new year good luck traditions from around the world to borrow for your celebration nrvb
नवीन वर्षात गुडलक हवं असल्यास करा हे १२ उपाय; चुंबनाचा उपाय केल्यास वर्षभरही मिळेल गुडलक

जर्मनीसह काही देशांमध्ये नव्या वर्षाचं स्वागत रात्री १२ वाजता आपल्या प्रिय व्यक्तीचं चुंबन घेऊन करण्यात येतं. असं केल्यास वर्षभर गुडलक मिळतं असा समज आहे.

प्रत्येक जण नवीन वर्षाचं स्वागत आपल्या हटके पद्धतीने करत असतो. काहीजण नव्या वर्षात विविध प्रकारचे संकल्प करतात. काहीजण गुडलकच्या पद्धतींचा अवलंब करतात कारण त्यांना हे नवं वर्ष चांगलं जावो हीच त्यांची ईच्छा असते. जगात काही देश असे आहेत की, येथे विचित्र पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. हे ट्रॅडिशन गुडलक घेऊन येतात अशी मान्यता आहे. जाणून घेऊया अशाच काही परंपरांविषयी…

नवीन वर्षात मासे खाणं

चीनसह अनेक देशांत नव्या वर्षाच्या संध्याकाळी मासे खाण्याची परंपरा आहे. मासे नेहमी एका दिशेने पुढे जात असतात जे प्रगतीचं प्रतिनिधित्व करतात असं मानलं जातं.

काळ्या चवळीचे सेवन

यहुदी परंपरेनुसार, काळी चवळी खाऊन नव्या वर्षाचं स्वागत करणं शुभ मानलं जातं. जो कोणी १ जानेवारीच्या संध्याकाळी भातासोबत काळी चवळी खातात त्यांच्यासाठी नवीन वर्ष शुभ असतं असं मानतात. काही कुटुंबात या डिशच्या खाली शिक्के ठेवण्याचीही परंपरा आहे. यामुळे आपल्याला नशीबाची अधिक साथ मिळते असंही मानलं गेलं आहे.

१२ द्राक्षे खाण्याची परंपरा

स्पेनमध्ये नवीन वर्षाचं स्वागत १२ द्राक्षे खाऊन केलं जातं. रात्री १२ वाजता नवीन वर्ष सुरू झाल्याचा घंटानाद ऐकल्यावर लोकं घंटानादासोबतच द्राक्षे खातात. हे नव्या वर्षाचं गुडलक मानलं गेलं आहे. प्रत्येक द्राक्ष हे एका महिन्याचं प्रतिनिधीत्व करते. जी व्यक्ती घंटानादासोबत१२ द्राक्षे संपवू शकत नाही त्याच्यासाठी हे वर्ष अनलकी असतं अशीही मान्यता आहे.

चुंबन घेणं

जर्मनीसह काही देशांमध्ये नव्या वर्षाचं स्वागत रात्री १२ वाजता आपल्या प्रिय व्यक्तीचं चुंबन घेऊन करण्यात येतं. असं केल्यास वर्षभर गुडलक मिळतं असा समज आहे.

खुर्चीवरून खाली उडी मारणं

डेन्मार्कमध्ये लोकं नव्या वर्षाचं स्वगात करण्यासाठी खुर्चीवर उभे राहतात आणि १२ च्या ठोक्याला खुर्चीवरून खाली उडी मारतात. असं केल्यास गुडलक मिळतं आणि अतृप्त आत्मे आपल्यापासून दूर पळून जातात असं मानलं जातं.

प्लेट तोडणं

डेन्मार्कमध्ये नवीन वर्षाच्या स्वागताला प्लेट तोडणंही शुभ मानलं गेलं आहे. येथे लोकं आपले मित्र आणि कुटुंबातील सदस्यांच्या घराच्या दरवाज्यांवर प्लेट तोडतात. दुसऱ्या दिवशी ज्याच्या घरासमोर जेवढ्या अधिक प्लेट्स तुटलेल्या दिसतात, तो तेवढाच भाग्यशाली असल्याचं म्हटलं जातं.

खिडकीतून पाणी बाहेर फेकणं

प्युर्टो रिकोमध्ये नवीन वर्षात खिडकीच्या बाहेर बादलीने पाणी फेकणं शुभ मानलं गेलं आहे. असं म्हणतात की, असं केल्यास वाईट आत्मा आपल्यापासून दूर जातात. या ठिकाणचे लोक गुडलक मिळावं म्हणून घरांच्या बाहेर साखरही टाकतात.

रिकामी सुटकेस घेऊन फिरणे

कोलंबियातल्या लोकांना फिरण्याची भारी हौस असते. नवीन वर्षात येथे लोकं रिकाम्या सुटकेस घेऊन दुसऱ्या ठिकाणी जाण्याची परंपरा आहे. यामुळे नवीन वर्षात भरपूर फिरायला मिळतं असा येथील लोकांचा समज आहे.

लाटांवर स्वार होणं

ब्राझीलसह काही देशांमध्ये नव्या वर्षांचं स्वागत लाटांवर स्वार होऊन केलं जातं. नवीन वर्षात समुद्र किनारी जाऊन समुद्राच्या सात लाटांवर स्वार होतात. प्रत्येक लाटेवर स्वार होऊन मनातली ईच्छा सांगण्याची परंपरा आहे. असं म्हणतात की, असं केल्याने नवीन वर्षात भाग्याचं लक्षण मानलं गेलं आहे आणि यामुळे आपल्या सर्व ईच्छा पूर्ण होतात.

पांढरे कपडे घालणं

ब्राझीलमध्ये नव्या वर्षाच्या संध्याकाळी पांढरे कपडे घालण्याची परंपरा आहे. संपूर्ण वर्षभर गुडलक आणि शांतीसाठी या दिवशी लोकं पांढरे कपडे घाततात.

दरवाजे-खिडक्या उघड्या ठेवणं

फिलिपिन्समध्ये लोकं नवीन वर्षात घराचे दरवाजे-खिडक्या उघड्या ठेवतात. असं केल्याने जुने दिवस बाहेर निघून जातात आणि नवीन वर्षात गुडलक विना अडथळा घरात प्रवेश करतं अशी मान्यता आहे.

विश पेपर बरणीत ठेवणं

काही देशांमध्ये नवीन वर्षात आपली ईच्छा एका कागदावर लिहून ती बरणीत ठेवण्याची परंपरा आहे. ही बरणी पुढच्यावर्षापर्यंत सांभाळून ठेवली जाते आणि पुढच्या नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला ती उघडून पाहिली जाते की, गेल्या वर्षात यातील किती ईच्छा पूर्ण झाल्या हे पाहिलं जातं.