हे जरा अतीच होतंय! कोरोनाच्या भीतीने सेक्सबाबत जारी केली ‘अशी’ मार्गदर्शक तत्त्वे; कसं शक्य आहे ‘फिजिकल डिस्टन्सिंग’

न्यू साऊथ वेल्स (NSW) च्या आरोग्यविभागाच्या वेबसाइटवर 'प्लेसेफ' ची मार्गदर्शक तत्त्वे वाचल्यानंतर प्रत्येकाचीच डोकेदुखी वाढली आहे. कोरोना व्हारसपासून संरक्षण करण्यासाठी लोकांनी सेक्स दरम्यान दीड फुटांचे अंतर ठेवावे असे सांगितले आहे. बेडरूममध्ये पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवताना फिजिकल डिस्टन्सिंग ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

कोरोना व्हायरस (Corona virus) च्या संकटकाळात हेल्थ एक्सपर्ट प्रत्येक प्रयत्न करत आहे, ज्यामुळे संक्रमणाचा धोका कमी होईल. जगातील सर्व देशांप्रमाणे ऑस्ट्रेलियातही या गोष्टींवरून मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत. सार्वजनिक ठिकाणी कमीत कमी दीड मीटरचे अंतर, हँडवॉश किंवा पार्टनरने कमरेपासून वरच्याच भागाचा स्पर्श होईल अशा पद्धतीने मिठी मारणे यासारख्या गोष्टींवर भर दिला जात आहे. या दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या आरोग्य विभागाने बेडरूममध्ये जोडप्यांसाठी जारी केलेल्या एका खूपच अजब-गजब कोविड सेफ्टी मार्गदर्शक त्तत्वामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

न्यू साऊथ वेल्स (NSW) च्या आरोग्यविभागाच्या वेबसाइटवर ‘प्लेसेफ’ ची मार्गदर्शक तत्त्वे वाचल्यानंतर प्रत्येकाचीच डोकेदुखी वाढली आहे. कोरोना व्हारसपासून संरक्षण करण्यासाठी लोकांनी सेक्स दरम्यान दीड फुटांचे अंतर ठेवावे असे सांगितले आहे. बेडरूममध्ये पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवताना फिजिकल डिस्टन्सिंग ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हद्द तर तेव्हा झाली जेव्हा सुरक्षित राहण्यासाठी लोकांना ‘सोलो सेक्स’ करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. नव्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, जर एखाद्या अशा व्यक्तीशी संबंध ठेवायचे आहेत जो आपल्यासोबत आधीपासूनच रहात आहे तर काळजी करण्याची काहीच गरज नाही. तथापि, ज्यांना प्रासंगिक लैंगिक संबंध ठेवायचे आहेत त्यांच्यासाठी, आरोग्य तज्ज्ञांनी काही शिफारसी केल्या आहेत.

वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, एखाद्या बाहेरच्या व्यक्तीशी शारिरिक संबंध ठेवणे म्हणजे जोखमीचं आहे आणि दीड मीटरच्या फिजिकल डिस्टन्समुळे असं करू नये असा सल्ला दिला आहे. कोविड-१९ च्या संकटकाळात ‘सोलो सेक्स’च सर्वात सुरक्षित पद्धत असल्याचं म्हटलं आहे.

हेल्थ एक्सपर्ट्ची ही शिफारस विरोधाभासही निर्माण करणारी असू शकते. वास्तविक, NSW हेल्थ अथॉरिटीज आपल्या जोडीदारासमोर काही अंतर ठेवून लैंगिक समाधानाची पूर्तता करण्याची शिफारस करतात.

तज्ज्ञांच्या मते, असे केल्याने केवळ कोविड -१९ नाही तर लैंगिक संप्रेषण रोग किंवा संक्रमणाचा धोका (STI) कमी होईल. त्याचबरोबर, याकडे जन्मदर नियंत्रित करण्याची कल्पना म्हणून देखील पाहिले जात आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो की, शुक्राणू किंवा योनिमार्गाद्वारे कोविड -१९ च्या संक्रमणाचा पुरावा अद्याप तरी मिळालेला नाही. तथापि, श्वसन थेंब किंवा लाळ याद्वारे व्हायरस पसरू शकतो, म्हणून जोडीदाराचे चुंबन घेणे टाळावे. शक्य असल्यास तीन-आवरणे असलेल्या मुखपट्टीने (mask) आपले तोंड आणि नाक पूर्णपणे झाकून घ्यावे.

या व्यतिरिक्त लोकांना कंडोम, डेंटल डॅम यासारख्या वस्तू वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच फोन किंवा व्हिडिओ चॅटद्वारे हॉट मेसेज किंवा जिव्हाळ्याचा संदेश देण्याचे सुचविले आहे. जरी जोडीदार तुमच्यासोबत बेडरूममध्ये किंवा शहरात नसला तरीही आपण त्यांच्याशी फोनवर किंवा व्हिडिओ चॅटमध्ये वेळ घालवू शकता असा सल्लाही देण्यात आला आहे.