दिनविशेष दि. २९ डिसेंबर

घटना.

१९३० : सर मुहम्मद इकबाल यांनी दोन राष्ट्र सिद्धांत तसेच पाकिस्तानच्या निर्मितीचा दृष्टीकोन मांडला.

१९५९ : नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड फाइनमॅन यांनी CALTECH येथे There is plenty of room at the bottom हे प्रसिद्ध भाषण दिले. ही nanotechnology ची सुरुवात मानली जाते.

१९५९ : पोर्तुगालमधील लिस्बन येथे भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.

दिनविशेष दिनविशेष दि. २८ डिसेंबर Special day December 28

जन्म.

१८०० : रबरावरील व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक चार्ल्स गुडईयर यांचा जन्म.

१८०८ : अमेरिकेचे १७ वे राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॉन्सन यांचा जन्म.

१८०९ : ब्रिटीश पंतप्रधान विल्यम ग्लँडस्टोन यांचा जन्म.

१८४४ : कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष व्योमकेशचंद्र बनर्जी यांचा जन्म.

१९०० : मास्टर दिनानाथ मंगेशकर यांचा जन्म.