ऐकावं ते नवलच! मन्नारशाला मन्नार टेम्पल : ‘या’ मंदिरात आहेत नागाच्या तब्बल ३० हजार प्रतिमा

केरळमध्ये एक असे मंदिर आहे जिथे नागाच्या एक-दोन नव्हे तर तब्बल ३० हजार प्रतिमा पाहायला मिळतात. केरळच्या मन्नारशाला येथे हे 'मन्नार टेम्पल' म्हणून ओळखले जाणारे मंदिर आहे. मन्नारशाळा हे अलेप्पी जिल्ह्यापासून ४० किलोमीटरवर आहे.

    भारतीय संस्कृतीत निसर्गाचे स्थान अनमोल आहे. पशुपक्ष्यांपासून झाडाझुडपांपर्यंत सर्वांना या संस्कृतीत आदराचे स्थान आहे. उंदरांना खाऊन शेतकऱ्यांना मदत करणार्‍या सर्पालाही यामध्ये स्थान आहे हे विशेष! त्यातही फणा काढून डौलाने उभा राहणार्‍या नागाचे तर मोठेच आकर्षण प्राचीन काळापासून आहे. आपल्याकडे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत असंख्य मंदिरांमध्ये वेगवेगळ्या दैवतांबरोबर नागही दिसतोच.

    मात्र, केरळमध्ये एक असे मंदिर आहे जिथे नागाच्या एक-दोन नव्हे तर तब्बल ३० हजार प्रतिमा पाहायला मिळतात. केरळच्या मन्नारशाला (Mannarshala) येथे हे ‘मन्नार टेम्पल’ (Mannar Temple) म्हणून ओळखले जाणारे मंदिर आहे. मन्नारशाळा हे अलेप्पी जिल्ह्यापासून ४० किलोमीटरवर आहे. येथील मंदिराला ‘श्रीनागराज मंदिर’ असे मूळ नाव आहे. परशुरामांनी हे स्थान निर्माण केल्याचे सांगितले जाते व या ठिकाणी नागराजाने त्यांना आशीर्वाद दिल्याचीही कथा सांगितली जाते.

    सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये या मंदिरात विशेष उत्सव होत असतो. त्यावेळी येथीळ नागराजाला तांदळाचे पीठ आणि दुधाचा नैवेद्य दाखवला जातो. नागराजाच्या पूजेचा अधिकार येथील ज्येष्ठ स्त्रीला असतो हे विशेष ! हे मंदिर अतिशय प्राचीन असून ते १६ एकर जागेत पसरलेले आहे. देशातील सात आश्‍चर्यांमध्ये या मंदिराचा समावेश होतो, असे सांगितले जाते.

    Mannarshala Mannar Temple This temple has over 30000 images of snakes