झटपट रेसिपी : महाशिवरात्रीच्या उपवासासाठी साबुदाणा भिजत घालायला विसरलात? Don’t worry ही पटकन होणारी रेसिपी ट्राय करा!

साबुदाण्याच्या खीर अनेक घरात बनवली जाते पण ती फसू शकते. त्यामुळे ही खरी कशी बनावायची याच्या काही टीप्स आम्ही देणार आहोत.

  उद्या महाशिवरात्रीच्या पर्वावर अनेक जण उपवास करतात. आता उपवास म्हटलं की साबुदाणा हा आलाच. आपल्याकडे शक्यतो उपवास म्हटलं की साबुदाण्याची खिचडी बनवली जाते. पण उद्या तुम्ही खिचडी न बनवता साबुदाण्याचा हा गोड पदार्थ नक्की ट्राय करू शकता.

   

  साहित्य

  पाव कप साबुदाणा

  अर्धा लिटर थंड दूध

  अर्धा कप साखर,

  केसर

  एक लहान चमचा वेलदोडा

  आवश्यकतेनुसार काजू  आणि बदाम

   

  कृती

  एका बाऊलमध्ये साबुदाना घ्या. तो चांगला धुवून घ्या. त्यानंतर  पाणी बाहेर काढा आणि पुन्हा पाणी घालून एक तास साबुदाणा भिजवून घ्या. त्यानंतर थोडीसे पाणी घेऊन त्यामध्ये दुध घाला. दूध आणि पाणी चांगल्या पद्धतीने उकळून घ्या. भिजत घातलेल्या साबुदाणातील पाणी बाहेर काढा आणि त्यानंतर हा साबुदाणा हळूहळू  दुधामध्ये घाला. हे मिश्रण पाच मिनिटे चांगल्या पद्धतीने शिजवून घ्या. दोन-तीन मिनिटे हे मिश्रण चांगले उकळू द्या त्यानंतर साखर टाकून पुन्हा चमच्याचे सहाय्याने ते हलवा. त्यानंतर त्यावरती वेलदोड्याची पावडर आणि केसर टाका.

  सर्व मिश्रण उकळून घेताना ते जादा घट्ट होणार नाही याची काळजी घ्या. चांगल्या पद्धतीने शिजलेली खीर आता गॅस वरून खाली घ्या. आता आपली स्वादिष्ट अशी साबुदाण्याची खीर तयार झाली आहे.