आमची 'ही' मला प्रेमाने वागवतच नाही म्हणून मला करायचंय Extra Marital Affair
आमची 'ही' मला प्रेमाने वागवतच नाही म्हणून मला करायचंय Extra Marital Affair

तो विवाहबाह्य संबंध ठेवण्यास उत्सुक असून तो योग्य व्यक्तीच्या शोधात आहे पण दुसऱ्या बाजूला त्याचं मन हे करायला धजावत नाहीये. त्याला ही तिच्यासोबत केलेली प्रतारणा वाटते आहे. काय बरोबर काय चूक अशा कात्रीत हा पती सापडला आहे.

एकाच स्त्री बरोबर लग्न करून आयुष्य काढण्यामागे सुविधा, सवय, विश्वास, आपल्या मागे कोणीतरी आहे याची जाणीव, सुरक्षा, भावनात्मक गुंतवणूक, मुलांचंसंगोपन, कायदेशीर मदत आणि आपली काळजी घेईल असं कुणी शेवटपर्यंत जवळ राहणं हा विचार होता. मात्र या बदलत्या काळात तंत्रज्ञानाच्या चौकटीने आपल्या अडचणी वाढवल्या आहेत.

पतीची झालीये व्दिधा मनस्थिती. परंतु, सुरक्षा आणि स्वातंत्र्याची आवश्यकता आणि स्थैर्य विरुद्ध अनिश्चिततेतून मिळणारा रोमांच – एक्साइटमेंट या दोन परस्परविरोधी गरजांमध्ये मनुष्य बांधला गेला आहे. या गरजांची निर्मिती भिन्न स्त्रोतांमधून होते आणि त्या आपल्याला त्यांच्याकडे खेचतात. त्यामुळे आपण चुकीच्या दिशेला खेचले जातो. आज बहुतांश जोडपी याच मुद्द्यामुळे अडचणींचा सामना करत असून ते रोमँटिक संबंधांमध्ये या तणावासोबत तोडगा काढण्याचा अनेकदा प्रयत्न करतात.

एका व्यक्तीचं २०१२ साली लग्न झालं. त्याची पत्नी सुशिक्षित आणि सुंदर आहे. त्याला दोन मुलंही आहेत. सुरुवातीला त्यांचा संसार खूप छान चालला होता. पण आता पतीला पत्नीत इंटरेस्टच राहिलेला नाही. त्याला तिच्याकडून प्रेम, आदर मिळत नाहीये. त्यामुळे तो या सर्व गोष्टी बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याने उत्साह आणि रोमांच वाढवण्यासाठी काही वेबसिरीज पाहिल्या ज्यामध्ये डोळे बंद करून (Blind fold), threesome वगैरे प्रकार पाहिले. आता तो विवाहबाह्य संबंध ठेवण्यास उत्सुक असून तो योग्य व्यक्तीच्या शोधात आहे पण दुसऱ्या बाजूला त्याचं मन हे करायला धजावत नाहीये. त्याला ही तिच्यासोबत केलेली प्रतारणा वाटते आहे. काय बरोबर काय चूक अशा कात्रीत हा पती सापडला आहे.

आपण एका नोकरीनंतर दुसरी नोकरी, संबंध ठेवण्यासाठी दुसरी व्यक्ती, दुसरे घर आदींचा शोध घेत बसतो. आणि कालांतराने हीच गोष्ट आयुष्यातील गूढ वाढवते. पण सध्या अशी परिस्थिती आहे की आपल्यापैकी काहीजण आयुष्यभर लैंगिक आणि भावनिक गरजांसाठी पत्नीवर अवलंबून राहू इच्छित नाहीत. तसेच फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असून हे एक प्रकारचे अतिक्रमण मानले जात आहे. मात्र हे खरे आहे आनंदाने किंवा काळजीपोटी झालेल्या विवाहांमध्येही लोक संबंध प्रस्थापित करतात. मात्र या पतीची एकदंर स्थिती पाहता या व्यक्तीला कंटाळा हे संबंधाबाबत प्रश्न निर्माण करणारे प्रमुख कारण असल्याचा सल्ला एक्सपर्टने दिला आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न एका वेबसाइटने प्रश्नोत्तरांच्या माध्यातून केला आहे.

काही वर्षांनंतर बहुतांश जोडप्यांना लैंगिक जीवनात आलेला कंटाळा आणि रोमांचाची कमतरता या दोन मुद्द्यांना सामोरे जावे लागते. आपल्या पत्नीमध्ये आपल्याला रस राहिलेला नाही, हे याचे कारण होऊ शकत नाही. लैंगिक जीवनात वैविध्याची कमतरता हे यामागचे एक कारण असू शकते. वेबसिरीजमध्ये विविध लैंगिक क्रिया पाहिल्या असून त्यामुळे तुमची उत्तेजना वाढते. याचा अर्थ तुम्हाला तुमच्या लैंगिक जीवनामध्ये विविधता आणि रोमांच अधिक प्रमाणात हवा आहे.

वैवाहिक नात्याच्या परिघात राहून हे मिळवणे अशक्य नाही. असेही असू शकते की तुमच्या पत्नीलाही हेच हवे आहे. एक तुम्हाला तुमच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी एक चांगला जोडीदार मिळत असल्याने एक नियमित जोडीदार असणे फायदेशीरच आहे. एक पक्का जोडीदार असल्यामुळे तुम्ही विविध गोष्टींचा प्रयत्न करू शकता. यासाठी या व्यक्तीला त्याच्या पत्नीसोबत प्रामाणिक आणि खुलेपणाने संवाद साधण्याची गरज असल्याचे एक्सपर्टने नमूद केले आहे.

तुम्हाला काय जाणवत आहे हे तुम्ही तिला सांगा. पत्नीसमोर मोकळेपणाने आपले विचार मांडणे आवश्यक आहे. मात्र हा संवाद साधताना आपल्या पत्नीलाही त्यांचे विचार खुलेपणाने मांडण्याची संधी द्यावी. तिच्या मनातील भावना जाणून घ्या. लैंगिक आयुष्य अधिक सुदृढ व्हावे यासाठी दोघे मिळून काय करु शकतो याचाही शोध घ्यायला हवा.

अस्वाभाविक बीडीएसएम किंवा तत्सम लैंगिक क्रियांसाठी त्यांची खुली वृत्ती असू शकते. असेही होऊ शकते की त्या अभिनय, खेळणी, उत्तेजक अंतर्वस्त्र किंवा काही नव्या पोझिशनचा वापर केल्याने तुमच्या लैंगिक आयुष्यात बदल होतील. परंतु जोपर्यंत तुम्ही तुमच्या पत्नीशी संवाद साधत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीही ठोस समजू शकत नाही. तुम्ही तुमच्या इच्छा आणि स्वप्न त्यांच्यासोबत शेअर करा तसेच या इच्छा व स्वप्नांमध्ये सहभागी होताना अपराधीपणा बाळगण्याची आवश्यकता नाही, असा विश्वास त्यांना द्यावा. याबाबतचा संवाददेखील प्रेमपूर्वक होऊ शकतो असेही एक्सपर्टने म्हटले आहे.