corona virus

CoronaVirus : कोरोना व्हायरसच्या धोक्याबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. तज्ज्ञांनी कलेल्या दाव्यानुसार अविवाहित पुरूषांना कोरोनाचा धोका जास्त असतो.

लंडन (London) : कोरोना व्हायरसने (corona virus) आतापर्यंत करोडो लोकांना संक्रमित केलं असून रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार आणि औषधं, लसी यांवर जगभरातील शास्त्रज्ञांचे संशोधन सुरू आहे. कोरोनाच्या प्रसाराबाबत जागतिक (world) स्तरावर रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. दरम्यान कोरोना व्हायरसच्या धोक्याबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. तज्ज्ञांनी कलेल्या दाव्यानुसार अविवाहित पुरूषांना (unmarried men) कोरोनाचा धोका जास्त असतो.

शिक्षणाचा अभाव, कमी मिळकत असणं, बेरोजगारी, जास्तवेळ अविवाहित असणं किंवा गरीब देशांमध्ये जन्माला येणं या कारणांमुळे कोरोना व्हायरसची लागण होऊन मृत्यूचा धोका वाढतो. अशी धोक्याची सुचना तज्ज्ञांनी दिली आहे. स्वीडनमधील स्टॉकहोम विद्यापीठातील अभ्यास लेखक स्वेन ड्रेफहल यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.” कोविड १९ विषयीच्या चर्चेतून आणि वृत्तांतून निर्माण झालेल्या वेगवेगळ्या जोखमीच्या घटकांचे स्वतंत्र परिणाम आम्ही दाखवू शकतो,” असे तज्ज्ञ स्वेन ड्रेफहल यांनी सांगितले.

हे संशोधन स्वीडिश नॅशनल बोर्ड ऑफ हेल्थ वेलफेअरच्या आकडेवारीवर आधारित आहे. स्वीडनमध्ये कोविड १९ मुळे २० आणि त्यापेक्षा जास्त तरूण वयाच्या लोकांचीही मृत्यूची नोंद झाली आहे. नेचर कम्युनिकेशन्स या वैद्यकिय नियतकालिकात प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार ड्रेफहल यांनी स्पष्ट केले आहे, की परदेशात जन्मलेल्या लोकांचा मृत्यूदर सामान्यत: स्वीडनमध्ये जन्मलेल्या लोकांच्या तुलनेत मृत्यु दर कमी असतो. उत्पन्नाचं प्रमाण आणि शिक्षणाचा या गोष्टींवर परिणाम होतो.

या अभ्यासातून असे दिसून आले आहे की एखादी व्यक्ती त्याचे कमी उत्पन्न आणि शिक्षणाची निम्न पातळी यामुळे तणावातून कोविड १९ मुळे मृत्यू होण्याचा धोका जास्त असतो. कोरोना व्हायरससोबतच इतर रोगांमुळे होणार्‍या मृत्यूंच्य बाबतीतही अशीच स्थिती उद्भवते. या संशोधनात कोविड १९ मुळे महिलांपेक्षा पुरुषांमध्ये मृत्यूचे प्रमाण दुप्पट असल्याचे दिसून आले. विवाहितांच्या तुलनेत अविवाहित पुरुष आणि स्त्रिया (लग्न न केलेले, विधवा / विधवा आणि घटस्फोटीत यासह) यांच्यात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण १.५ ते २ पट जास्त होते. संशोधकांच्यामते मृत्यूदर हा सामान्यपणे लोकांची जीवनशैली, जीवशास्त्र यांच्या संयोजनावर अवलंबून असतो.

अभ्यासाचे लेखक गुन्नर अँडरसन म्हणाले की, ”अल्प शिक्षण असणार्‍या किंवा कमी उत्पन्न असणार्‍या लोकांच्या जीवनातील या मुख्य कारणांमुळे आरोग्यावरही परिणाम होतो. या आधारावर तरूण वयोगटातील कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूदराबाबत अनेक बाबी स्पष्ट करता येऊ शकतात” असंही त्यांनी सांगितले. बर्‍याच अभ्यासांमधून असेही दिसून आले आहे की अविवाहित लोकांमध्ये विविध आजारांमुळे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे, असे संशोधन पथकाने नमूद केले आहे.