तुमचे भाग्य रुसले आहे? तर महादेवांना अर्पण करा ‘या’ वस्तू; जीवनात मिळवा सुख-समृद्धी !

भगवान शंकराला भोळा सांब म्हटले आहे. त्याची पूजा-अर्चना मनोभावे केल्यास तो भक्तांच्या इच्छा पूर्ण करतो. त्याला ज्या-ज्या वस्तू आवडतात त्या अर्पण केल्यास शंकर भक्तांवर प्रसन्न होतो, असे म्हणतात.

    महादेवाला प्रिय वस्तू
    भगवान शंकराला भोळा सांब म्हटले आहे. त्याची पूजा-अर्चना मनोभावे केल्यास तो भक्तांच्या इच्छा पूर्ण करतो. त्याला ज्या-ज्या वस्तू आवडतात त्या अर्पण केल्यास शंकर भक्तांवर प्रसन्न होतो, असे म्हणतात. महादेवाला प्रिय अशा काही वस्तू…

    जल : शिव पुराणात म्हटले आहे की प्रभू शिव स्वयं पाणी आहे. महादेवाला जल अर्पित करण्याचे महत्त्व समुद्र मंथन कथा यात देखील सांगितले आहे. अग्नी समान विष प्यायल्यानंतर महादेवाचा कंठ पूर्णपणे निळा पडला होता. विषाची उष्णता शांत करुन शिवाला शीतलता प्रदान करण्यासाठी सर्व देवी-देवतांनी त्यांना जल अर्पित केले. म्हणून शिव पूजेत पाण्याचे विशेष महत्त्व आहे.

    बिल्वपत्र : देवाचे तीन नेत्रांचे प्रतीक आहे बिल्वपत्र. म्हणून तीन पान असणारे बेलपत्र महादेवाला अती प्रिय आहे. प्रभू आशुतोष यांच्या पूजेत अभिषेक व बिल्वपत्र याला प्रथम स्थान प्राप्त आहे. ऋषींप्रमाणे बिल्वपत्र महादेवाला अर्पित करणे आणि 1 कोटी कन्यादान केल्याचे पुण्य एकसमान आहे.

    आंकडा : शास्त्रांप्रमाणे शिव पूजेत एक आकड्याचे फूल अर्पित करणे सोने दान करण्यासमक्ष आहे.

    धोतरा : महादेवाला धोतरा अत्यंत प्रिय आहे. यामागील पुराणात धार्मिक महत्त्व सांगितले असेल तरी याचे वैज्ञानिक आधारदेखील आहे. महादेव कैलास पर्वतावर राहत होते. हे अत्यंत थंड क्षेत्र आहे जेथे या प्रकाराच्या आहार आणि औषधींची गरज भासते ज्याने शरीराला उष्णता मिळावी. वैज्ञानिकदृष्ट्या मर्यादित प्रमाणात धोतरा वापरल्याने हे औषधाप्रमाणे कार्य करते आणि शरीर उष्ण ठेवण्यास मदत करते. धार्मिकदृष्ट्या याचे कारण भागवत पुराणात सांगितले आहे. या पुराणानुसार महादेवाने जेव्हा सागर मंथनातून निघालेल्या विषाचे प्रशान केले तेव्हा ते व्याकुळ झाले. तेव्हा अश्विनी कुमारांनी भांग, धोतरा, बेल इतर औषधी देऊन महादेवांची व्याकुळता नाहीशी केली. तेव्हापासूनच महादेवांना भांग धोतरा प्रिय आहे. शिवलिंगावर केवळ धोतरा अर्पित करून इतिश्री समजू नये, आपल्या मनातील आणि विचारांमधील कडूपणा देखील दूर करावा.

    भांग :  महादेव नेहमी ध्यान करत असतात. भांग सेवन केल्याने ध्यान केंद्रित करण्यास मदत होते. याने ते नेहमी परमानंदात राहतात. समुद्र मंथनातून निघालेल्या विषाचे सेवन महादेवांनी संसारच्या सुरक्षेसाठी आपल्या गळ्यात उतरविले होते. देवाला औषधी स्वरूप भांग देण्यात आली परंतू प्रभूने प्रत्येक कडूपणा आणि नकारात्मकतेला आत्मसात केले म्हणून भांग त्यांना अत्यंत प्रिय आहे. महादेव संसारात व्याप्त वाईटपणा आणि प्रत्येक नकारात्मक वस्तू स्वत:मध्ये ग्रहण करतात आणि भक्तांची विषापासून रक्षा करतात.

