व्हॅलेंटाईन डे नंतर का साजरा केला जातो अँटी व्हॅलेंटाईन वीक; जाणून घ्या

प्रेम हा सुखद अनुभव आहे आणि याचाच आनंद घेत आपण व्हॅलेंटाईन वीक साजरा करतो. हा आठवडाच मुळी आपल्या पार्टनरसोबत आपले नाते अधिक दृढ करणे आणि त्याच्या जीवनात एक-दुसऱ्याची उपस्थिती हाच भेटी-गाठीचा हेतू असतो.

    फेब्रुवारी महिना सुरू झालाय आणि आपल्याला तर माहितीये व्हॅलेंटाइन आठवडाही येतोय. पण व्हॅलेंटाईन आठवडाभर सेलिब्रेशन केल्यानंतर, पुढे काय? तुम्हाला ठाऊक आहे का आणखी एक आठवडा तुमची वाट पाहतोय? आपण त्याला अँटी व्हॅलेंटाईन वीक असं संबोधतो. असे बरेचसे कपल्स आहेत जे आपल्या जोडीदारासोबत एकनिष्ठ राहतात पण हे जग खूप मोठं आहे आणि प्रत्येकजण हा एकसारखा असूच शकत नाही. प्रत्येक जण दिलेलं प्रॉमिस पूर्ण करेलच याची काहीही खात्री देता येत नाही हेच प्रमुख कारण आहे की या जगात अनेकजण असेही आहेत की ज्यांचा प्रेमभंग झाला आहे.

    अँटी व्हॅलेंटाईन डे २०२१ च्या दिवसांची यादी

    व्हॅलेंटाईन वीक नंतर लगेचच अँटी व्हॅलेंटाईन वीकही असतो. तर जाणून घेऊयात कोणत्या दिवशी काय सेलिब्रेशन केलं जातं.

    १५ फेब्रुवारी २०२१ सोमवार स्लॅप डे
    १६ फेब्रुवारी २०२१ मंगळवार किक डे
    १७ फेब्रुवारी २०२१ बुधवार परफ्युम डे
    १८ फेब्रुवारी २०२१ गुरुवार फ्लर्टिंग डे
    १९ फेब्रुवारी २०२१ शुक्रवार कन्फेशन डे
    २० फेब्रुवारी २०२१ शनिवार मिसिंग डे
    २१ फेब्रुवारी २०२१ रविवार ब्रेकअप डे

    अँटी व्हॅलेंटाईन डे- या दिवसांबद्दल सविस्तर जाणून घेऊया

    स्लॅप डे :

    व्हॅलेंटाईन डे च्या दुसऱ्या दिवशी स्लॅप डे साजरा केला जातो. जे लोकं सिंगल आहेत ते आपल्या मित्र-मैत्रीणीला थप्पड मारून हा दिवस साजरा करतात. स्लॅप डे फक्त मनोरंजनासाठी असतो आणि या दिवशी मजेशीर खेळ खेळायला हवेत. कपल्ससाठी कोणतेही नुकसान नाही आणि ते हा दिवस नक्कीच साजरा करू शकतात पण आम्ही तुम्हाला हळूवार थप्पड मारण्याचा सल्ला देतो.

    किक डे :

    लोकांसाठी एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवणं आणि प्रेमभंग होणं सामन्य गोष्ट आहे. अनेकजण असेही असतात जे रिलेशनमध्ये असूनही आपल्या जोडीदाराला धोका देतात. जर तुमचा जोडीदार असं काही करत असेल तर आम्ही आपल्याला त्याला तुमच्या जीवनातून बेदखल करण्याचा सल्ला देतो. स्लॅप डे सारखाच हा दिवसही आपल्या मित्रांसोबत मजेत घालवता येईल.

    परफ्युम डे :

    आपल्याला आधीच सावध केलं होतं की आपल्या जोडीदाराला हळूवारपणे थप्पड मारा पण तुम्ही ऐकलं नाहीत मग आता त्याची मनधरणी करण्यासाठी सज्ज व्हा. आपण त्यांना परफ्युम देऊन त्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहू शकता. आपल्या पार्टनरला परफ्युम देऊन हा दिवस साजरा केला जातो. तिला एक गोड परफ्युम गिफ्ट करा आणि त्यावर “सॉरी” हा शब्द लिहिण्यास विसरू नका.

