भारतीय आरोग्‍य यंत्रणेची पुनर्रचना-लॅन्‍सेट सिटीझन्‍स कमिशन सादर

चार प्रख्‍यात आरोग्‍य व व्‍यवसाय प्रमुख (प्रसिद्धी पत्रकामध्‍ये उल्‍लेख केलेले सह-अध्‍यक्ष) कमिशनचे नेतृत्‍व करतील. या प्रमुखांनी शैक्षणिक, वैज्ञानिक समुदाय, नागरी समाज आणि सार्वजनिक हेल्‍थकेअरमधील तीस तज्ञांना कमिशनवर सेवा देण्‍यासाठी एकत्र आणले आहे.

  • युनिव्‍हर्सल हेल्‍थ कव्‍हरेज संपादित करण्‍याच्‍या उद्देशाने नागरिकांचा आराखडा तयार करण्‍यासाठी उपक्रम सादर
  • कमिशन त्‍याच्‍या दर्जाचा विकसित करण्‍यात आलेला पहिला सहभागी, देशव्‍यापी अहवाल

मुंबई : युनिव्‍हर्सल हेल्‍थ कव्‍हरेज (यूएचसी) संपादित करण्‍याच्‍या भारताच्‍या प्रयत्‍नांचे आता ‘लॅन्सेट सिटिझनस कमिशन – भारतीय आरोग्‍य यंत्रणेची पुनर्रचना’च्‍या सादरीकरणासह नागरिक आणि भारतीय आरोग्‍य यंत्रणेच्‍या विविध विभागांमधील प्रख्‍यात भागधारकांच्‍या पुढाकारासह विश्‍लेषण करण्‍यात येणार आहे. कमिशनचे कार्यसंचालन आजपासून सुरू होईल आणि कमिशनचा पुढील दोन वर्षांमध्‍ये त्‍यांच्‍या निष्‍पत्ती व शिफारसींचा अंतिम अहवाल प्रकाशित करण्‍याचा मनसुबा आहे.

जगातील आघाडीचे आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिक ‘दि लॅन्‍सेट’ आणि दि लक्ष्‍मी मित्तल ॲण्‍ड फॅमिली साऊथ एशिया इन्स्टिट्यूट, हार्वर्ड युनिव्‍हर्सिटीसोबत सहयोगाने निर्माण करण्‍यात आलेल्‍या कमिशनचा प्रत्‍येक भारतीयाला दर्जात्‍मक व किफायतशीर हेल्‍थकेअर सेवा सर्वत्र उपलब्‍ध करून देण्‍याच्‍या खात्रीसाठी आराखडा तयार करण्‍याचा प्रमुख दृष्टिकोन असेल. चार प्रख्‍यात आरोग्‍य व व्‍यवसाय प्रमुख (प्रसिद्धी पत्रकामध्‍ये उल्‍लेख केलेले सह-अध्‍यक्ष) कमिशनचे नेतृत्‍व करतील. या प्रमुखांनी शैक्षणिक, वैज्ञानिक समुदाय, नागरी समाज आणि सार्वजनिक हेल्‍थकेअरमधील तीस तज्ञांना कमिशनवर सेवा देण्‍यासाठी एकत्र आणले आहे.

कमिशनच्‍या दृष्टिकोनाबाबत सांगताना बायकॉनच्‍या कार्यकारी अध्‍यक्षा किरण मझुमदार-शॉ म्‍हणाल्‍या, ”हा अद्वितीय सल्‍लागारिता व सहभागात्‍मक उपक्रम आहे, ज्‍याचा सार्वत्रिक आरोग्‍य समानतेच्‍या माध्‍यमातून सामाजिक-आर्थिक समानतेला चालना देण्‍याचा मनसुबा आहे. हा उपक्रम देशभरातील नागरिकांना समाविष्‍ट करून त्‍यांना भारतीय आरोग्‍य यंत्रणेमध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणण्‍याच्‍या प्रयत्‍नांमध्‍ये अग्रस्‍थानी ठेवण्‍याचा आणि या देशामध्‍ये सार्वत्रिक हेल्‍थकेअरला वास्‍तविक रूप देण्‍याचा प्रयत्‍न करतो. आमचा या महत्त्वपूर्ण चर्चेमध्‍ये सर्व सामाजिक-आर्थिक स्‍तरांमधील भारतीयांना सामावून घेण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यामुळे त्‍यांचे अनुभव व मते शिफारसींमध्‍ये एकीकृत करता येऊ शकतील आणि प्रक्रियेच्‍या शेवटी विश्‍वसनीय व सर्वसमावेशक अहवालाची खात्री मिळेल.”