    कापूर   : महादेवाचे प्रिय मंत्र आहे- कर्पूरगौरं करूणावतारं…. अर्थात जो कापूरसमान उज्जवल आहे. कापराचा सुवास वातावरणाला शुद्ध आणि पवित्र करते आणि महादेवाला हा सुवास प्रिय असल्यामुळे कापूर शिव पूजनात ‍अनिवार्य आहे.

    दूध : दुधाचे सेवन न करता महादेवाला अर्पित करावे.

    अक्षता : अक्षत म्हणजे अखंडित. पूजेत अक्षता अर्पित करण्याचे महत्त्व आहे. कोणत्याही पूजेत गुलाल, हळद, अबीर आणि कुंकू अर्पित केल्यावर अक्षता अर्पित कराव्या. अक्षता नसल्यास पूजा पूर्ण मानली जात नाही. पूजेतील काही वस्तू उपलब्ध नसल्यास त्याऐवजी अक्षता अर्पित केल्याचे देखील विधान आहे.

    चंदन :  चंदनाचा संबंध शीतलतेशी आहे. महादेवा मस्तकावर चंदनाचा त्रिपुंड लावतात. चंदन हवनात वापरले जाते आणि याचा सुवास वातावरणात दरवळतो. शिवाला चंदन अर्पित केल्याने समाजात मान-सन्मान आणि यश वाढते.

    राख : 
    याचा अर्थ पावित्र्यात दडलेला आहे, ते पावित्र्य ज्याला प्रभूने एका मृत व्यक्तीच्या जळत असलेल्या चितामध्ये शोधली आहे. ज्याला आपल्या अंगावर लावून पावित्र्याला सन्मान देतात. असे म्हणतात की भस्म लावून शिव स्वत: मृत आत्म्येशी जुळतात. त्यांच्यानुसार मृतदेहाला जाळल्यावर उरलेल्या राखेत जीवनाचे कोणतेही कण शेष नसतात.त्यात दु:ख, सुख, चांगले-वाईट काहीच उरत नाही. म्हणून ती राख पवित्र असते, त्यात कोणतेही गुण-अवगुण नसतात, अशी राख अंगाला लावून शिव आपल्या शरीराला सन्मानित करतात. एक कथेनुसार पत्नी सतीने जेव्हा स्वत:ला अग्नीला समर्पित केले होते तेव्हा क्रोधित शिवाने त्यांची भस्म आपल्या पत्नीची शेवटची आठवण म्हणून अंगावर लावून घेतली होती ज्याने सती भस्म कणांच्या रूपात नेहमी त्यांच्यासोबत राहावी.

    रुद्राक्ष :  महादेवाने रुद्राक्ष उत्पत्तीची कथा पार्वती देवींना सांगितली होती. एकदा शिवाने एक हजार वर्षापर्यंत समाधी घेतली होती. समाधी पूर्ण झाल्यावर जेव्हा त्याचे मन बाह्य जगात आले तेव्हा जगत कल्याणाची कामना करणाऱ्या महादेवांनी आपले डोळे बंद केले आणि तेव्हा त्यांच्या डोळ्यातून पाण्याचे थेंब पृथ्वीवर पडले. त्याहून रुद्राक्षाच्या झाडांची उत्पत्ती झाली आणि महादेवाच्या इच्छेनुसार भक्तांच्या हितासाठी समग्र देशात परसले. त्या वृक्षांवर येणारे फळ हे रुद्राक्ष आहे.