    फ्लर्टिंग डे :

    जसं की नाव ऐकून तुम्हाला कळलं असेलच, हा थट्टामस्करीसाठीच तयार झालेला आहे. जर तुम्ही तुमच्या क्रश सोबत चर्चा करत असाल तर हा दिवस तुमच्यासाठी एक बहाणा आहे असं म्हणायला हरकत नाही आणि काहीतरी थट्टामस्करी करा पण ती चांगली असायला हवी. याशिवाय जर तुमचा प्रेमी किंवा प्रेमिका नाराज असेल, तर तुम्ही त्याच्याशीही काहीतरी थट्टा मस्करी करू शकता आणि त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकता.

    कन्फेशन डे :

    जेव्हा तुम्ही तुमच्या भावना आपल्या क्रशच्या समोर जाहीर करा. अविवाहित लोकांना आपलं नशीब आजमावण्यासाठी कॉन्फेशन डे साजरा केला जातो. जर तुम्ही लाजाळू व्यक्ती असाल, तर आम्ही आपल्याला सल्ला देतो की, तुम्ही तुमच्या चौकटीतून बाहेर या आणि ते सर्व काही सांगा जे आपल्या क्रशला तुम्हाला सांगायचं आहे.

    मिसिंग डे :

    जर तुमचा प्रेमी किंवा प्रेमिका तुमच्यावर नाराज असेल तर हा दिवस विशेषत: अशाच व्यक्तींच्या स्मरणार्थ साजरा केला जातो ज्याच्यावर जीवनात तुम्ही सर्वाधिक प्रम करता. आम्हाला ठाऊक आहे की प्रत्येक गोष्टीचा अंत सुखद नसतो पण असे लोक आहेत जे नुकतेच आपल्या EX आणि त्याच्या OKAY च्या प्रेमात आहेत. सिंगल्स साठी, या दिवशी आपल्या चुकांच्या आठवणींचे स्मरण करण्यासाठी साजारा केला जातो ज्या त्यांनी रिलेशनशीपमध्ये असताना केल्या आहेत.

    ब्रेकअप डे :

    लोक तात्पुरते असतात आणि म्हणून त्यांचे प्रेमही तथाकथित असते. आपण चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केले आहे ही आपली चूक नाही परंतु त्यांचे नुकसान आहे. एखादा चुकीचा माणूस आपण इतरांवर प्रेम करण्याचा मार्ग बदलू शकत नाही आणि जर आपल्या जोडीदाराकडून आपल्याला तेच प्रेम मिळत नसेल तर या दिवशी वेगळं झालेलंच बरं.

    अँटी व्हॅलेंटाईन आठवड्याचा शेवटचा दिवस लोकांना या जगात त्यांची वास्तविक किंमत सांगण्यासाठी असतो. आपले नातेसंबंध आधीपासूनच बिघडलेले असतील तर तुम्ही यातून बाहेर पडा. आम्हाला ठाऊक आहे की, ही एवढी सोपी गोष्ट नाहीये पण तुम्हाला ती करावीच लागेल. आपल्या प्रेमाला मोल नाही ते अमूल्य आहे जो व्यक्ती हे जाणतच नसेल तर तो यासाठी तो लायकच नाही.

    तात्पर्य :

    प्रेम हा सुखद अनुभव आहे आणि याचाच आनंद घेत आपण व्हॅलेंटाईन वीक साजरा करतो. हा आठवडाच मुळी आपल्या पार्टनरसोबत आपले नाते अधिक दृढ करणे आणि त्याच्या जीवनात एक-दुसऱ्याची उपस्थिती हाच भेटी-गाठीचा हेतू असतो. तथापि, ही एक खेदाची गोष्ट देखील आहे की, प्रत्येक नातेसंबंध ही एक काल्पनिक कथा नसते आणि ती आमच्यासाठी आपल्यासाठी अँटी-व्हॅलेंटाईन वीक देखील आहे हे सांगायला हवं. व्हॅलेंटाईन वीक आपल्याला प्रेमाच्या उज्ज्वल भविष्याकडे नेईल, तर अँटी-व्हॅलेंटाईन डे आपल्याला वास्तविकता सांगेल.