कोविड-१९ महामारीचा प्रादुर्भावादरम्‍यान कमिशनची सुरूवात करण्‍यात आली. या कमिशनने सर्व नागरिकांना सर्वसमावेशक, जबाबदार, उपलब्‍ध होण्‍याजोगी, विशेष व किफायतशीर दर्जात्‍मक आरोग्‍यसेवा देणा-या स्थिर आरोग्‍य यंत्रणेची गरज समोर आणली आहे. या प्रयत्‍नाला विशेष बनवणारी बाब म्‍हणजे मागील अहवालांमध्‍ये क्‍वचितच आवाज ऐकण्‍यात आलेल्‍यांना; आरोग्‍यसेवा देणा-यांना आणि आरोग्‍यसेवा प्राप्‍त करणा-यांना सक्रियपणे सामावून घेण्‍यासाठी कौशल्‍याच्‍या समकालीन मर्यादांपलीकडे जाण्‍याबाबत असलेली त्‍यांची कटिबद्धता.

आगामी वर्षामध्‍ये कमिशन युनिव्‍हर्सल हेल्‍थ कव्‍हरेजसंदर्भात तळागाळातील सर्वेक्षण, सार्वजनिक सल्‍लामसलत आणि ऑनलाइन चर्चा करण्‍याच्‍या माध्‍यमातून भारतभरातील माहिती गोळा करेल. तसेच ते क्षेत्रांमध्‍ये आवाज उठवण्‍यासाठी आणि माहितीचा प्रसार करण्‍यासाठी शैक्षणिक संस्‍था, नागरी समाज आणि इतर भागधारकांसोबत सहयोग जोडत सक्रियपणे काम करतील. विशेषत:, ते सरकारसोबत सहयोग कायम ठेवतील, ज्‍याकडे ते युनिव्‍हर्सल हेल्‍थ कव्‍हरेजची जाणीव निर्माण करण्‍यासाठी महत्त्वपूर्ण पैलू म्‍हणून पाहत आहेत. ही माहिती कमिशनची वेबसाइट (www.citizenshealth.in), तसेच त्‍यांच्‍या सोशल मीडिया हँडल्‍सवर शेअर करण्‍यात येईल. अंतिम अहवाल सहकारी अवलोकन आणि ‘दि लॅन्‍सेट’मध्‍ये प्रकाशनासाठी सादर करण्‍यात येईल.

पूर्वीच्‍या प्रयत्‍नांपेक्षा या कमिशनला वेगळे बनवणा-या बाबींबाबत सांगताना वेलोर येथील ख्रिस्तियन मेडिकल कॉलेजचे प्राध्‍यापक गगनदीप कांग म्‍हणाले, ”हेल्‍थकेअर सुविधा लक्‍झरीअस राहण्‍यासोबत वंचितांना देखील त्‍या सुविधा उपलब्‍ध करून देणारी स्थिर आरोग्‍य यंत्रणा निर्माण करण्‍यासाठी सर्व भागधारकांसह नागरिकांनी देखील सरकारसोबत सहयोगाने काम करण्‍याची आणि युनिव्‍हर्सल हेल्‍थ कव्‍हरेजच्‍या प्रभावी अंमलबजावणीसाठी सोल्‍यूशन्‍सवर चर्चा करण्‍याची गरज आहे.”

मागील लॅन्‍सेट कमिशन्‍स जागतिक धोरणाला आकार देण्‍यामध्‍ये आणि जगभरातील वैद्यकीय सुधारणा व जागतिक आरोग्‍य चर्चांसाठी मार्ग दाखवण्‍यामध्‍ये अत्‍यंत प्रभावी ठरले आहेत. हार्वर्ड मे‍डिकल स्‍कूल व हार्वर्ड टीएच चॅन स्‍कूल ऑफ पब्लिक हेल्‍थचे प्राध्‍यापक आणि भारतीय एनजीओ संगतचे सह-संस्‍थापक विक्रम पटेल सद्यस्थितीमध्‍ये या कमिशनच्‍या संभाव्‍य प्रभावावर भर देत म्‍हणाले, ”महामारीमुळे देशाच्‍या युनिव्‍हर्सल हेल्‍थ कव्‍हरेज संपादित करण्‍याच्‍या महत्त्वाकांक्षा समजण्‍याची ऐतिहासिक संधी मिळाली आहे. आम्‍ही १५ ऑगस्‍ट २०२२ रोजी भारताच्‍या ७५व्‍या स्‍वातंत्र्य दिनी आमच्‍या निष्‍पत्ती प्रकाशित करण्‍याची आशा करतो.”

