
शाकाहारी लोक अधिकाधिक शाकाहारी व्यक्तींशीच मैत्री करणं पसंत करतात. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी एकमेकांशी मिळत्याजुळत्या असतील अशा लोकांशी या लोकांची मैत्री अधिक घट्ट असते. हे संशोधन पोलंड येथील संशोधक जॉन नेजलेक आणि मार्जेना यांनी अमेरिकेच्या विलियम अँड मेरी कॉलेजचे मनोवैज्ञानिक प्राध्यापक कॅथरिन फॉरेस्टेल यांच्यासोबत मिळून केले आहे.
शाकाहारी लोकांचा व्यवहार, आवडीनिवडीवर आतापर्यंत अनेकदा संशोधन करण्यात आलंय. आता एका संशोधनात हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे की, शाकाहारी असण्याचा त्यांच्या लव लाइफवर काय परिणाम होतात. या संशोधनात डाएट आणि नातेसंबंधांविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. हा संशोधनाभ्यास जर्नल ऑफ सोशल सायकोलॉजी मध्ये प्रसिद्ध झाला आहे.
या अभ्यासानुसार, शाकाहारी लोक अधिकाधिक शाकाहारी व्यक्तींशीच मैत्री करणं पसंत करतात. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी एकमेकांशी मिळत्याजुळत्या असतील अशा लोकांशी या लोकांची मैत्री अधिक घट्ट असते. हे संशोधन पोलंड येथील संशोधक जॉन नेजलेक आणि मार्जेना यांनी अमेरिकेच्या विलियम अँड मेरी कॉलेजचे मनोवैज्ञानिक प्राध्यापक कॅथरिन फॉरेस्टेल यांच्यासोबत मिळून केले आहे.
यापूर्वी यासोबतच केलेल्या एका अन्य संशोधनात नेजलेक आणि फॉरेस्टेल यांनी म्हटलं होतं की, शाकाहार हा नुसता आहार नाही तर ही एखाद्या व्यक्तीच्या सामाजिक ओळखीचाच एक महत्त्वपूर्ण भाग आहे. अन्य एक मनोवैज्ञानिक क्रिस्टोफ ढोंटने आपल्या संशोधनातून हे सिद्ध केलं आहे की, अनेक शाकाहारी लोकं (शाकाहार आणि मांसाहार असा मिश्र आहार घेणारे) लोकांना नापसंत करतात. या सर्व गोष्टी सखोल जाणून घेण्यासाठी संशोधकांनी एकाच मालिकेत चार विषयांचा आढावा घेतला आहे. या संशोधनासाठी लोकांचे शाकाहारी आणि मासांहारी असे वर्गीकरण करण्यात आले.
पहिल्या अभ्यासात लोकांना त्यांच्या आहारामुळे त्यांच्या सामाजिक ओळखीवर काय परिणाम होतो? त्यांचा आहार त्यांच्यासाठी काय आहे आणि ते त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींविषयी कितपत जागरूक आहेत. हे संशोधन ४११ अमेरिकन पुरुष आणि स्त्रियांवर करण्यात आलं.
दुसऱ्या आणि तिसऱ्या संशोधनात आपण काय खाता याबाबत विचारणा झाली, त्याचा तुमच्या सर्वात जवळच्या मित्रावर काय परिणाम होतो? या अभ्यासात जवळपास १२०० अमेरिकन विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या लोकांनी आपल्या प्रत्येकी पाच जवळच्या मित्रांच्या आहाराविषयी माहिती दिली.
चौथ्या संशोधनात पोलंडच्या ८६३ ज्येष्ठ लोकांना त्यांचे जवळचे मित्र आणि रोमँटिक जोडीदाराच्या आहाराविषयी माहिती विचारण्यात आली होती. आहाराचं त्यांच्या लेखी असलेलं महत्त्व आणि ते त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींबाबत कितपत चोखंदळ आहेत, या प्रश्नावर १ ते ७ गुण द्यायचे झाल्यास दोन्ही आहार घेणाऱ्यांच्या तुलनेत सर्वाधिक पसंती शाकाहार करणाऱ्यांना देण्यात आली.
अमेरिकन लोकांवर करण्यात आलेल्या संशोधनात हे सिद्ध झालं आहे की, शाकाहारी लोक मासांहार करणाऱ्यांच्या तुलनेत आपल्या सारखेच म्हणजे मासांहार न करणाऱ्या लोकांशी तीन पटीने अधिक मैत्री निभावतात. तर, पोलंडमधील लोकांवर करण्यात आलेल्या संशोधनात हेच प्रमाण ६ टक्के अधिक आहे. संशोधनात हेही सिद्ध झालं आहे की, दोन्ही प्रकारचा आहार घेणाऱ्यांच्या तुलनेत शाकाहारी लोक त्यांच्याहून १२ टक्के अधिक रोमँटिक असा जोडीदार निवडतात जे मासांहार करतच नाहीत.
शाकाहारी आणि शाकाहार करणाऱ्यांच्या लव लाइफवर संशोधन करणारे एक संशोधक हल हरजोग यांच्या मते, अधिकाधिक शाकाहारी लोक अशाच लोकांच्या सोबत आऊटिंग आणि खाणं पसंत करतात जे त्यांच्यासारखेच शाकाहारी आहेत. एवढंच नाही तर डेटिंग बाबतही शाकाहार करणारे लोकं शाकाहारी असलेल्यांच्याच निवडीला अधिक पसंती देताना दिसतात.