    इच्छापूर्तीसाठी करा शिवलिंगाची पूजा
    शवपासून शिव होण्याचा प्रवास म्हणजे मूळापासून चैतन्य होण्याचा प्रवास आहे. ‘शिवरात्रि’ या सणानिमित्त महादेवाची पूजा करण्याचे खूप महत्त्व असल्याचे सांगितले गेले आहे. यादिवशी शिव मंत्र जप-हवन-अभिषेक हवन याचे महत्त्व आहे. मंदिरात जाणे शक्य नसल्यास घरीदेखील महादेवाची विधीपूर्वक पूजा करावी. पूजा करताना अनेक प्रकाराचे शिवलिंग आपल्या आवश्यकतेनुसार पूजले जातात.
    पार्थिव शिवलिंग- प्रत्येक कार्य सिद्धीसाठी
    गुळाचे शिवलिंग- प्रेम प्राप्तीसाठी
    भस्माने निर्मित शिवलिंग- सर्वसुख प्राप्तीसाठी
    जवस किंवा तांदळाच्या पिठाने निर्मित शिवलिंग- दाम्पत्य सुख, संतान प्राप्तीसाठी
    दह्याने तयार शिवलिंग-‍ ऐश्वर्य प्राप्तीसाठी
    पितळ, कांस्य धातूने निर्मित शिवलिंग- मोक्ष प्राप्तीसाठी
    लीड निर्मित शिवलिंग- शत्रू संहारासाठी
    पाऱ्याचे शिवलिंग- अर्थ, धर्म, काम, मोक्ष प्राप्तीसाठी

    इच्छित परिणाम मिळविण्यासाठी…
    महाशिवरात्री पवित्र सण आहे आणि या दिवशी शिव-पार्वती पूजन करून विशेष फल प्राप्त करता येऊ शकते. यादिवशी सर्व इच्छा पूर्ण होतात. भक्त आपल्या इच्छेप्रमाणे महादेवाला विशेष वस्तू अर्पित करून त्वरित इच्छित फल प्राप्त करू शकता. – महाशिवरात्रीला शिवलिंग आणि मंदिरात महादेवाला गायीच्या कच्च्या दूधाने स्नान घातल्याने विद्या प्राप्त होते.
    – महादेवाला ऊसाच्या रसाने स्नान घातल्याने लक्ष्मी प्राप्ती होते.
    – महादेवाला शुद्ध पाण्याने स्नान घातल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात.
    – शिवलिंगावर बिल्वपत्र, अक्षता, दूध, फुलं आणि फळं अर्पित करावे.

    महाशिवरात्रीला टाळा ‘या’ चुका
    महादेवाला प्रसन्न करण्यासाठी भक्तीबरोबर योग्य पूजेचीही आवश्यकता असते. शिवाची पूजा करताना काही चुका टाळणे आवश्यक आहे.

    शंख जल 
    महादेवाने शंखचूड नावाच्या असुराचे वध केले होते. शंख त्याचे असुराचा प्रतीक मानले गेल्यामुळे शिवाची पूजा करताना याचा वापर केला जात नाही. तो प्रभू विष्णूंचा भक्त होता म्हणून विष्णूंची पूजा करताना शंख वापरण्यास हरकत नाही.

    पुष्प :  महादेवाला केशर, दुपहरिका, मालती, चम्पा, चमेली, कुन्द, जूही इतर फुले अर्पित करू नये.

    करताल : महादेवाची पूजा करताना करताल वाजवू नये.

    तुळशी : जलंधर नावाच्या असुराची पत्नी वृंदाच्या अंशाने तुळशीचा जन्म झाला होता. तिला भगवान विष्णूंनी आपल्या पत्नीच्या रूपात स्वीकारले होते म्हणून शिव पूजेत तुळशी वापरू नये.

    काळे ‍तीळ : तीळ प्रभू विष्णुंच्या मळापासून उत्पन्न झाल्याचे मानले जाते म्हणून शिवाला काळे तीळ अर्पित करू नये.

    तुटलेल्या अक्षता : महादेवाला अक्षता किंवा अख्खे तांदूळ अर्पित करण्याबद्दल शास्त्रांमध्ये लिहिले आहे की तुटलेले तांदूळ अपूर्ण व अशुद्ध असतात म्हणून देवाला अर्पित करू नये.

    कुंकू : हे सौभाग्याचे प्रतीक आहे. शिव वैरागी आहे म्हणून त्यांना कुंकू अर्पित करू नये.