man love married with two women in one mandap at chhattisgarh bastar nrvb

चंदूच्या म्हणण्यानुसार वरील दोन्ही मुली त्याच्यावर खूप प्रेम करतात. म्हणून दोघींपैकी कोणाचीही फसवणूक करण्याची त्याची इच्छा नव्हती. जवळपास ३ वर्षांपूवी तोकापाल परिसरात तो विजेचा खांब गाडण्याच्या कामगिरीवर गेला होता असं चंदूने सांगितलं, तेथे त्याची भेट २१ वर्षांच्या ‘सुंदरी कश्यप’शी झाली आणि दोघांमधलं प्रेम वाढत गेलं. त्यानंतर फोनवर गप्पा सुरू झाल्या आणि लग्नाच्या गोष्टी सुरू झाल्या.

बस्तर : लग्न तर सगळेच करतात पण असं कुठे ऐकलंय का नवरदेव एक, लग्नाचा मंडपही एकच पण नवऱ्या दोन. हे असंच काहीसं झालं आहे छत्तीसगडमधल्या (Chhattisgarh) बस्तर (Bastar) येथे. या ठिकाणी झालेल्या लग्नामुळे सर्वच हैराण झाले आहेत. त्याचं झालं असं की, येथील रहिवासी असलेल्या चंदूने (Chandu) एकाच मंडपात दोन प्रेमिकांशी विवाह (Marriage) केला आहे. हा मुलगा आपल्या दोन्ही प्रेमिकांच्या कित्येक दिवसांपासून रिलेशनशीपमध्ये होता. हा विवाह सोहळा गेल्या ३ जानेवारीला संपन्न झाला. या गावातील अनेक लोक सहभागी झाले होते.

खरं तर, चंदूच्या म्हणण्यानुसार वरील दोन्ही मुली त्याच्यावर खूप प्रेम करतात. म्हणून दोघींपैकी कोणाचीही फसवणूक करण्याची त्याची इच्छा नव्हती. जवळपास ३ वर्षांपूवी तोकापाल परिसरात तो विजेचा खांब गाडण्याच्या कामगिरीवर गेला होता असं चंदूने सांगितलं, तेथे त्याची भेट २१ वर्षांच्या ‘सुंदरी कश्यप’शी झाली आणि दोघांमधलं प्रेम वाढत गेलं. त्यानंतर फोनवर गप्पा सुरू झाल्या आणि लग्नाच्या गोष्टी सुरू झाल्या.

याच नात्याला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरच २० वर्षीय ‘हसीना बघेल’ चंदूच्या गावात आपल्या एका नातेवाईकाच्या लग्नाला आली होती. यावेळी दोघांनी एकमेकांना पाहिलं आणि त्यांचं प्रेम जुळलं. अशाप्रकारे चंदू पुन्हा एकदा प्रेमात पडला. यानंतर या दोघांनीही आपल्या प्रेमाची कबुली दिली आणि चंदूने तिला सांगितलं की, आधीपासून तो एका मुलीच्या प्रेमात आहे. पण यामुळे हसीनाला काहीच हरकत नव्हती.

यानंतर चंदूने एक दिवस हसीना आणि सुंदरीची एकमेकींशी ओळख करून दिली. आता दोघींनाही चंदूशी नातं ठेवण्यात काहीही हरकत नव्हती. पण जेव्हा सुंदरीला हे कळलं की, हसीना चंदूच्या घरी राहायला आली आहे, तेव्हा तीही चंदूच्या घरी येऊन राहू लागली. यानंतर तिघेही सुखासमाधानाने एकाच घरात रहात आहेत.

पण चंदू या दोघींसोबत राहतो ही गोष्ट गाववाल्यांच्या पचनी पडत नव्हती. याची परिणती म्हणजे गाववाल्यांनीच मिळून या तिघांचं एकाच मंडपात लग्न लावून दिलं. या सोहळ्याला मोठ्या संख्येने लोकं सहभागी झाले होते आणि त्यांनी या नवदांपत्याला आशीर्वादही दिले.

या लग्नसोहळ्यात हसीनाच्या घरातले सर्व नातेवाईक सहभागी झाले होते तर सुंदरीच्या घरून कोणीही आलं नव्हतं पण सुंदरीला आशा आहे की, उशीरा का होईना तिच्या घरचे या विवाहाला मान्यता देतील. महत्त्वाचे म्हणजे हिंदू विवाह कायद्यांतर्गत हा विवाह पूर्णपणे अवैध आहे पण अशा विवाहाला आदिवासींच्या संस्कृतीत मान्यता आहे. या दोन स्त्रियांशी सुसंवाद साधून चंदू किती काळ सोबत राहतो आणि ‘हसीना’ आणि ‘सुंदरी’ देखील चंदूला किती काळ पाठिंबा देतात हे पहायचं आहे. चंदू, हसीना आणि सुंदरी यांना आमच्याकडूनही शुभेच्छा.