या भावनेला सह-अध्‍यक्ष हार्वर्ड बिझनेस स्‍कूलचे प्राध्‍यापक आणि दि लक्ष्‍मी मित्तल ॲण्‍ड फॅमिली साऊथ एशिया इन्स्टिट्यूटचे संचालक तरूण खन्‍ना यांनी देखील दुजोरा दिला. भारताच्‍या व्‍यापक महत्त्वाकांक्षांसाठी हेल्‍थकेअरच्‍या महत्त्वपूर्ण भूमिकेबाबत सांगताना ते म्‍हणाले, ”भारताच्या उत्तम आर्थिक क्षमतेप्रती प्रगतीला आरोग्‍यदायी नागरिकांच्‍या सक्षम पाठिंब्‍याची गरज आहे.”

दि लॅन्‍सेटच्‍या वरिष्‍ठ कार्यकारी संपादक पामेला दास म्‍हणाल्‍या, ”वर्ष २०११ मध्‍ये प्रथम प्रकाशित करण्‍यात आलेल्‍या लॅन्‍सेट इंडिया सिरीजने यूएचसीसाठी प्रबळ आराखड्याला समोर आणले. हे नवीन कमिशन त्‍या दृष्टिकोनाला नवीन रूप देण्‍याची आणि नवीन सुधारणा करण्‍याची, तसेच भारतातील धोरणामध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणण्‍यासाठी प्रक्रियेमध्‍ये भारतीय नागरिकांना प्राधान्‍य देण्‍याची संधी आहे. आम्‍ही आमच्‍या भारतीय सहका-यांसोबत या महत्त्वाच्‍या प्रयत्‍नावर काम करण्‍यासाठी खूपच उत्‍सुक आहोत.”

कमिशनचे पाच कार्यप्रवाह

नागरिकांचा सहभाग

कमिशनचा पाया हेल्‍थकेअर प्रदात्यांसह प्रत्‍यक्ष आघाडीवर काम करणारे कर्मचारी आणि आपल्‍या देशातील लिंग व वयानुसार विविध सामाजिक समूहांमधील नागरिकांच्‍या हेल्‍थकेअरसंदर्भातील अपेक्षा व अनुभवांबाबत माहिती गोळा करण्‍यावर अवलंबून असतो.

आर्थिक

आर्थिक धोक्‍यांपासून अधिकाधिक संरक्षणासाठी आणि सर्वांना प्रभावी, समान, विश्‍वसनीय व प्रतिसादात्‍मक आरोग्‍य यंत्रणा सुविधा मिळण्‍याच्‍या खात्रीसाठी आरोग्‍य खर्चांचे स्रोत व वापरासंबंधित आव्‍हानांचे निराकरण करा.

शासन

सर्व नागरिकांना उच्‍च दर्जाची हेल्‍थकेअर सुविधा मिळण्‍याच्‍या ध्‍येयासह प्रबळ नियमन रचना, सरकारी पातळीवर समन्‍वय आणि अधिक जबाबदारीच्‍या माध्‍यमातून तयार केलेला शासकीय आराखड्याचा प्रस्‍ताव करा.

मानवी संसाधने

कमतरता व असमान वितरणाचे निराकरण करण्‍यासाठी, कौशल्‍य विकास वाढवण्‍यासाठी, प्रेरणा व कार्यशील स्थिती सुधारण्‍यासाठी आणि अनेक हेल्‍थकेअर सेवांची उपलब्‍धता विस्‍तारित करण्‍यासाठी प्रभावी मानवी संसाधने नियोजन व धोरणांची अंमलबजावणी करा.

तंत्रज्ञान

आरोग्‍य निष्‍पत्ती सुधारण्‍यासाठी, हेल्‍थकेअर उपलब्‍धता विस्‍तारित करण्‍यासाठी, रूग्‍णांना सक्षम करण्‍यासाठी आणि रूग्‍ण-केंद्रित नियमनाला चालना देण्‍यासाठी विविध तंत्रज्ञानांचा लाभ घ्‍या.