mushrooms benefits reasons to eat this versatile veggie regularly
विटामिन D ची कमतरता भरून काढतात मशरूम, जाणून घ्या याचे आणखी चार फायदे

मशरूम शाकाहारी लोकांची आवडती भाजी आहे. स्वादिष्ट असण्यासोबतच शरीरासाठीही हे खूपच लाभदायक आहे. मशरूममध्ये कॅलरीज कमी असण्यासोबतच अनेक प्रकारची भरपूर पोषणमूल्ये (Health Benefits Of Mushroom) आहेत. याचा वापर कालवण, सलाड, सूप आणि भाजी एवढंच नाही तर स्नॅक्स म्हणूनही खाण्यासाठी करता येतो. जाणून घेऊया रोजच्या आहारात मशरूमचा समावेश करणे का गरजेचे आहे.

विटामिन D चा उत्तम स्त्रोत

शरीरासाठी विटामिन D खूपच आवश्यक आहे. याच्या कमतरतेमुळे विवध प्रकारचे आजार जडतात. विटामिन D खूपच कमी भाज्यांमध्ये असतं आणि मशरूम हे त्यापैकीच एक आहे. रोज मशरूम खाल्ल्याने शरीरात एका दिवसाची विटामिन D ची आवश्यक मात्रा पूर्ण होते. सफेद आणि पोर्टेबेला मशरूम विटामिन D मोठ्या प्रमाणात असतं.

सेलेनियमनेही आहे समृद्ध

सेलेनियम शरीरातील एका अँटिऑक्सिडंटप्रमाणे काम करतो. हे मुक्त रॅडिकल्सपासून शरीराचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. मशरूममध्ये भरपूर प्रमाणात सेलेनियम आढळते. हे शरीर आतून निरोगी ठेवते.

वजन कमी करण्यासही ठरते लाभदायक

मशरूममध्ये खूपच कमी कॅलरीज असतात. ५ सफेद मशरूम किंवा एक पूर्ण पोर्टेबेला मशरूम मध्ये फक्त २० कॅलरीज असतात. हे खाल्ल्याने पोट रिकामं रहात नाही आणि लवकर भूकही लागत नाही यामुळे तुम्ही जंक फूड आणि ओव्हरइटिंगपासून वाचू शकता.

अनेक पद्धतीने वापरता येते

आहारतज्ज्ञांच्या मते, आपल्या डाएटमध्ये अनेक पदार्थांचा समावेश असायला हवा. मशरूम कुठेही सहज उपलब्ध होणारी भाजी आहे. जी अनेक पद्धतीने तयार करता येते आणि याच्यातून पोषणमूल्ये प्राप्त करता येतात. हे तयार करण्यासही सहज सुलभ आहे. तुम्ही याचा वापर सलाड, भाजी किंवा सूप अशाप्रकारे आपल्या दररोजच्या डाएटमध्ये समावेश करू शकता.