अजब महोत्सव; फेकून मारतात पीठ व अंडी

या खेळाचे काही नियम असून त्याचे उल्लंघन करणाऱ्या एन्फेरिनेट्स सदस्याकडून दंड आकारला जातो. या खेळामध्ये शेकडो किलो पीठ व हजारो अंड्यांची नासाडी होते.

स्पेनमध्ये साजरा करण्यात येणाऱ्या टोमॅटिना फेस्टिव्हल बराचसा आपल्याकडील होळीशी मिळताजुळता असतो. फरक एवढाच की त्यामध्ये लोक एकमेकांवर रंगांऐवजी टोमॅटो फेकून मारतात. टोमॅटिनाच्याच धर्तीवर स्पेनमध्ये एल्स एन्फेरिनेट्स नावाचा आणखी एक फेस्टिव्हल साजरा केला जातो. मात्र, त्यामध्ये टोमॅटो नाही तर लोक एकमेकांवर पीठ आणि अंडी फेकून मारतात. हा विचित्र प्रकारचा फेस्टिव्हल स्पेनच्या इबी शहरामध्ये साजरा केला जातो. दरवर्षी त्यात शेकडो लोक सहभागी होतात व बेभान होऊन एकमेकांवर पीठ व अंड्यांचा मारा करतात. तब्बल २०० वर्षांची परंपरा असलेल्या या अनोख्या महोत्सवामध्ये विवाहित आणि अविवाहित लोकांचे दोन वेगवेगळे गट असतात.

विवाहित लोकांच्या गटाला एल्स एन्फेरिनेट्स तर अविवाहित लोकांच्या गटालाला ओपोसिकियो म्हणून ओळखले जाते. या महोत्सवात सहभागी होणाऱ्या लोकांसाठी एक ड्रेसकोड असून त्यासाठी त्यांना लष्करी गणवेश परिधान करावा लागतो. या पेहेरावात हे लोक शहरातील टाऊन हॉलबाहेर गोळा होता. या खेळाचे काही नियम असून त्याचे उल्लंघन करणाऱ्या एन्फेरिनेट्स सदस्याकडून दंड आकारला जातो. या खेळामध्ये शेकडो किलो पीठ व हजारो अंड्यांची नासाडी होते.