमध्ये सजवायला उत्सुक असतील याची खात्री वाटते. जॅकलीन’ने मूव्ह इन द न्यू ब्ल्यू’ कॅम्पेन खऱ्या अर्थाने जिवंत केले आहे. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक या कॅम्पेनला नक्कीच दाद देतील”, असे बहुगुणे यांनी पुढे सांगितले.

या कॅम्पेनकरिता आपल्या सहभागाविषयी बोलताना जॅकलीन फर्नांडीस सांगते की, “व्हॅन ह्युसेन कुटुंबाशी जोडले जाणे आणि या ब्रँडच्या नवीन वेंचरचा भाग होताना मला फार आनंद वाटतो. व्हॅन ह्युसेन डेनिम लॅब्जचे प्रतिनिधित्व करणे माझ्या दृष्टीने जोशपूर्ण आहे. हे उत्पादन माझ्या स्वत:च्या फॅशनच्या कल्पना आणि विचारांना पूर्णपणे साजेसे आहे. व्हॅन ह्युसेन डेनिमचे रांगडेपण, सळसळत्या तरुणाईचा रुबाब आणि नव्या दमाची स्पंदने मला भावली आहेत. या कॅटेगरीत नवीन कोड आला आहे. डेनिम लॅब्ज आधुनिक स्त्री-पुरुषांना सर्वोच्च उंचीची स्टाईल आणि आरामाने दिमाखदार रुबाब सिद्ध करायला मदतीचा ठरेल.”

फेमस इनोव्हेशन्सच्या बिझनेस हेड मिथिला सराफ म्हणाल्या की, “आम्ही डेनिम लॅब्जच्या साथीने व्हॅन ह्युसेनकरिता उर्जावान, लक्षवेधी आणि तरुण स्पंदनांसमवेत नवीन शिखरांचा वेध घेतला आहे. हा ब्रँड वैविध्यपूर्ण, धडाकेबाज आणि स्टाईलच्या मर्यादा विस्तारतो आणि हे कॅम्पेन धमाल, हलकी-फुलकी आणि मनोरंजक पद्धतीने तयार करण्यात आले. हे कॅम्पेन ग्राहकांच्या मनात बसेल आणि लोकांना व्हॅन ह्युसेन डेनिम लॅब्जची उत्सुकता वाटेल ही आशा आम्ही करतो.”

व्हॅन ह्युसेन डेनिम लॅब्ज 200+ खास ब्रँड आउटलेट, मल्टी- ब्रँड रिटेल आणि vanheusenindia.com वर खरेदीकरिता उपलब्ध आहे. हे कलेक्शन ई-कॉमर्स मंचांवर देखील उपलब्ध होणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.