nfhs fifth report says malnutrition and obesity is rise in india

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS) च्या पाचव्या अहवालानुसार, वयाच्या मानाने कमी उंचीच्या राज्यांच्या यादीत बिहारने अव्वलस्थानी बाजी मारली आहे.बिहारमध्ये २०१५-१६ साली हेच प्रमाण ४८.३ टक्के होते आता हेच प्रमाण ४२.९ टक्क्यांवर आले आहे. या यादीत दुसऱ्या स्थानावर गुजरात आणि तिसऱ्या स्थानावर कर्नाटकचा नंबर लागतो.

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (Health Ministry) शनिवारी राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा पाचव्या अहवालातील पहिला भाग जारी केलाय. यात २०१९-२० या वर्षात केलेल्या सर्वेक्षणाची आकडेवारी आहे. तथापि, हे सर्वेक्षण तीन वर्षांनी करण्यात येते.

एनएफएचएसच्या पहिल्या भागातील या अहवालात २२ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांचा समावेश करण्यात आला आहे. या राज्यांत देशातील अर्ध्याहून अधिक लोकांचे वास्तव्य आहे. यात काही मोठी राज्ये महाराष्ट्र, बिहार आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे. तथापि यात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तरप्रदेशचा समावेश नाही.

मुलांमध्ये वाढतेय कुपोषण

एनएफएचएसच्या या पाचव्या अहवालात दावा करण्यात आला आहे की, देशातल्या मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढते आहे. ही चिंतेची बाब आहे. याआधी एनएफएचएसच्या चौथ्या अहवालात देशातील मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढले असल्याचा दावा करण्यात आला होता. आता पाचव्या अहवालात हे प्रमाण वाढलं असल्याचं नमूद केलं आहे. आपल्या वयोमानानुसार सर्वसाधारण उंचीपेक्षा कमी उंची असणाऱ्यांचं प्रमाण १३ राज्यांमध्ये वाढलं असल्याचं या अहवालात म्हटलं असून आपल्या उंचीनुसार कमी वजन असणाऱ्यांचं प्रमाण १२ राज्यांतील मुलांमध्ये वाढलं आहे.

उंचीप्रमाणे कमी उंची असणाऱ्या मुलांमध्ये ही तीन राज्ये आघाडीवर

बिहार या यादीत अव्वल स्थानी आहे. बिहारमध्ये २०१५-१६ साली हे प्रमाण ४८.३ टक्के तर आता हेच प्रमाण ४२.९ टक्क्यांवर घसरलं आहे. दुसऱ्या स्थानावर गुजरात आहे. गुजरातमध्ये हे प्रमाण ३९.० टक्के आहे. तिसऱ्या स्थानी कर्नाटक आहे. कर्नाटकात हेच प्रमाण ३५.४ टक्के आहे.

याशिवाय कमी वजन आणि अधिक वजनाच्या मुलांच्या टक्केवारीतही वाढ झाली आहे. १६ राज्यांत कमी वजन असणाऱ्या मुलांची संख्या वाढली आहे तर २० राज्यांत अधिक वजन असलेल्यांची संख्या जास्त आहे.

लठ्ठपणातही झालीये वाढ

याशिवाय देशात जाडेपणा आणि रक्ताच्या कमतरतेशी झुंजणाऱ्यांच्य संख्येतही वाढ झाली आहे. २२ पैकी १९ राज्यातील पुरुषांमध्ये लठ्ठपणा वाढीस लागला आहे. १६ राज्यांत यात महिलांचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्नाटकात सर्वाधिक लठ्ठपणा महिलांमध्ये आढळून आला आहे. हा ६.८ टक्के आहे तर पुरुषांमध्ये सर्वाधिक लठ्ठपणा जम्मू-काश्मीरमध्ये पाहायला मिळाला आहे. या ठिकाणी हेच प्रमाण ११.१ टक्के आहे.