लोकमान्य टिळक : केसरी, मराठा वृत्तपत्रांचा प्रारंभ

पत्रकारिता आणि टिळक यांचा खूप जुना संबंध आहे. पत्रकारिता क्षेत्रात कार्य करण्यासाठी त्यांनी केसरी व मराठा ही दोन वृत्तपत्रे सुरू केली. केसरी वृत्तपत्र मराठी भाषेत होते तर मराठा वृत्तपत्राची भाषा ही इंग्रजी होती. इ. स. १८८१ साली आगरकर, चिपळूणकर आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने ही वृत्तपत्रे प्रसिद्ध केली होती.

पत्रकारिता आणि टिळक यांचा खूप जुना संबंध आहे. पत्रकारिता क्षेत्रात  कार्य करण्यासाठी त्यांनी केसरी व मराठा ही दोन वृत्तपत्रे सुरू केली. केसरी वृत्तपत्र मराठी भाषेत होते तर मराठा वृत्तपत्राची भाषा ही इंग्रजी होती. इ. स. १८८१ साली आगरकर,  चिपळूणकर आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने ही वृत्तपत्रे प्रसिद्ध केली होती. आजूबाजूला घडत असलेल्या घटनांचा भारतीय समाजाला निरपेक्ष ब अहवाल देणे हा केसरीचा मुख्य उद्देश होता तर मराठा वृत्तपत्र हे शिक्षित भारतीय समजासाठी होते. 

 जनतेला स्वातंत्र्य चळवळीसाठी उद्युक्त करणे व सामाजिक परिवर्तनांसाठी जनजागृती करणे या विचारांनी केसरी सुरू झाले. केसरीमधून त्या काळातील राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य तसेच समकालीन मराठी साहित्याची परीक्षणे प्रकाशित होत असत. मराठा वृत्तपत्र हे मुख्यत: शिक्षित भारतीय समाजासाठी होते. त्यामध्ये देश-विदेशातील घटना व त्यांवरील भाष्य छापून येत असे. दोन्ही वर्तमानपत्रे भारतीयांमध्ये खूप लवकर लोकप्रिय झाली. इ.स. १८८२च्या अखेरीस केसरी हे भारतातील सर्वाधिक खप असलेले प्रादेशिक वर्तमानपत्र बनले.

सुरुवातीला आगरकरांकडे ‘ केसरी ‘ चे संपादकपद तर टिळकांकडे ‘ मराठा ‘ या इंग्रजी नियतकालिकाची संपादकीय जबाबदारी होती. तरीही टिळकांचे अग्रलेख या काळातही ‘केसरी’ त प्रसिद्ध होत होतेच. पुढे दोघांत तात्त्विक मतभेद झाले आणि टिळकांनी कर्जासह ‘ केसरी ‘ चे संपादकपद स्वतःकडे घेतले. तेव्हापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत टिळकांचे अग्रलेख हाच ‘ केसरी ‘ चा आत्मा होता. १८८१ ते १९२० या चाळीस वर्षांच्या काळात टिळकांनी ५१३ अग्रलेख लिहिले. ‘ सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ‘, ‘ उजाडले पण सूर्य कुठे आहे ,’ ‘ टिळक सुटले पुढे काय ‘, ‘ प्रिन्सिपॉल , शिशुपाल की पशुपाल ‘, ‘ टोणग्याचे आचळ ‘, ‘हे आमचे गुरूच नव्हेत ‘, ‘ बादशहा ब्राह्मण झाले ‘ हे त्यांचे काही प्रसिद्ध अग्रलेख आहेत.