
‘ईट जस्ट’ या अमेरिकेच्या स्टार्टअप कंपनीने प्रयोगशाळेमध्येच प्राण्यांच्या पेशीपासून मटण तयार केले आहे. ईट जस्टचे सीईओ जोश ट्रटिक यांनी सांगितले की, लवकरच सिंगापूरच्या रेस्टॉरंटमध्ये आमच्या मटणापासून तयार केलेले पदार्थ मिळतील.
मटण खायचं म्हटलं की प्राण्यांचा बळी द्यावा लागतो. मात्र, हेच मटण तुम्हाला आता प्रयोगशाळेतून मिळणार आहे, यासाठी तुम्हाला प्राण्यांना मारण्याची गरजच लागणार नाहीये. सिंगापूर फूड एजन्सीने प्राण्यांच्या पेशींपासून तयार होणाऱ्या मटण सुरक्षित म्हणजेच खाण्यासाठी योग्य असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. यामुळे लवकरच प्रयोगशाळेत तयार केलेले मटण बाजारात विक्रीसाठी येणार आहे.
‘ईट जस्ट’ या अमेरिकेच्या स्टार्टअप कंपनीने प्रयोगशाळेमध्येच प्राण्यांच्या पेशीपासून मटण तयार केले आहे. ईट जस्टचे सीईओ जोश ट्रटिक यांनी सांगितले की, लवकरच सिंगापूरच्या रेस्टॉरंटमध्ये आमच्या मटणापासून तयार केलेले पदार्थ मिळतील. जगभरात इकोप्रेंडली गोष्टींची निर्मिती केली जात आहे. त्याच धर्तीवर फूड इंडस्ट्रीदेखील विकसित करण्याचा प्रयत्न आहे.
मांसाहारींना सुरक्षित पर्याय
प्राण्यांना मारल्याने पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. मटण खाण्याचे प्रमाण जगभरात वाढते आहे. २०५० पर्यंत मटणाची मागणी ७० टक्क्यांपर्यंत वाढेल. ग्राहकांची वाढती मागणी बघता मटणाला दुसरा पर्याय शोधणे गरजेचे आहे. प्रयोगशाळेत तयार केलेले मटण हा ग्राहकांसाठी सुरक्षित पर्याय असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.