अधिक झोप घेणाऱ्या महिलांना कर्करोगाचा धोका; सकाळी लवकर उठल्याने कमी होते शक्यता

जितके श्रम अधिक, तितकी झोप गाढ असते. श्रमजीवी व्यक्तींची झोप आणि सुखवस्तू व्यक्‍तींमधील निद्रानाश व याचा विचार प्रत्येकाने करावा. झोपेवर अमाप संशोधन झाले आहे. एका संशोधनात असे दिसून आले आहे की, सकाळी लवकर उठणाऱ्या महिलांना स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका कमी असतो.

    ‘झोप’ ही एक स्वाभाविक शरीरक्रिया आहे. यात शरीर, मन, ज्ञानेंद्रिये, मस्तिष्क विश्रांती घेत असतात. सर्वसामान्य मनुष्य त्याच्या आयुष्याचे १/३ आयुष्य झोपेत घालवत असतो. एक दिवस जरी आपण शांतपणे झोपेविना घालवला तर काय होते, हे प्रत्येकाने अनुभवलंच असेल. झोपेत श्‍वसनाची गती कमी होते. नाडीचे ठोके मंदावतात. रक्‍तदाब थोडा मंदावतो. स्नायू शिथिल होतात. थोडक्यात, सर्व शरीर विश्रांती घेत असते.

    जितके श्रम अधिक, तितकी झोप गाढ असते. श्रमजीवी व्यक्तींची झोप आणि सुखवस्तू व्यक्‍तींमधील निद्रानाश व याचा विचार प्रत्येकाने करावा. झोपेवर अमाप संशोधन झाले आहे. एका संशोधनात असे दिसून आले आहे की, सकाळी लवकर उठणाऱ्या महिलांना स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका कमी असतो. युके बायोबँक स्टडी आणि ब्रेस्ट कॅन्सर असोसिएशन कंसोर्टियमने याबाबतची पाहणी घेतली असून त्यामध्ये चार लाखांपेक्षाही अधिक महिलांना सहभागी करून घेण्यात आले होते.

    झोपण्याचा कालावधी आणि अनिद्रा याचाही स्तनाच्या कर्करोगाबाबत परिणाम होत असल्याचे दिसून आले. सात-आठ तासांपेक्षा अधिक झोप घेत राहिल्यानेही स्तनाच्या कर्करोगाचा धोका अपेक्षेपेक्षा अधिक वाढतो. ऑस्ट्रियाच्या युनिव्हर्सिटी ऑफ व्हिएन्नातील इबा शर्नहमर यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या पाहणीतील निष्कर्ष समोर असले तरी याबाबत आणखी संशोधनाची गरज आहे. आपल्या शरीरातील जैविक घड्याळाचा परिणाम आरोग्यावर कसा होतो हे यामधून समजू शकते.

    Risk of cancer in women who sleep more Getting up early in the morning reduces the chances