sex has a relation with long life this thing came in the new study

जे लोक लैंगिक दृष्ट्या सक्षम असतात त्यांच्यात शारीरिक संबंध ठेवण्याची क्षमता अधिक असते आणि त्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

नवी दिल्ली : आपल्याला आपल्या नात्यात अधिक आनंद आणि नात्याची वीण अशीच कायम घट्ट रहावी असं वाटत असेल तर यात सेक्स लाइफ (Good Sex Life) महत्त्वाची भूमिका बजावते. यामुळे दोघांच्या नात्यात कधीच दुरावा येत नाही. पण वयोमानापरत्वे, सेक्सुअल डिझायर, क्रिया-प्रतिक्रियांमध्ये बदल होत जातात. यासाठी कोणत्या वयात आणि किती प्रमाणात सेक्सची आवश्यकता असते हे जाणून घेणं गरजेचं आहे.

शारीरिक संबंध (सेक्स केल्याने) ठेवल्याने होतात हे फायदे

संशोधकांच्या मते, सेक्स केल्याने अनेक दुर्धर आजारांचा धोका कमी होतो. याने फक्त शारीरिक समाधानच मिळत नाही तर त्याने तुमचा मूडही चेंज होतो. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयविकाराचा धोकाही कमी होतो, यामुळे आपल्याला दीर्घायुष्य लाभते.

दररोज सेक्स केल्यास हृदयविकाराच्या तक्रारी दूर होतात

न्यू इंग्लंड रिसर्च इंस्टिट्यूट द्वारे सेक्स आणि हृदय विकारांशी संबंध जोडताना ६५ वर्षांहून कमी वयाचे पुरुष आणि महिलांवर करण्यात आलेल्या संशोधनामुळे आश्चर्यकारकरित्या दावा करण्यात आला आहे. दररोज सेक्स केल्यास हृदयविकाराशी संबंधित समस्या होण्याचा धोका कमी होतो सोबतच शरीराच्या बारीकसारीक कुरबुरीही यामुळे कमी होतात.

या वयात अधिक असतं सेक्सबद्दलचं कुतूहल

Teenage म्हणजेच किशोरावस्थेत सेक्स हार्मोन्सचं प्रमाण वेगाने वाढत असतं आणि सेक्सबाबत जाणून घेण्याची उत्सुकता आणि कुतूहल अधिक असतं. यासाठी सेक्स बाबत याच वयात अधिकाधिक प्रयोगही केले जातात . सेक्सविषयीचं कुतूहल, स्वप्न ही याच वयात अधिकाधिक प्रमाणात रंगवली जातात.

२० ते ३५ या वयात असते वाढती उत्तेजना

संशोधनात नमूद केल्याप्रमाणे २० ते ३५ पर्यंत सेक्सुअल समाधानासाठी मनात एक वेगळाच उत्साह आणि उत्तेजना असते. एकमेकांना स्पर्श करणे,प्रेम करणे, एकमेकांना चुंबन घेणे आणि यापुढची पायरी म्हणजेच सेक्स ( लैंगिक संबंध) हाच उत्तम अनुभव आहे.

या वयातच कमी होऊ लागतो सेक्स करण्यातला रस

३५ ते ५० च्या काळात लैंगिकतेतला रस कमी होऊ लागतो. या काळात सेक्स करण्याची इच्छा कमी होऊ लागते. तथापि हा बदल शरीरात होणाऱ्या बदलांमुळे भावनात्मकता आणि समजूतदारपणाकडे अधिक झुकताना दिसतो.

५० शी नंतरचे आयुष्य

या वयात अधिकाधिक स्त्री-पुरुष सेक्सविषयी मोकळेपणाने बोलायला कचरतात. कारण ते यावेळी आजोबा-आजीच्या भूमिकेत असतात. दुसरं या वयात तोच उत्साह, तोच जोश न राहिल्याने आणि आपण ही गोष्ट योग्य पद्धतीने करू शकू का? या भीतीपोटी ते सेक्सपासून दूर राहणंच पसंत करतात.

पुरुषांनी सेक्स केल्यास होणारे फायदे आणि तोटे

जे लोक लैंगिक दृष्ट्या सक्षम असतात त्यांच्यात शारीरिक संबंध ठेवण्याची क्षमता अधिक असते आणि त्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. जे पुरुष कमी सेक्स करतात त्यांना हृदयविकाराच्या समस्या वाढण्या व्यतिरिक्त इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या देखील वाढते असं या संशोधनात स्पष्ट केलं आहे.

हृदयविकाराचा झटका येवून गेल्यानंतरही सेक्स करण्यात काहीच गैर नाही

जर एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला असल्यास आठवड्यातून एकदा सेक्स केल्यास त्याचा शरीराला फायदा होईल असंही या संशोधनात नमूद केलं आहे. आठवड्यातून एकदा सेक्स केल्याने दीर्घायुषी होण्याची शक्यता ३७ टक्क्यांनी वाढते.