रात्रभर मोबाईल चार्जींगवर लावून झोपता?; मग हे नक्की वाचा

एका अभ्यासानुसार हे खरे ठरले आहे. जेव्हा आपण मोबाईल रात्रभर चार्जिंगला लावतो तेव्हा त्याचा बॅटरीवर विपरीत परिणाम होत असतो.

  सध्याच्या काळामध्ये आपण मोबाईलचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर करत आहे. प्रत्येक वेळी मोबाईल फोन आपल्याला सहज उपलब्ध होतो. लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत सगळेजण सध्याच्या काळामध्ये मोबाईल वापरू लागले आहेत परंतु अनेकदा मोबाईलची चार्जिंग होत असल्यामुळे आपण रात्रभर चार्जिंगला मोबाईल लावत असतो असे केल्याने मोबाईल ला काही होते का.?

  मोबाईलच्या बॅटरी वर काही परिणाम जाणवतो का.? असे अनेक प्रश्न आपल्या मनात कधीकधी उद्भवत असतात म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत, चला तर मग जाणून घेऊया..

  दिवसभर कामाच्या व्यापात अनेकदा मोबाईल चार्जिंग करायला वेळ मिळत नाही. बऱ्याचदा मोबाईल चार्जिंगची सोयसुद्धा उपलब्ध नसते. अशावेळी  आपल्याला वेळ मिळतो तेव्हा आपण रात्री झोपताना रात्रभर मोबाईल चार्जिंगला लावत असतो परंतु असे केल्याने आपल्याला आपल्या मोबाईलच्या बॅटरीवर परिणाम झालेला जाणवत असतो.

  एका अभ्यासानुसार हे खरे ठरले आहे. जेव्हा आपण मोबाईल रात्रभर चार्जिंगला लावतो तेव्हा त्याचा बॅटरीवर विपरीत परिणाम होत असतो. रात्रभर मोबाईल फोन चार्जिंग ठेवल्यामुळे त्याची बॅटरी लाईफ व्हॅलिडिटी कमी होऊन जाते आणि  तसे पाहायला गेले तर साधे फोन आणि स्मार्टफोन यांच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात फरक असतो.

  सध्याचे स्मार्टफोन खूपच महाग असतात आणि त्यांना माहिती असते तिचा मोबाईल फोनमध्ये रात्री चार्जिंग पूर्ण झाली असेल तर कसे थांबवायचे त्याचबरोबर सध्याच्या स्मार्टफोनमध्ये लिथीअम बॅटरी उपलब्ध असतात त्यामुळे आपल फोन चांगला राहण्यासाठी मदत होते.

  अनेकदा आपल्याला असे वाटत असते की मोबाईलमध्ये जास्त चार्जिंग केल्यामुळे मोबाईल वर त्याचा विपरीत परिणाम होतो परंतु असे नसते जर तुम्ही विशिष्ट टेंपरेचर वर जर मोबाईल चार्ज करत नसेल तर तुमचा मोबाईल खराब होऊ शकतो.