म्हणून प्रेयसीसोबतच्या भांडणात मुलं नेहमीच हरतात!

नात्यांमध्ये अनेकदा लहान गोष्टींवर सुरू झालेले वाद भांडणाच स्वरूप घेतात. एखाद्या  जोडप्यामध्ये भांडणं झाली नाहीत तरच नवलच म्हणावे! अशा भांडणांमध्ये एक गोष्ट ठरलेली असते ती म्हणजे भांडणाच्या शेवटी मुलांनाच  पडती बाजू घ्यावी लागते आणि शेवटी हार मानावी लागते. अस मुलांसोबतच का होत असेल? ते प्रेयसीसोबतच्या भांडणात का जिंकू शकत नाही?

जाणून घेऊया याची काय कारणे आहेत.

भांडणामध्ये मुलींकडची सारी शस्त्र काढून झाली की, अनेकदा त्यांच्या डोळ्यात पाणी येते. राग अनावर झाल्यानंतरही भांडताना अनेकांच्या डोळ्यात पाणी येतं. पण मुलींच्या डोळ्यात पाणी पाहिल्यानंतर आपोआपच मुलं पडती बाजू घ्यायला सुरूवात करतात.

भांडण वाढले आणि ते जर टोकाला गेले तर मुद्दा भरकटू शकतो आणि त्याचे परिणाम हे नक्कीच दोघांसाठीही त्रासदायक ठरू शकते असा विचार अनेक मुलं करतात. अनेक जण शांत डोक्याने आणि सामंजस्याने वादावर मार्ग काढण्याला पसंती देतात. त्यामुळे भांडण न वाढविता माघर घेणे अनेक मुलं पसंत करतात.

भांडणामध्ये मुलींना त्यांचा मुद्दा अधिक मजबूत करायचा असेल तर त्या प्रियकराच्या  मागील सार्‍या चूकांचं गणित मांडायला सुरूवात करतात. त्यामुळे अनेकदा यामुळे मुलांची बोलती बंद होते.

मुली अनेकदा प्रियकराच्या एखाद्या चूकीची त्यांच्या मित्रपरिवारात चर्चा करायला सुरूवात करतात. अशावेळेस मुलं काही बोलू शकत नाहीत. सोबतच मित्रांसोबतही याबाबत चर्चा करू शकत नाही. त्यामुळे अनेकदा त्यांना गप्प बसावं लागत.