चष्मीश नाही स्टायलिश दिसा!

आधी नजर कमजोर झाली की लोकं चष्मा (eye glasses) वापरायचे, परंतु आता हा समज कालबाह्य झाला आहे.   स्टाईलिश (stylish) दिसावं म्हणूनही चष्मा (eye glasses) लावणाऱ्यांची संख्या कमी नाही. मात्र या चष्याचा आकार चुकला तर मात्र व्यक्तिमत्व (attractive personality) आकर्षक दिसणार नाही. त्यासाठी कोणत्याही तज्ज्ञाकडे न जाता तुम्ही ठरवू शकता तुमच्या चेहऱ्याच्या परफेक्ट असणारा चष्मा. त्यामुळे आता चष्मीश नाही तर स्टायलिश दिसण्याची वेळ आली आहे.

गोल चेहरा- गोल आकाराचा चेहरा असणाऱ्यांनी आयताकृती आकाराचा चष्मा वापरावा. त्यामुळे चेहऱ्याची गोलाई तितकीशी लक्षात येणार नाही. मात्र लहान, गोल फ्रेम असणारा चष्मा मात्र त्यांनी आवर्जून टाळावा.

रुंद चेहरा- रुंदीपेक्षा लांबीने  जास्त असलेल्या लांबट चेहरा असणाऱ्यांनी मोठ्या आकाराचा चष्मा वापरावा. लहान आकाराचा चष्मा त्यांच्या चेहऱ्यावर न खुलता लांबी जास्त हायलाईट करेल.

चौकोनी चेहरा-  मोठ कपाळ आणि रुंद हनुवटी असलेल्या चौकोनी चेहयाच्या व्यक्तींनी गोल आकाराचा चष्मा वापरायला हवा. त्यांना अंडाकृती आकाराचा चष्माही खुलून दिसू शकतो. मात्र त्यांनी चौकोनी किंवा आयताकृती चष्मा वापरणे टाळावे.

बदामाकृती चेहरा- मोठं कपाळ, अरुंद गाल आणि टोकदार हनुवटी त्यामुळे काहींच्या चेहऱ्याचा आकार बदामाकृती दिसतो. अशा व्यक्तींच्या चेहऱ्याला चौकोनी आणि मोठा चष्मा उठून दिसतो. चौकोनी आकारामुळे गालाचा भाग मोठा दिसून चेहरा अधिक आकारबद्ध दिसतो.

उभट चेहरा- उभट चेहऱ्याच्या व्यक्तींना मात्र चष्मा पसंत करण्यासाठी अधिक संधी असून त्यांना गोल, आयताकृती चष्माही चांगला दिसू शकतो. मात्र त्यांनी लहान आकाराचा चष्मा वापरल्यास डोळे खोल दिसून शकतात.