सरकारी नोकरी सोडून हा अवलिया करतोय मोत्याची शेती; करतो लाखोंची उलाढाल

मोतीची शेती करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र आणि पश्चिम घाटातून निघणाऱ्या नदीमधून शिंपले आणले आणि त्यांना बादलीमध्ये प्रक्रिया केली. पहिल्या 18 महिन्यात शेती मधून त्यांना..

  आयुष्यात एखाद्याला कधी आणि कोणती गोष्ट जगावेगळे काहीतरी करण्यासाठी प्रेरित करेल याचा नेम नाही. अशाच एका अवलियाबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

  या महाशयांनी चांगली प्रोफेसरची नोकरी सोडली आणि मोती (Pearl Farming) सुरु केली आणि पहिल्याच वर्षात ३ लाख पेक्षा जास्त रुपयांची कमाई केली.

  आपला असा समज आहे की मोती हे फक्त समुद्राच्या खोल भागातच होतात,  परंतु  हा समज चुकीचा ठरावाला आहे केरल मधील कासरगोड या परिसरात राहणाऱ्या 65 वर्षीय के जे माथचंद (KJ Mathchand) यांनी हे जवळपास दोन दशक आपल्या घरामध्ये बनलेल्या तलावामध्ये प्रत्येक वर्षी जवळपास 50 बादली पेक्षा जास्त मोत्यांचे उत्पादन करतात.

  यांचे मोती सौदी अरब, ऑस्ट्रेलिया, कुवैत आणि स्विटीजरलैंडमध्ये निर्यात होतात आणि यांची कमाई लाखोंमध्ये होते. यांचे मोती परदेशात निर्यात झाल्यामुळे यांना कमाई चांगली होते.

   

  प्रोफेसर ते शेतकरी बनण्याची प्रवास आणि प्रेरणा

  के जे माथचंद (KJ Mathchand) हे सौदी अरब मधील ‘किंग फहद युनिव्हर्सिटी ऑफ पेट्रोलियम अँड मिनरल्स’ मध्ये दूरसंचार डिपार्टमेंट मध्ये प्रोफेसरची नोकरी करत होते. एकदा त्यांना अरामको ऑईल कंपनी कडून इंग्लिश ट्रान्स्लेटर म्हणून चीनमध्ये पाठवण्यात आले.

  मत्सपालनमध्ये रुची असल्यामुळे ते चीन प्रवासा दरम्यान वुशी मधील ‘दंशुई मत्स्य अनुसंधान केंद्र’ येथे गेले. तेथे यांना समजलं की  मोती उत्पादन संबंधित डिप्लोमा कोर्स चालवला जातो. त्यांना हे काही नवीन वाटले त्यामुळे त्यांनी या डिप्लोमा करण्यासाठी प्रवेश घेण्याचं ठरवलं. त्यानंतर त्यांनी आपली प्रोफेसरची नोकरी सोडली आणि 6 महिने कोर्स करण्यासाठी चीनमध्ये गेले.

  डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्वदेशी येऊन मोतीची शेती करण्याचे मनावर घेतले आणि वर्ष 1999 मध्ये 1.5 लाख भांडवल गुंतवणूक करून आपल्या तलावामध्ये मोतीची शेती सुरु केली आणि त्यावर्षी त्यांना 4.5 लाख रुपयांचे मोती विक्री केली. अश्या प्रकारे त्यांना पहिल्या वर्षीच 3 लाख रुपये फायदा झाला.

  माथचंद म्हणतात की “हा माझा घाईगडबडीत घेतलेला निर्णय होता ज्या बद्दल अनेक लोकांनी विरोध दर्शवला, पण मला माझ्या निर्णयावर पूर्ण विश्वास होता कि हा एक जबरदस्त व्यवसाय ठरणार आहे आणि मी विरोधकांवर लक्ष न देता मला जे करायचं होत त्याकडे लक्ष दिले.”

  मोतीची शेती करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र आणि पश्चिम घाटातून निघणाऱ्या नदीमधून शिंपले आणले आणि त्यांना बादलीमध्ये प्रक्रिया केली. पहिल्या 18 महिन्यात शेती मधून त्यांना 50 बादल्या मोतींचे उत्पन्न झाले ज्यानंतर त्यांचा व्यवसाय सतत प्रगती करू लागला.