पैसा कमवायचा असेल तर बेशरम होऊन करा ‘या’ तीन गोष्टी!

आर्थिक स्थिती सुधारायची असल्यास योग्यवेळी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. लोकं काय म्हणतील? याचा विचार करणे सोडल्याशिवाय प्रगती शक्य नाही.

  पैसा हा आयुष्यात कुणाला हवा नसतो?, आपल्यापैकी प्रत्येक जण पैसा  कमविण्यासाठी दिवसाची रात्र करतात. अपार कष्ट करतात पण त्या तुलनेने मिळकत फारच कमी असते. असे का होत असावे? सर्वांसोबतच असे होते काय? असे अनेक प्रश्न बहुतेकांना पडतात.

  कमी मेहनतीत जास्त पैसे कमाविणे शक्य आहे. पण…

  हा ‘पण’ अत्यंत महत्वाचा आहे. भरपूर पैसा कामविणारे नक्की काय करतात याचे सिक्रेट आज तुम्हला सांगणार आहोत.

  मध्यमवर्गीय माणूस मध्यमवर्गीय म्हणून जन्माला येतो आणि मध्यमवर्गीय म्हणूनच मरतो तर अनेकजण अत्यंत गरिबीतून वर येतात आणि आपली आर्थिक स्थिती एका उंचीवर घेऊन जातात. असे का? तर हे लोक कुठल्याही कामाची लाज बाळगत नाही. कोणत्याच कामाला कमी समजत नाही. लहानात लहान कामाला दर्जात्मक बनवितात आणि पुढे त्याचा मोठा ब्रान्ड बनतो.

  आर्थिक स्थिती सुधारायची असल्यास योग्यवेळी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. लोकं काय म्हणतील? याचा विचार करणे सोडल्याशिवाय प्रगती शक्य नाही.

  जिथे संधी नाही तिथून निघून जावे. बरेच जण वर्षानुवर्षे एकाच काम करतात आणि आर्थिक चणचण भासली की नशिबाला दोष देतात. स्वतःमध्ये कौशल्य विकसित करून जिथे चांगल्या उत्पन्नाची संधी मिळेल तिचे जाण्यास कधीही लाजू नये. भावनिकरित्या आपल्या संस्थेशी संलग्न होणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे.