लॉकडाऊनचा असाही परिणाम, लहान वयातच मुलींना सुरू झाली मासिक पाळी!

मुलांमध्ये हार्मोनल बदल झाले असून. त्यातूनच मुलांना प्रिकोशिअस प्युबर्टी येऊ शकते', असे दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलच्या डॉक्टर पेडिएट्रिक डॉक्टर वैशाखी रस्तुगी यांनी सांगितले आहे.

    कोरना व्हायरमुळे जवळपास वर्षभर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. या लॉकडाऊनचा थेट परिणाम अल्पवयीन मुलींच्या आरोग्यावर झाला आहे. या लॉकडाऊनमध्ये अरबट चरबट खाल्ल्याने, सतत घरात राहिल्याने, मोबाईलच्या अतिवापराने काही अल्पवयीन मुलींच्या शरीरात बदल झाले आहेत. त्यामुळे मुली वेळे आधीच वयात आल्याचं समोर आलय.

    या आजाराला प्रिकोशिअस असं म्हटलं जातं. या पूर्वी अगदी हाताच्या बोटावर मोडण्या इतक्याच केसेस होत्या. मात्र लॉकडाऊनमध्ये याची लक्षणीय वाढ झाली आहे.

    कशामुळे होऊ शकतो परिणाम

    ‘लॉकडाऊनमध्ये मुलं अनेक महिने घरात कोंडून होती. त्यामुळे सतत घरात राहून सतत अरबट चरबट खाल्ल. तब्येतीला अपायकारक असे पदार्थ या काळात खाल्ले गेले आहेत. त्यामुळे मुलांमध्ये हार्मोनल बदल झाले असून. त्यातूनच मुलांना प्रिकोशिअस प्युबर्टी येऊ शकते’, असे दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलच्या डॉक्टर पेडिएट्रिक डॉक्टर वैशाखी रस्तुगी यांनी सांगितले आहे.

    डॉक्टर वैशाखी यांच्याकडे जून २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत अशा प्रकारच्या ६७ केस आलेल्या आहेत. साधारणता: वर्षभरात त्यांच्याकडे २५  प्रकरणं येतात मात्र यंदा त्यात वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. साधारणत: जगभरात पाचशे मुलींमागे एका मुलगी व दोन हजार मुलांमागे एक मुलगा वेळेआधी वयात येतात.