ऑनलाईन काममकाज पद्धती अंगलट; 23% भारतीयांना दृष्टीदोष

कोरोना साथरोगाची लाट आणि लॉकडाऊनचे निर्बंध यामुळे कार्यालयीन कामकाज, विद्यार्थ्यांचे शिक्षण तसेच वेळ घालविण्यासाठी दूरचित्रवाणीवर घालविलेला अधिकाधिक वेळ यामुळे कित्येक जणांना दृष्टीदोष जडला असल्याचे एका संशोधनात समोर आले आहे. कमीत कमी 27.5 कोटी भारतीयांनी अर्थातच 23 टक्के लोकसंख्येला स्क्रीनचा अधिकाधिक वापर केल्यामुळे दृष्टीदोष जडला असल्याचे स्पष्ट झाले आहे. मोतियाबिंदू, ग्लुकोमा अथवा अन्य कारणामुळेही डोळ्यांवर विपरित परिणाम झाला आहे.

  दिल्ली : कोरोना साथरोगाची लाट आणि लॉकडाऊनचे निर्बंध यामुळे कार्यालयीन कामकाज, विद्यार्थ्यांचे शिक्षण तसेच वेळ घालविण्यासाठी दूरचित्रवाणीवर घालविलेला अधिकाधिक वेळ यामुळे कित्येक जणांना दृष्टीदोष जडला असल्याचे एका संशोधनात समोर आले आहे. कमीत कमी 27.5 कोटी भारतीयांनी अर्थातच 23 टक्के लोकसंख्येला स्क्रीनचा अधिकाधिक वापर केल्यामुळे दृष्टीदोष जडला असल्याचे स्पष्ट झाले आहे. मोतियाबिंदू, ग्लुकोमा अथवा अन्य कारणामुळेही डोळ्यांवर विपरित परिणाम झाला आहे.

  प्रभावी ठरली दोन कारणे

  स्क्रीनसमोर घालविलेला सर्वाधिक वेळ आणि सोशल डिस्टन्सिंग ही दोन कारणेच यासाठी कारणीभूत ठरल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. कठोर निर्बंधामुळे लोकंही बराच काळ घरातच बंद होते. यासंदर्भात ब्रिटनमधील फील गुड कॉन्ट्रॅक्टर्सच्या अहवालात ज्यात लॅन्सेट ग्लोबल हेल्थ, डब्ल्यूएचओ आणि स्क्रीन टाईम ट्रॅकर डेटा यातील माहितीच्या आधारावर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. लोकसंख्येचा आकार आणि घनत्वामुळेही परिणाम झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

  सरासरी 5 तास कामकाज

  चीनमध्ये एका वर्गाचा ऑनलाईन कामकाजाचा कालावधी कमी आहे परंतु दृष्टीदोषाचे परिणाम सर्वाधिक आहे. चीनमध्ये वापरकर्त्यांनी स्क्रीनसमोर सरासरी 5 तास 22 मिनिटे घालविली. त्यामुळे सरासरीनुसार 27.4 कोटी लोकं अथवा 14.1 टक्के लोकसंख्येवर यामुळे परिणाम झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

  हे सुद्धा वाचा