या भावाचा ‘सत्कार’ करायला पाहिजे; पत्नीशी घेतला पंगा आणि स्वत:लाच करून घेतली अशी शिक्षा

फानो शहरात दाखल झाल्यानंतर तो एवढ्यावरच थांबला नाही तर आणखी ३० किमी चालत एड्रिएटिक कोस्ट या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पती-पत्नीतले वाद हे या-ना त्या कारणाने रोजच होत असतात आणि सामंजसपणे ते सोडवलेही जातात. हा अनुभव थोड्याफार फरकाने प्रत्येकालाच येत असतो. त्यासाठी कोणीतरी नमतं घेण्याची गरज असते. पण इटलीच्या एका दांपत्यमध्ये असा झगडा झाला की, पतीला राग अनावर झाल्यावर तो घराबाहेर पडला आणि स्वत:ला आलेला राग शमविण्यासाठी या पठ्ठ्याने ४५० किमी अंतर पायी चालत कापले आहे.

independent च्या अहवालानुसार ४८ वर्षांचा हा तरूण इटलीच्या कोमो शहरात राहणारा आहे जे स्विर्त्झलँडच्या सीमेजवळ आहे. हा कोमोपासून जे चालत निघाला तो थेट फानो शहरात दाखल झाला. दोन्ही शहरांमधलं अंतर ४२६ किलोमीटरचं आहे. फानो शहरात दाखल झाल्यानंतर तो एवढ्यावरच थांबला नाही तर आणखी ३० किमी चालत एड्रिएटिक कोस्ट या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पत्नीने दाखल केली होती पती हरवल्याची तक्रार

जेव्हा या व्यक्तीला पोलिसांनी ४५० किमी चालत येण्याचं कारण विचारलं तर त्यांचा याच्या बोलण्यावर विश्वासच बसला नाही. मग नंतर त्यांनी माहिती घेतली तर ही बाब सत्य असल्याचं समोर आलं. या व्यक्तीच्या पत्नीने एक आठवड्यापूर्वीच तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीचं शरीर थंड पडलं होतं आणि तो खूपच थकलेला दिसत होता.

रस्त्यात अनोळखी व्यक्तींनी घातलं जेवायला

मी एवढा रागात होतो की, एवढा लांब कधी आलो हे माझं मलाच कळलं नाही असं या व्यक्तीने सांगितलं. मी स्वत:ला आलेला राग शांत करण्यासाठी घराबाहेर पडलो आणि पायी चालत निघालो. या प्रवासात अनोळखी लोकांनीच मला जोवायला घातलं. ही व्यक्ती दररोज जवळपास ६४ किमी चालत होती.

३५ हजारांचा दंड भरून पतीची केली सुटका

माहिती मिळताच पत्नी आपल्या पतीला घेण्यासाठी फानो शहरात दाखल झाली आणि म्हणाली, एक आठवड्यापूर्वी माझा यांच्यासी वाद झाला त्यांनी डोक्यात राग घालून घेतला आणि ते घरातून परागंदा झाले होते. त्यानंतरच त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. आमच्या यांना घरी परत आणण्यासाठी फानो पोलिसांना ४०० युरो (अंदाजे ३६ हजार रुपये) दंड भरावा लागला. कारण कोविड महामारीत त्यांनी लागू असलेल्या रात्रीच्या संचारबंदीच उल्लंघन केलं होतं.