छोट्या स्वयंपाकघराला ‘असे’ बनवा सुटसुटीत; वापरा या सोप्या टिप्स

एक मोठा चौरस टेबल वापरण्याऐवजी, वर्तुळाकार टेबलाचा वापर करा. असे टेबल कमी जागा व्यापते आणि त्यावर आरामात भाजीसुद्धा कापता येईल.

    स्वयंपाकघराचे व्यवस्थापन एक आव्हानात्मक काम असते. स्वयंपाकघर जर लहान असेल तर तिथे स्वयंपाक करणे अधिकच कठीण काम ठरते. परंतु या काही टिप्स वापरून तडजोड न करता हवा तसा स्वयंपाकघराचा वापर करू शकता. स्वयंपाकघराची आकर्षक मांडणी करण्यासाठी सोप्या टिप्स.

    टेबल-खुर्च्यांचा वापर
    एक मोठा चौरस टेबल वापरण्याऐवजी, वर्तुळाकार टेबलाचा वापर करा. असे टेबल कमी जागा व्यापते आणि त्यावर आरामात भाजीसुद्धा कापता येईल. तसेच दुमडणाऱ्या खुर्च्यांचा वापर करा. त्यांचा वापर झाल्यानंतर एका कोपऱ्यात बंद करून ठेवता येतात. भिंतीच्या वरचा भाग रिकामा ठेवा जेणेकरून तिथे भांडी ठेवता येतील.

    सिंकचा वापर
    लहान स्वयंपाकघरात, सिंक एका बाजूला असणे सर्वोत्तम आहे. जेणेकरून जागा वाया जात नाही आणि जागेचा योग्य वापर होतो. तसेच आपण दोन सिंकचाही वापर करू शकतो. त्यातील एका सिंकचा खरकटी भांडी ठेवण्यास वापर करता येतो आणि अशाप्रकारे थोडी जागा वाचवण्यास मदत मिळते.

    सरकता दरवाजा
    मोठा आणि सरळसोट दरवाजा अधिक जागा व्यापतो, त्याऐवजी आपल्या लहानशा स्वयंपाक खोलीसाठी दुमडणाऱ्या किंवा सरकत्या दरवाजा वापरा. मोठा आणि सरळसोट दरवाजा, उघडला तर संपूर्ण स्वयंपाकघर अडले जाते आणि यामुळे स्वयंपाक खोलीत वावरता येत नाही, जागा अडून राहू शकते.