दिनविशेष दि. ७ डिसेंबर

घटना

१८२५ : बाष्पशक्तीवर चालणारे एंटरप्राइज हे भारतात आलेले पहिले जहाज

१८५६ : पहिला उच्चवर्णीय विधवा विवाह कोलकात्यात झाला.

१९१७ : पहिले महायुद्ध – अमेरिकेने ऑस्ट्रिया/हंगेरी विरुद्ध युद्ध पुकारले.

१९३५ : प्रभातचा धर्मात्मा हा अस्पृष्योद्धारावरचा चित्रपट मुंबईतील कृष्ण सिनेमात प्रदर्शित झाला.

१९४१ : दुसरे महायुद्ध – जपानने पर्ल हार्बरवर तुफानी हल्ला केला.

१९७५ : इंडोनेशियाने पूर्व तिमोरवर हल्ला केला.

१९८८ : यासर अराफात यांनी इस्त्राएलच्या अस्तित्त्वास मान्यता दिली.

१९९४ : कन्‍नड साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती यांना ज्ञानपीठ पारितोषिक जाहीर

१९९५ : फ्रेन्च गयानातील कोऊरू प्रक्षेपण केन्द्रावरुन इन्सॅट-२सी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.

१९९८ : ७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी वसंत बापट यांची निवड

२०१६ : पाकिस्तान इंटरनॅशनल एरलाईन्स चे पीके ६६१ विमान कोसळले. यात ४७ लोकांचा मृत्यू  झाला.