शुभमंगल ऑनलाइन : आलाय नवा ट्रेंड; केलंय असं काम की, पाहुण्यांच्या कौतुकालाही शब्द पडतायत अपुरे
शुभमंगल ऑनलाइन : आलाय नवा ट्रेंड; केलंय असं काम की, पाहुण्यांच्या कौतुकालाही शब्द पडतायत अपुरे

इंटरनेटवर अशाच एका परिवाराची गोष्ट धुमाकूळ घालत आहे. या परिवारात ऑनलाइन शुभमंगल तर झालंच पण लग्नसोहळ्यात सामील झालेल्या पाहुण्यांच्या घरी या मंडळींनी जेवण डिलिव्हरी करण्याचा घाट घातला. सांगायचा मुद्दा हाच की, बा लोकांना ही कल्पना लयच आवडली ना राव.

काय आहे संकल्पना


कोरोना काळातही देशात लग्न व्हायची काही थांबत नाहीत. आता तर असं वाटतंय की, बहुधा रेकॉर्ड ब्रेक लग्न २०२० मध्येच होणारयेत.कोरोना असल्याने लग्न करण्याच्या नियमांमुळे काही बंधनं आली आहेत. उदाहरणार्थ वधू-वर लग्नाचा पोषाख घालूनही त्यांना त्यावर पीपीई किट घालावं लागतंय, तर कुठे वऱ्हाड्यांशिवायच लग्न उरकली जात आहेत. आतातर ऑनलाइन लग्नही मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहेत. त्यामुळे घरबसल्या पै-पाहुण्यांना लग्नात उपस्थित असल्याचा आभासी फील घ्यावा लागतोय.पण एवढं सगळं घडत असलं तरी एक प्रश्न अद्यापही सुटलेला नाहीये तो म्हणजे लग्नातल्या जेवणावळीचा… तर वाचकहो, इंटरनेटवर अशाच एका परिवाराची गोष्ट धुमाकूळ घालत आहे. या परिवारात ऑनलाइन शुभमंगल तर झालंच पण लग्नसोहळ्यात सामील झालेल्या पाहुण्यांच्या घरी या मंडळींनी जेवण डिलिव्हरी करण्याचा घाट घातला. सांगायचा मुद्दा हाच की, बा लोकांना ही कल्पना लयच आवडली ना राव.

असा आहे नवा ट्रेंड

 

केरळमधील एका परिवाराने ‘Kalyana Sappadu’ (लग्नातलं जेवण) आपल्या पाहुण्यांच्या घरी पाठवून दिलं. यात त्यांनी प्रत्येक पाहुण्यासाठी चार रंगाच्या बॅगा आणि केळीची पानं सोबत पाठवून दिली. प्रत्येक बॅगेत ४ टिफिन कॅरिअर असतात ज्यात १२ डिशेस पॅक केल्या जातात. या सोबतच सूचनाही पाठविल्या जातात, ज्यात पाहुण्यांनी बॅग उघडल्यानंतर त्यातील प्रत्येक डिश केळीच्या पानावर कुठे ठेवायची याबाबत माहिती देण्यात आली आहे.

व्हायरल होतायत फोटो

या खास ट्रेंडशी संबंधित फोटो शेअर करत ट्विटर युजर शिवानी लिहिते, लग्नाचं निमंत्रण द्यायचा आहे हा नवा फंडा. लग्नाचं जेवण आपल्या घरापर्यंत पोहचविण्यात येईल.

लग्नातला धांगड-धिंगा मग केव्हा होणार?

 

खूपच मजेशीर आयडिया आहे

 

हेही नसे थोडके

 

१च नंबर काम

 

या ट्विटला आतापर्यंत ६.३ हजार लाइक्स आणि ९०० हून अधिक वेळा ही पोस्ट रि-ट्विट झाली आहे.