या सुपरफूड्सचा करा आपल्या डाएट मध्ये समावेश; होईल कोरोनापासून बचाव

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस टोचून घेऊन हा संभ्रम दूर केला आणि ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचं सांगितलं. मनात कोणताही किंतु, परंतु न ठेवता लस टोचून घेऊ शकता, पण ,आरोग्य विशेष तज्ज्ञांच्या मते, ५० वर्षाखालील लोकांना कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी डाएटमध्ये अशा काही गोष्टींचा समावेश करावा, कारण कोरोना विषाणूच्या प्रकोपापासून बचाव करता येईल.

    आज सगळं जग विश्व कोरोना महामारीमुळे दहशतीत वावरत आहे. तथापि, याची लस तयार झाल्यावर ही महामारी आटोक्यात येईल ही आशा वाढली आहे. पण लस (CORONA Vaccine) बाबत अद्यापही लोकांच्या मनात संभ्रम कायम आहे. ते लसीकरण करून घ्यायला घाबरत आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या महामारीपासून बचाव व्हावा म्हणून लस टोचून घेतली. अनेकांनी आवाज उठवला होता की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लस का घेत नाहीत?

    आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस टोचून घेऊन हा संभ्रम दूर केला आणि ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचं सांगितलं. मनात कोणताही किंतु, परंतु न ठेवता लस टोचून घेऊ शकता, पण ,आरोग्य विशेष तज्ज्ञांच्या मते, ५० वर्षाखालील लोकांना कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी डाएटमध्ये अशा काही गोष्टींचा समावेश करावा, कारण कोरोना विषाणूच्या प्रकोपापासून बचाव करता येईल. चला तर जाणून घेऊया अशाच सुपरफुड्स विषयी

    • कोरोना विषाणूपासून बचाव व्हावा यासाठी मोहरीचं तेल किंवा रिफाइंड ऐवजी नारळाच्या तेलाचा वापर करणं अधिक योग्य ठरू शकतं, कारण नारळाच्या तेलात लॉरिक ॲसिड आणि कॅप्रिलिक ॲसिड असते, जे आपल्या प्रतिकार शक्तीला अधिकाधिक सक्षम करून या विषाणूपासून आपले संरक्षण करू शकते.
    • विशेष तज्ज्ञ मानतात की, कोरोना विषाणूपासून वचाव करायचा असेल तर आपल्या दररोजच्या डाएटमध्ये आवला, लाल किंवा पिवळी शिमला मिर्ची, संत्री, पेरु आणि पपई सारख्या पदार्थांचा समावेश करायला हवा.
    • असं म्हणतात की, आल्याचं सेवन केल्यानेही रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होते. याचे सेवन मधासोबत करू शकता. असं केल्याने आपली प्रतिकारशक्ती वाढेल आणि कोरोना विषाणूपासून आपला बचाव होईल.
    • कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी शेंगदाणे, पिस्ता, डार्क चॉकलेट, द्राक्षे आणि स्ट्रॉबेरीचा आपल्या आहारात समावेश करा.
    • हे सर्व अँटी-व्हायरल पदार्थ आहेत आणि याच्या सेवनाने रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
    • आहारात या पदार्थांचा समावेश केल्याने तुमचा फंगल इनफेक्शनपासून बचाव करू शकता. याशिवाय आपल्या आहारात व्हिटामीन सी ने भरपूर पदार्थांचा आवश्य समावेश करावा.
    • वृद्ध आणि जाणकार सांगतात की, दररोज सकाळी एक चमचा तुळस ३-४ काळीमिरी आणि एक चमचा मधासोबत सेवन केल्याने आपल्या शरीराला रोगांपासून लढण्याची शक्ती मिळते आणि रोगप्रतिकारक यंत्रणा अधिक सक्षम होते.
    • डॉक्टर्स म्हणतात की, काही पदार्थ कच्चे खाणे हे शरीरासाठी अयोग्यच आहेत, जसे कच्चे किंवा अर्धवट शिजलेले मांस सेवन करू नका. मांस व्यवस्थित धुवून आणि चांगलं शिजल्यानंतरच सेवन करावं.
    • हिरव्या भाज्याही कच्च्या खाऊ नये भाज्या चांगल्या धुवून, कापून उकळून घ्या आणि त्यानंतरच त्यांचा खाण्यासाठी उपयोग करा.