शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांची आज जयंती ; जाणून घ्या विक्रम बत्रा यांचा पराक्रम

या ऑपरेशनमध्ये विक्रम बत्रा शहीद झाले, पण कठीण परिस्थितीतही त्यांनी भारतीय सैन्याला विजय मिळवून दिला. यानंतर कॅप्टन बत्रा यांना भारत सरकारने मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान केले.

    भारताचे शूर पुत्र शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांची (Martyr Captain Vikram Batra) आज जयंती. कारगिल युद्ध १९९९ मध्ये सुरू झाले. यावेळी विक्रम लष्कराच्या १३ जम्मू -काश्मीर रायफल्समध्ये तैनात होते. विक्रम बत्रा यांच्या नेतृत्वाखाली, तुकडीने हॅम्प आणि राखी नब स्थान जिंकले. त्यानंतर त्यांना कॅप्टन बनवण्यात आले. श्रीनगर-लेह रस्त्याच्या अगदी वरचा महत्त्वाचा ५१४० बिंदू पाक सैन्याकडून मुक्त करण्यात आला. अतिशय कठीण भूभाग असूनही, कॅप्टन बत्राने २० जून १९९९ रोजी पहाटे 3.30 वाजता हे शिखर काबीज केले. जेव्हा कॅप्टन बत्रा रेडिओवर म्हणाले- ‘ये दिल मांगे मोर’, तेव्हा संपूर्ण देशात त्यांचे नाव झाले.

    यानंतर ४८७५ वर कब्जा मिळवण्याचे मिशन सुरू झाले. या समोरासमोर झालेल्या लढाईत शत्रूचे पाच सैनिक मारले गेले. या दरम्यान गंभीर जखमी असूनही त्याने शत्रूवर ग्रेनेड फेकले. या ऑपरेशनमध्ये विक्रम बत्रा शहीद झाले, पण कठीण परिस्थितीतही त्यांनी भारतीय सैन्याला विजय मिळवून दिला. यानंतर
    कॅप्टन बत्रा यांना भारत सरकारने मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान केले. पॉइंट ४८७५ ला त्याच्या स्मृतीत बत्रा टॉप असे नाव देण्यात आले आहे.

    ९ सप्टेंबर १९७४ रोजी पालमपूर येथे जी.एल.बत्रा आणि कमलकांता बत्रा याच्या पोटी झाला. विक्रम यांचे शालेय शिक्षण पालमपूरमध्येच केले. आर्मी कॅन्टोन्मेंट परिसरात राहता असलयाने विक्रम लष्कराच्या जवानांना लहानपणापासून पाहत असत. अन येथूनच विक्रम यांचे लष्कराबद्दलचे आकर्षण निर्माण झाले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर विक्रम पुढील शिक्षणासाठी चंदीगडला गेले. महाविद्यालयात, ते एनसीसी एअर विंगमध्ये सहभागी झाले. महाविद्यालयात असतानाच त्यांची मर्चंट नेव्हीसाठी निवड झाली होती, मात्र त्यांनी एमए (इंग्रजी) साठी प्रवेश घेत आपले शिक्षण पूर्ण केले. घेतला. त्यानंतर विक्रम सैन्यात भरती झाले.